शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
4
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
5
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
6
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
7
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
8
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
9
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
10
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
11
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
12
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
13
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
14
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
15
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
16
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
17
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
18
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
19
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
20
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादीच्या अंतर्गत वादातून न्यायालयात पाच याचिका

By admin | Updated: July 28, 2014 23:18 IST

महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुरु असलेल्या अंतर्गत वादातून आजतागायत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात पाच याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. परिणामी अविनाश मार्डीकर यांना

गणेश वासनिक - अमरावतीमहापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुरु असलेल्या अंतर्गत वादातून आजतागायत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात पाच याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. परिणामी अविनाश मार्डीकर यांना सतत न्यायालयाच्या येरझारा माराव्या लागत आहे. अविनाश मार्डीकरविरुध्द् सुनील काळे यांच्यात निर्माण होत असलेल्या लहान-सहान बाबी न्यायालयात पोहचत असल्याने चर्चेला उधाण आले आहे.लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने अमरावतीची उमेदवारी आ. रवि राणा यांच्या पत्नी नवनीत राणा यांना घोषित केली. मात्र या पक्षनिर्णयाविरुध्द राष्ट्रवादीचे तत्कालीन प्रदेश सचिव संजय खोडके यांनी जोरदार विरोध केला. नवनीत राणांचा प्रचार करणार नाही, ही आग्रही भूमिका घेतली. परिणामी पक्षश्रेष्ठींनी खोडके यांना राष्ट्रवादीतून निष्कासित केले. यावेळी महापालिकेतील १७ सदस्य संख्या असलेल्या राष्ट्रवादीच्या १० सदस्यांनी खोडकेंसोबत तर उर्वरित ७ सदस्य हे राष्ट्रवादी पक्षासोबत गेलेत. त्यापैकी सुनील काळे यांना राष्ट्रवादीचे गटनेते म्हणून घोषित करण्यात आले. याच दरम्यान संजय खोडके यांनी वऱ्हाड विचार मंच स्थापन करुन बसप उमेदवार गुणवंत देवपारे यांना जाहीर समर्थन दिले. मात्र लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या उमेदवार नवनीत राणा यांचा पराभव झाला. या पराभवात खोडके आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावल्याने पराभवाचे उट्टे काढण्यासाठी महापालिकेत राष्ट्रवादीमध्ये अंतर्गत वाद उफाळून आला. आ. रवी राणा यांच्या नेतृत्वात गटनेते सुनील काळे, उपमहापौर नंदकिशोर वऱ्हाडे यांनी खोडके समर्थक सदस्यांना लक्ष्य केले. यात प्रथम शासनाकडून एलबीटी तुट भरुन काढण्यासाठी महापालिकेला मुलभूत सोईसुविधांचे प्राप्त २५ कोटींच्या अनुदानापैकी १२.५० कोटींतून बडनेरा मतदारसंघात करावयाच्या विकास कामांच्या अनुदानाला ‘टार्गेट’ करण्यात आले. या अनुदानातून जास्त कामे ही राणा यांनी सुचविल्यानुसार व्हावी, त्याकरिता थेट मंत्रालयातून पत्रव्यवहार सुरु झाला. विभागीय आयुक्त, महापालिका आयुक्तांना मुख्यमंत्र्यांचे आदेश प्राप्त झाले. या विकास कामांच्या यादीत थेट मंत्रालयातून हस्तक्षेप आणि खोडके गटाच्या सदस्यांना डावलण्याचा प्रकार सुरु होताच रवी राणांचे दवाबतंत्र रोखण्यासाठी महापालिकेतील खोडके गटाचे अविनाश मार्डीकर, शिवसेनचे विरोधी पक्षनेते प्रशांत वानखडे, बसप गटनेते अजय गोंडाणे यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. १२.५० कोंटीच्या विकास कामांचा वाद अद्यापही न्यायालयात प्रलंबित आहे. येत्या विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होईपर्यंत हा वाद निकाली निघण्याचे चिन्हे नाहीत. त्यानंतर सुनील काळे यांच्या तक्रारीवरुन अविनाश मार्डीकरांच्या गटनेतेपदावर गंडातर आले. विभागीय आयुक्तांनी सुनील काळे यांची राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी नियुक्तीची कार्यवाही करण्याबाबतचे पत्र महापालिकेला पाठविले. या पत्राचा आधार घेत जून महिन्याच्या सर्वसाधारण सभेत पिठासीन सभापती नंदकिशोर वऱ्हाडे यांनी काळे यांची गटनेतेपदी नियुक्ती केली. या निर्णयाविरुध्द मार्डीकर यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका सादर केली आहे. या याचिकेवर निर्णय लागला नाही, हे विशेष. हा वाद कायम असताना चेतन पवार, अविनाश मार्डीकर, रिना नंदा व मिलिंद बांबल यांनी पक्षविरोधी कारवाया केल्याप्रकरणी त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई करावी, अशी याचिका सुनील काळे यांनी विभागीय आयुक्तांकडे सादर केली आहे. मात्र निकाल आपल्या विरोधात राजकीय दबावापोटी लागण्याचे संकेत मिळताच अविनाश मार्डीकर यांनी विभागीय आयुक्तांच्या या निर्णयाविरुध्द २३ जुलै रोजी ‘प्रोटेक्शन’ याचिका सादर केली आहे. या याचिकेवर म्हणणे ऐकूण घेण्यासाठी ३० जुलै ही तारीख उच्च न्यायालयाने निश्चित केली आहे. या प्रकरणी न्यायालयात काय? निकाल लागतो, याकडे लक्ष लागले आहे.या याचिकेवर न्याय निर्वाळा देताना विभागीय आयुक्तांनी अविनाश मार्डीकर यांचे सदस्यत्व २४ जुलै रोजी अपात्र ठरविले आहे.