शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाचे उमेदवार शुभेंदू सरकार यांना पळवून पळवून मारहाण; पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात कुठे काय घडले... 
2
Top Marathi News LIVE Updates: "चर्चेचे स्वागतच, पण धमक्या..." इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर फोडलं खापर
3
Petrol-Diesel Price Hike: पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीच्या चर्चांना पूर्णविराम; केंद्र सरकारचा मोठा खुलासा
4
२०२६ मध्ये उन्हाचा कहर! AC-कूलरही होतील फेल? बाबा वेंगा यांची धडकी भरवणारी भविष्यवाणी
5
आता खासगी शाळांमध्येही फक्त NCERT पुस्तके, महागड्या पुस्तकावर बंदी; NHRC ने राज्यांना दिला ३० दिवसांचा वेळ
6
IPL 2026: MI vs CSK मॅचआधी चेन्नईला मोठा धक्का; खेळाडूच्या आईचे निधन, सामन्याला मुकणार!
7
मुंबईतून दुपारी सुटणाऱ्या ‘वंदे भारत’ ट्रेनचे टाइमटेबल बदलले, नवीन वेळ काय? कधी होणार लागू?
8
Trinamool Congress vs BJP: तृणमूल अन् भाजप यांच्यात थेट लढत; ‘तिसरी आघाडी’मुळे कोणाचा स्वप्नभंग
9
“ते इथे येतात, मुले जन्माला घालतात अन्...”; ट्रम्प यांच्याकडून भारताची थेट नरकाशी तुलना?
10
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
11
तामिळनाडूमध्ये ५.७३ कोटी मतदार ठरवणार ४,०२३ उमेदवारांचे भवितव्य, 'या' जागांवर सर्वांची नजर
12
PM Internship Scheme 2026: आता १८ ते २५ वर्षांच्या तरुणांना मिळणार ₹९००० चं स्टायपेंड; नियमांमध्ये झाला मोठा बदल
13
वरातीदरम्यान, कुत्र्याचा धुमाकूळ, ६० जणांचा घेतला चावा, वाचण्यासाठी वऱ्हाड्यांची पळापळ  
14
ताडगोळ्यांना इंग्रजीत काय म्हणतात माहीत आहे का? हे पाणीदार फळ कुणी खावं, कुणी टाळावं?
15
IPL 2026: 'ती' गोष्ट केल्याशिवाय वैभव सूर्यवंशी मैदानात उतरत नाही; खुद्द त्यानेच केला खुलासा
16
पैसा, प्लॉट, घर गेले, मातृछत्रही हरवले, ‘त्या’ शहीदपुत्राची हृदयद्रावक कहाणी! नोकरीसाठी २ कोटींची फसवणूक
17
"TCS मध्ये नेटचा पासवर्ड अश्लील भाषेत, धार्मिक भावना दुखावल्या"; पीडितेने सांगितली आपबिती
18
Vastu Tips: झोपताना उशीखाली ठेवा 'या' घरगुती वस्तू; नशीब पालटायला वेळ लागणार नाही!
19
US Israel Iran War : जगावर महागाईचं संकट! होर्मुझमधील सुरुंग काढायला लागणार सहा महिने; पेंटागॉनने वर्तवली भीती
20
रिपोर्ट! कामाचा दबाव, नोकरी जाण्याची भीती; 'टॉक्सिक वर्क कल्चर'मुळे दरवर्षी ८ लाखाहून अधिक मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

नदी सौंदर्यीकरणासाठी चार कोटींना मान्यता

By admin | Updated: May 23, 2016 00:24 IST

परतवाडा-अचलपूर या जुळ्या शहराच्या नदी सौंदर्यीकरणासाठी चार कोटी रुपयांचा योग्य विनियोग करण्यासोबत घरकुलाचे अर्ज त्वरित

नगरविकास राज्यमंत्र्यांची बैठक : जुळ्या शहरात महिलांसाठी शौचालयपरतवाडा : परतवाडा-अचलपूर या जुळ्या शहराच्या नदी सौंदर्यीकरणासाठी चार कोटी रुपयांचा योग्य विनियोग करण्यासोबत घरकुलाचे अर्ज त्वरित आॅनलाईन करा व जुळ्या शहरातील महिलांसाठी आवश्यक ठिकाणी शौचालये उभारण्याच्या सूचना नगरविकास तथा गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना शुक्रवारी परतवाडा येथील शासकीय विश्रामगृहावर दिल्या.यावेळी शहरातील प्रसिद्ध अस्थिरोग तज्ज्ञ राजेश उभाड, भाजपचे सरचिटणीस गजानन कोल्हे, जिल्हाध्यक्ष रूपेश ढेपे, नीलेश सातपुते, प्रवीण तोंडगावकर, राजा पिंजरकर, सुधीर रसे, साहेबराव काठोळे, राजेंद्र जैस्वाल यांच्यासह मोठ्या संख्येने भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते. अचलपूर नगरपालिकेला नदी सौंदर्यीकरणांतर्गत ४ कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला असून त्यावर योग्य पद्धतीने तो खर्च करावा, त्यासाठी तज्ज्ञाची मदत घेण्याच्या सूचना रणजित पाटील यांनी मुख्याधिकारी धनंजय जावळीकर यांना दिल्यात. घरकुलाची आॅनलाईन प्रक्रिया तत्काळ करून शासनाला अहवाल पाठविण्याचे निर्देश दिले, तर सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या थकबाकी देण्याची मागणी अनिल तायडे यांनी केली. (प्रतिनिधी)नातवाला लाईन, जावायाची बदलीराज्यमंत्री रणजित पाटील यांच्याकडे शहराच्या समस्यांसोबत आपल्या परिवारातील समस्यासुद्धा काही भाजप पदाधिकाऱ्यांनी मांडल्यात. अचलपूर शहरात विद्युत पुरवठा सतत खंडित होत असल्याने नागरिकांना उकाड्याचा मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचे सांगण्यात आले. मात्र सोबत आपणास ‘नातू’ झाला तोसुद्धा लाईन व उकाड्याने झोपत नाही. तेव्हा वीज मंडळाला ताकिद देण्याच्या ओघात या वरिष्ठ पदाधिकाऱ्याने सांगून टाकले. सोबत या त्रासापासून नातवाचा बचाव करण्यासाठी हजार रुपयांचा बॅटरीवाला पंखा आणल्याची पावती जोडली. पुन्हा शहरातील रस्ते फारच खड्डेमय झाले असल्याची सर्वसामान्य तक्रार करीत, जाता जाता माझ्या जावायाची बदली करून देण्याची गळ घालताच एकच हशा पिकला.महिलांसाठी शौचालयपरतवाडा-अचलपूर या जुळ्या शहरात महिलांसाठी कुठेच शौचालय नसल्याने त्यांची मोठ्या प्रमाणात कुचंबना होते. जुळ्या शहरात आवश्यक त्या ठिकाणी शौचालय तयार करण्याचे निर्देश यावेळी नगरविकास राज्यमंत्र्यांनी दिले. शिक्षक व इतर क्षेत्रातील नागरिकांनी मोठ्या संख्येने आपल्या समस्या यावेळी मांडल्या.