शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

मुंगी कोळीच्या नराची देशातील पहिली नोंद मेळघाटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 11:14 IST

Amravati news मुंगी कोळीच्या नराची देशातील पहिली नोंद मेळघाटात घेण्यात आली आहे. दर्यापूरचे प्राध्यापक डॉक्टर अतुल बोडखे व त्यांच्या सहकाऱ्यांनी 2019 मध्ये पहिल्यांदा मेळघाटात या मुंगी कोळीच्या  नराला शोधून काढले होते. 

ठळक मुद्देमेळघाटात कोळीच्या २०४ प्रजाती

अनिल कडूलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती: मुंगी कोळीच्या नराची देशातील पहिली नोंद मेळघाटात घेण्यात आली आहे. दर्यापूरचे प्राध्यापक डॉक्टर अतुल बोडखे व त्यांच्या सहकाऱ्यांनी 2019 मध्ये पहिल्यांदा मेळघाटात या मुंगी कोळीच्या  नराला शोधून काढले होते.  मेळघाट व्याघ्र अभयारण्य, रंगूबेली तापी परिसर, धारखोरा धबधबा परिसर व घटांगच्या पुढील नबाब नाला परिसरात हा कोळी (स्पायडर ) त्यांना आढळून आला.

              यानंतर 2021 मध्ये प्राधिकृत सूत्रांनी अधिकृतपणे यास मान्यता दिली. या मान्यतेनंतर मेळघाटात घेतल्या गेलेली ही नोंद देशातील पहिली नोंद ठरली आहे. मोर्फोलॉजी पुष्टीकरण आणि जागतिक शास्त्रज्ञांच्या पुनरावलोकनानंतर यावर हे शिक्कामोर्तब झाले आहे.              ट्रोकीझोडियम व्हेरीडूरबीयम नावाचा हा कोळी (स्पायडर ) असून मुंगीसारखा तो दिसतो. हा कोळी पूर्णपणे निशाचर असून जमिनीवर राहतो. तो आपले जाळे विणत नाही. झाडांच्या पालापाचोळ्याखाली तो आढळून येतो. हा कोळी(स्पायडर) मुंग्या आणि उधळीला खातो. झाडांना हानी पोहोचविणाऱ्या लहान किड्यांना मारतो. कीड नियंत्रणाचे काम  करतो.

               मेळघाटात स्पायडरच्या 204  प्रजाती आहेत. सातपुड्यातील स्पायडरच्या  जैवविविधते अंतर्गत हा कोळी नर नोंदल्या गेला.  यावर दयार्पूरच्या जे डी पाटील सांगळुदकर  महाविद्यालयातील स्पायडर रिसर्च प्रयोगशाळेत अभ्यास केल्या गेला. या दरम्यान सुभाष कांबळे, डॉ.गजानन संतापे, डॉ. महेश चिखले, डॉ.सावन देशमुख यांचे डॉ अतुल बोडखे यांना सहकार्य लाभले. डॉ. अतुल बोडखे यांनी केलेल्या या संशोधनात, तपासात डॉ. व्ही पी उनियाल आणि भारतीय वन्यजीव संस्थेच्या डॉ. शाझिया क्वेशीन यांचे मार्गदर्शन राहले. दर्यापूर येथील या स्पायडर रिसर्च प्रयोगशाळेने आतापर्यंत स्पायडरच्या 17 प्रजाती समर्पित केल्या आहेत.

          यापूर्वी  मुंगी कोळीच्या मादीची पहिली नोंद 2016 मध्ये गांधिनगर( गुजरात) मधील  पलाजजवळील अरण्यपार्कमध्ये, प्रजापती आणि अन्य दोघांनी घेतली होती.          मुंगी कोळी नरासोबतच मेळघाटात मादी मुंगी कोळीसुद्धा वास्तव्यास आहेत. मेळघाटात 204 हुन अधिक स्पायडरच्या(कोळी) प्रजाती आहेत. नव संशोधकांनी यांच्या अभ्यासाकडे वळायला हवे. दर्यापूर येथील सुसज्ज अशा स्पायडर रिसर्च लॅबचा त्यांनी अभ्यासाकरिता उपयोग घेण्याची गरज असल्याचे मत डॉ अतुल बोडखे यांनी या अनुषंगाने व्यक्त केले. 

टॅग्स :wildlifeवन्यजीव