शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
2
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
3
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
4
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
5
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
6
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
7
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
8
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
9
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
10
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
11
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
12
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
13
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
14
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
15
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
16
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
17
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
18
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
19
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
20
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
Daily Top 2Weekly Top 5

बांबू व्यवसायातून शेतकऱ्यांची समृद्धी

By admin | Updated: January 2, 2017 01:08 IST

बांबू प्रजातीचे संवर्धन व संगोपन बांबू शेतीपूरक व्यवसाय होण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे.

प्रवीण पोटे यांचे प्रतिपादन : वडाळीतील बांबू उद्यानाचे लोकार्पण अमरावती : बांबू प्रजातीचे संवर्धन व संगोपन बांबू शेतीपूरक व्यवसाय होण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. बांबू व्यवसायसुद्धा शेतकऱ्यांना आर्थिक समृद्धीकडे नेणारा ठरू शकतो, असे प्रतिपादन पालकमंत्री प्रवीण पोटे मध्यवर्ती रोप वाटिकेतील वडाळी बांबू उद्यानाचे लोकार्पण सोहळ्यानिमीत्त केले. रविवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास वडाळी वनविभाग कार्यालय परिसरातील मध्यवर्ती रोप वाटिकेजवळील नवनिर्मित बांबू उद्यानाचे पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी व्यासपीठावर आ. सुनील देशमुख, मुख्य वनसंरक्षक संजीव गौड, उपवनसंरक्षक हेमंतकुमार मीना, सामाजिक वनिकरणाचे उपसंचालक मसराम, नगरसेविका सपना ठाकूर उपस्थित होते. उद्घाटनीय भाषणात पालकमंत्री म्हणाले की, देशभरातील बांबू प्रजातीपैकी या बांबू उद्यानात ६३ प्रजाती आहेत. महाराष्ट्रातील सर्वात सुंदर व देखणे हे बांबू उद्यान अमरावतीच्या वैभवात भर टाकणारेच आहे. ते उद्यान रविवारी अमरावतीकरांसाठी खुले झाले असून या उद्यानातच कॅक्टस उद्यानसुद्धा आहे. हे उद्यान नवीन वर्षानिमित्त नागरिकांना भेट असल्याचे सांगून बांबू उद्यान निर्मितीत परिश्रम घेणाऱ्या वडाळी वनपरिक्षेत्र अधिकारी पडगव्हाणकर, सलीम व राऊत यांचे पालकमंत्र्यांनी कौतुक केले. संचालन पक्षी अभ्यासक यादव तरटे, प्रास्ताविक उपवनसंरक्षक हेमंतकुमार मिना, तर आभार वडाळी वनपरिक्षेत्राचे एच.व्ही. पडगव्हाणकर यांनी केले. यावेळी कॅक्टस गार्डन विकसित करणारे किशोर राऊत, बांबू गार्डनसाठी श्रम घेणारे सैय्यद शेख सलीम, वन्यजीव अभ्यासक स्वप्निल सोनोने, पक्षीअभ्यासक जयंत वडतकर, वन्यजीवप्रेमी व नागरिक उपस्थित होते. (प्रतिनिधी)