शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
2
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
3
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
4
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
5
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
6
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
7
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
8
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
9
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
10
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
11
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
12
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
13
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
14
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
15
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
16
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
17
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
18
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
19
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
20
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
Daily Top 2Weekly Top 5

पाच दिवसांच्या मुलीला बेडवर आपटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:13 IST

अचलपूर : पाच दिवसांच्या नवजात मुलीचे दोन्ही पाय पकडून तिला बेडवर आपटल्याची अमानुष घटना सायन (मुंबई) येथे घडली. याप्रकरणी ...

अचलपूर : पाच दिवसांच्या नवजात मुलीचे दोन्ही पाय पकडून तिला बेडवर आपटल्याची अमानुष घटना सायन (मुंबई) येथे घडली. याप्रकरणी सुलतानपुरा येथील ३१ वर्षीय माहेरवासिनीच्या तक्रारीवरून सरमसपुरा पोलिसांनी आरोपी समी महेंद्र व्हटकर, महेंद्र तुकाराम व्हटकर, प्रतीक महेंद्र व्हटकर, महेश व्हटकर व एक महिला (सर्व रा. व्ही.एन. पुरव मार्ग, मुंबई) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

सुलतानपुरा येथील एका मुलीचे सायन येथील समी व्हटकर याचेशी सन २०११ मध्ये लग्न झाले. लग्नानंतर पतीसह सासरच्या मंडळीने हुंड्याची मागणी केली. त्यानंतर पीडिताला मुलगी झाल्याने छळ वाढला. त्या नवजात मुलीला आम्ही दहाव्या माळ्यावरून फेकून देऊ, तिला मारून टाकू, ही कशाला जन्माला आली, असे म्हणून सासरा महेंद्र व्हटकर याने त्या ५ दिवसांच्या मुलीचे दोन्ही पाय पकडून बेडवर आपटले. तिच्या बचावाकरिता पीडिता गेली असता, तिला व मुलीला जिवे मारण्याची धमकी देण्यात आली. सदर प्रकरण महिला सेललादेखील पाठविण्यात आले. मात्र, तेथे समझोता न झाल्याने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. त्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदविला.