शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
2
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
3
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
4
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
5
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
6
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
7
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
8
कोल्हापूर जिल्ह्यात नीट परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याची पालकांची तक्रार; नेमकं काय घडलं?
9
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
10
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
11
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
12
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
13
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
14
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
15
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
16
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
17
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
18
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
19
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
20
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
Daily Top 2Weekly Top 5

मेळघाटात टेम्बली गावात वनविभागाची ड्रोनने शोधमोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2021 05:01 IST

धारणी तालुक्यातील चिपोली व जुटपाणी गावाजवळ ४० आदिवासी नागरिक व लहान मुलांना चावा घेणारे दोन लांडगे मृतावस्थेत आढळून आले. त्यातील एकाला रेबीज असल्याचा अहवाल प्राप्त झाल्याने वन आणि व्याघ्र प्रकल्पाच्या जंगलात सुरक्षा वाढविली आहे. ड्रोननेसुद्धा शोधमोहीम चालवली असून दिसताच ट्रँक्यूलाईझ करणारी टीम तयार असून, वरिष्ठांच्या निर्देशानुसार विविध उपाययोजना होत आहेत. 

 नरेंद्र जावरेलोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : धारणी तालुक्यातील टेम्बली गावात पुन्हा एक लांडगा गावशिवारावर आढळून आल्याची माहिती मिळताच मंगळवारी वनविभाग, व्याघ्र प्रकल्पाच्या चमूसह विशेष टीमने ठिय्या दिला आहे. ड्रोन कॅमेऱ्याने वनकर्मचाऱ्यांनी शोध मोहीम चालविली आहे. परंतु, अद्याप काहीच आढळून आलेले नाही. तथापि, गावागावात दवंडी पिटून मुले व वयोवृद्धांना घराबाहेर न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे. धारणी तालुक्यातील चिपोली व जुटपाणी गावाजवळ ४० आदिवासी नागरिक व लहान मुलांना चावा घेणारे दोन लांडगे मृतावस्थेत आढळून आले. त्यातील एकाला रेबीज असल्याचा अहवाल प्राप्त झाल्याने वन आणि व्याघ्र प्रकल्पाच्या जंगलात सुरक्षा वाढविली आहे. मुख्य वनसंरक्षक जयोती बॅनर्जी, उपवनसंरक्षक गिन्नी सिंग, उपवनसंरक्षक विनोद डेहनकर, सहायक वनसंरक्षक विद्या वसव व इंद्रजित निकम घटनाक्रमाचा आढावा घेत आहेत. आरएफओ शुभांगी डेहनकर, पुष्पा सातारकर व राजेश महल्ले, आरआरटी, आरआरयू टीम, धारणी, सुसर्दा, धूळघाट, ढाकणा येथील वनपाल व  वनकर्मचारी चार दिवसांपासून दिवस-रात्र जंगलासह गावपरिसरात तळ ठोकून आहेत. सर्व पाच टीम गावात सज्ज आहेत. ड्रोननेसुद्धा शोधमोहीम चालवली असून दिसताच ट्रँक्यूलाईझ करणारी टीम तयार असून, वरिष्ठांच्या निर्देशानुसार विविध उपाययोजना होत आहेत. 

कोरकू भाषेतून मुनादी जंगलाकडे जाणाऱ्यांनी सावधगिरी बाळगावी, अशी मुनादी कोरकू भाषेतून दिली जात आहे. लहान मुले व वृद्धांना  घराबाहेर न निघण्याचा सल्ला वनविभागाने दिला आहे. 

टेंबली गावाच्या परिसरात मंगळवारी एक लांडगा दिसल्याची माहिती मिळताच सर्व टीमने दिवसभर तेथे शोधमोहीम राबविली.  ड्रोन कॅमेऱ्याची मदत घेण्यात आली आहे. मुले व वृद्धांना घराबाहेर न पडण्याचा सल्ला दिला जात आहे. - शुभांगी डेहनकर, वनपरिक्षेत्र अधिकारी, सुसर्दा, ता. धारणी

 

टॅग्स :forest departmentवनविभाग