शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

वडील घरफोडीत, मुलगा दुचाकीचोरीत माहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2020 06:00 IST

शेख आसिफ याचे वडील शेख छोटू शेख दिलावर याच्याविरुद्ध घरफोडी आणि चोरीच्या गुन्ह्यांच्या नोंदी आहेत. शेख छोटूला काही दिवसांपूर्वी राजापेठ पोलिसांनी घरफोडीच्या गुन्ह्यात रंगेहाथ अटक केली होती. त्याने शहरातील चार घरफोड्यांची कबुली दिली. त्याच्याकडून लाखो रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. सध्या तो मध्यवर्ती कारागृहात आहे. यादरम्यान शेख छोटूचा मुलगा शेख आसिफ अमरावतीत दाखल झाला.

ठळक मुद्देबाप से बेटा सवाई : आरोपी शेख छोटू आणि शेख आसिफ ऊर्फ ईल्लीचे कारनामे

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : ‘बाप से बेटा सवाई’ ही म्हण घरफोडी आणि दुचाकीचोरीत मग्न आरोपी पिता-पुत्राला तंतोतंत लागू होते. शेख छोटू शेख दिलावर ऊर्फ ईल्ली नामक आरोपी घरफोडीत, तर त्याचा मुलगा शेख आसिफ शेख छोटू ऊर्फ ईल्ली हा दुचाकीचोरीत माहीर असल्याचे निदर्शनास आले. राजापेठ पोलिसांनी काही दिवसांपूर्वी शेख छोटूकडून घरफोडीतील मुद्देमाल जप्त केला, तर कोतवाली पोलिसांनी शुक्रवारी शेख आसिफकडून चार दुचाकी जप्त केल्या आहेत.रोशन मधुकर दुसरे (३१, रा. पोटे टाऊनशिप) यांची एमएच २७ एजी ८४४३ या क्रमांकाची दुचाकी बसस्थानक रोडवरील विश्रामगृह परिसरातून ८ जानेवारी रोजी लंपास करण्यात आली होती. त्यांच्या तक्रारीवरून कोतवाली पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध गुन्हा नोंदविला. पोलिसांनी तपासादरम्यान शेख आसिफ शेख छोटू ऊर्फ ईल्ली व आणखी एका दुचाकीचोराला सापळा रचून रंगेहात पकडले. त्याच्याकडून १ लाख २८ हजारांच्या चार दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या.शेख आसिफ याचे वडील शेख छोटू शेख दिलावर याच्याविरुद्ध घरफोडी आणि चोरीच्या गुन्ह्यांच्या नोंदी आहेत. शेख छोटूला काही दिवसांपूर्वी राजापेठ पोलिसांनी घरफोडीच्या गुन्ह्यात रंगेहाथ अटक केली होती. त्याने शहरातील चार घरफोड्यांची कबुली दिली. त्याच्याकडून लाखो रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. सध्या तो मध्यवर्ती कारागृहात आहे. यादरम्यान शेख छोटूचा मुलगा शेख आसिफ अमरावतीत दाखल झाला. त्याने शहरातून चार दुचाकी चोरल्या. कोतवाली हद्दीतील दोन गुन्हे आणि राजापेठ हद्दीतील एका गुन्ह्याची कबुली पोलिसांना दिली. त्याच्याकडून आणखी दुचाकीचोरीचे गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे. त्या अनुषंगाने पोलीस तपास करीत आहेत. घरफोडी आणि दुचाकी चोरीतील आरोपी पितापुत्रांचे हे कारनामे पोलिसांसाठी डोकेदुखी ठरत आहे. घरफोडीच्या गुन्ह्यात अटक झाल्यानंतर कारागृहात जाणे आणि बाहेर येताच पुन्हा घरफोड्या आणि दुचाकी चोरण्यात हे पिता-पुत्र माहीर असल्याची चर्चा पोलीस वर्तुळात आहे.यांनी केली कारवाईपोलीस उपायुक्त शशिकांत सातव, सहायक पोलीस आयुक्त सुहास भोसले यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक शिवाजी बचाटे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक गजानन राजमलू, सहायक पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र उमक, पोलीस हवालदार नीलेश जुनघरे, जुनेद खान, आशिष विघे, इम्रान खान यांनी या गुन्ह्याचा छडा लावण्यासाठी परिश्रम घेतले.

टॅग्स :ThiefचोरPoliceपोलिस