शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
2
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
3
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
4
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
5
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
6
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
7
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
8
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
9
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
10
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
11
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
12
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
13
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
14
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
15
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
16
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
17
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
18
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
19
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
20
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
Daily Top 2Weekly Top 5

पेरणी पूर्वमशागतीत शेतकरी व्यस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2021 04:12 IST

कावली वसाड : पावसाळा काही दिवसांवर येऊन ठेपल्याने खरीप हंगामाच्या पूर्वमशागतीला वेग आला आहे. बळीराजा शेतीच्या कामात व्यस्त ...

कावली वसाड : पावसाळा काही दिवसांवर येऊन ठेपल्याने खरीप हंगामाच्या पूर्वमशागतीला वेग आला आहे. बळीराजा शेतीच्या कामात व्यस्त असल्याचे दिसत आहे.

शेतातील काडीकचरा वेचून जमिनीची ट्रॅक्‍टरच्या साह्याने नांगरणी, वखरणी तसेच आपल्या शेतातील धुरे, बांध जेसीबीच्या साह्याने व्यवस्थित करताना शेतकरी दिसत आहे. रासायनिक खताचे दर अधिकच वाढल्याने ते शेतकऱ्यांना परवडणारे नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपला मोर्चा शेणखताकडे वळविला आहे. शेतकऱ्यांनी यंदा मोठ्या प्रमाणात शेणखताची खरेदी सुरू केली आहे. या परिसरात मोठ्या प्रमाणात दुग्ध व्यवसाय असल्याने जनावरांची संख्या अधिक प्रमाणात आहे. त्यामुळे शेणखताची निर्मितीसुद्धा मोठ्या प्रमाणात होत असल्याने व ती शेतकऱ्यांना परवडणारी असल्यामुळे शेणखताची खरेदी वाढली आहे. शेणखतामुळे जमिनीचा पोत कायम राहत असल्याने यावर्षी शेणखताची खरेदी मोठ्या प्रमाणात केल्याचे शेतकऱ्यांनी यावेळी सांगितले.

बॉक्स

शेणखताकडे वाढला शेतकऱ्यांचा कल

सध्या शेतकरी आपल्या शेतात शेणखत टाकत असल्याचे चित्र दिसत आहे. परिणामी खरीप हंगामातील मशागतीला वेग आला आहे. कोरोनाला न जुमानता शेतीची कामे वेळेत पूर्ण करावी लागत असल्याने त्याकडे लक्षसुद्धा देत नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

बॉक्स

आर्थिक जुळवाजुळवीचे शेतकऱ्यांपुढे आव्हान

यंदा अल्प उत्पन्नामुळे शेतकऱ्यांची अर्थव्यवस्था ढासळलेली असली तरी येणाऱ्या हंगामात शेतीसाठी बी बियाणे आणण्यासाठी पैशांची जुळवाजुळव करणे हे सर्व शेतकऱ्यांसमोर मोठे आव्हान ठरत आहे.