शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
2
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
3
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
4
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
5
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
6
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
7
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
8
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
9
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
10
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
11
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
12
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
13
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
14
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
15
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
16
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
17
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
18
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
19
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
20
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

चार सदस्यीय प्रभाग प्रणालीला न्यायालयात आव्हान

By admin | Updated: June 1, 2016 00:51 IST

सन २०१७ मध्ये होणाऱ्या महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत चार सदस्यीय प्रभाग प्रणाली कार्यन्वित होणार आहे.

विरोध वाढला : रिपाइं गट याचिका दाखल करणारअमरावती : सन २०१७ मध्ये होणाऱ्या महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत चार सदस्यीय प्रभाग प्रणाली कार्यन्वित होणार आहे. तथापी ही प्रणाली उपेक्षित हिंदूच्या विरोधात असल्याचा आक्षेप नोंदवीत रिपाइं आठवले आणि आंबेडकर गटांकडून अध्यादेशातील तरतुदीला न्यायालयात आव्हान दिले जाणार आहे.महापालिकेच्या फेब्रुवारी-मार्च मध्ये होणाऱ्या निवडणुका प्रभाग पद्धतीने होणार आहेत. एका प्रभागातून चार सदस्य निवडीचा अध्यादेश दोन दिवसांपूर्वी काढण्यात आला. एका प्रभागातून दोन महिला व दोन पुरूष असे सूत्र आखले गेले आहे. तथापी या निर्णयाला रिपाइंचे खासदार रामदास आठवले आणि माजी खासदार प्रकाश आंबेडकर यांनी जोरदार विरोध दर्शविला आहे. चार सदस्यीय पद्धतीचा निर्णय भाजप धार्जिणा असल्याचा आरोप करण्यात आला आहे. एका प्रभागातून चार नगरसेवक निवडण्याच्या पद्धतीमुळे राज्य आणि देशपातळीवरील राजकीय पक्षांना फायदा मिळू शकतो. अपक्ष किंवा लहान पक्षांच्या उमेदवारांना याचा फटका बसू शकतो, असे राजकीय पक्षाच्या नेत्याचे मत आहे. या प्रार्श्वभूमीवर १९ मे रोजी काढलेल्या अध्यादेशातील महापालिके संदर्भातील तरतुदींना आव्हान देण्याचा निर्णय आठवले आणि आंबेडकर यांनी घेतला आहे. मुंबई उच्च न्यायालयात यासंदर्भात रीट याचिका दाखल केली जाणार आहे. रिपाइं आठवले गटाचे अमरावतीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप दंदे व त्यांचे सहकारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात रीट याचिका दाखल करणार आहेत. १९९२ पासून सुरू असलेला वॉर्ड आणि प्रभागाचा हा खेळ बंद करावा, अशी जोरकस मागणी रिपाइं लावून धरणार आहे. एका प्रभागात चार नगरसेवक असल्यास ते चारही उलट दिशेने राहतील आणि परिणामी वॉर्ड वाऱ्यावर सुटेल, अशी भीती व्यक्त केली जात आहे. अध्यादेशाऐवजी कायदा करावा, अशी आग्रही मागणी रिपाइंच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.चार सदस्यीय प्रभाग प्रणालीचा अध्यादेश धडकल्यानंतर महापालिकेतील नगरसेवकांमधील अस्वस्थता वाढीला लागली आहे. अपक्ष आणि स्थानिक स्तरावर आघाडी करून निवडणुका लढविणाऱ्यांवर तर या प्रणालीने तलवारच कोसळली आहे. त्यांचे राजकीय भविष्य पणाला लागले आहे. रिपाइं गटासोबतच अन्य काही नगरसेवकही अध्यादेशातील महानगरपालिकेसंदर्भातील तरतुदीविरोधात आव्हान देणार आहे. (प्रतिनिधी)