शहरं
Join us  
Trending Stories
1
परदेश दौरे बंद अन् ताफा अर्ध्यावर; मुख्यमंत्र्यांचे कडक आदेश, मंत्री-अधिकारी एक दिवस बस-मेट्रोने फिरणार
2
PM मोदींच्या आवाहनाचा परिणाम! इंधन बचतीसाठी सुवेंदू अधिकारी यांचाही पुढाकार; DGP ना दिला मोठा आदेश
3
नाशिक कुंभमेळ्याचा 'महाप्लॅन' तयार; प्रत्येक आखाड्याला ५ कोटींचा निधी- एकनाथ शिंदे
4
नरेंद्र मोदींचा कृतीतून संदेश! पंतप्रधानांच्या ताफ्यात फक्त दोन कार, राजधानी दिल्लीतील व्हिडीओ व्हायरल
5
“नेपाळ-बांगलादेशप्रमाणे GenZ ने भारतातही रस्त्यावर उतरायला हवे”; केजरीवाल असे का म्हणाले?
6
PM मोदींचे आवाहन सकारात्मकतेने घेणं गरजेचं, विरोधकांनी थट्टा करू नये- मुख्यमंत्री फडणवीस
7
“जो सामील असेल, त्यावर कारवाई व्हायला हवी”; NEET पेपर लीक प्रकरणी CM फडणवीसांनी केले स्पष्ट
8
Travel : लडाखमध्ये इंजिन बंद असूनही गाड्या आपोआप चढतात डोंगर; या 'मॅग्नेटिक हिल'चं रहस्य काय?
9
विराटकडून प्रेरणा; आईच्या मार्गदर्शनाखाली फिटनेस स्तर उंचावला! IPL गाजवणाऱ्या साईची खास गोष्ट
10
भयंकर! फक्त एका लिंबूसाठी १२ वर्षांच्या मुलाची हत्या; संतप्त जमावाकडून पोलिसांवर दगडफेक
11
PM मोदी म्हणाले, १ वर्ष सोनं खरेदी करू नका; पण चांदीबद्दल काहीच का नाही बोलले? दर वर्षी किती चांदी खरेदी करतो भारत?
12
Top Marathi News Live: नागपूर विमानतळाला आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणून केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता
13
इराणचा 'डर्टी बॉम्ब'! एका स्फोटात शहरं होतील ओसाड; अमेरिकन नौदलाला हाय अलर्ट
14
देश मजबूत करू, PM मोदींना साथ देऊ! मुंबईकर आमदारांचा गोवा तेजस एक्स्प्रेसने प्रवास; म्हणाले…
15
STचे प्रवाशांसाठी मोठे पाऊल! १ जूनपासून सर्व स्वच्छतागृहे मोफत; प्रताप सरनाईकांची घोषणा
16
वर्दीतील देवदूत! हायवेवर Heart Attack आलेल्या चालकाचे वाचवले प्राण; इंटरनेटवर कौतुकाचा वर्षाव
17
पती हरवल्याची तक्रार घेऊन पोलीस ठाण्यात आली; तपास सुरू झाला, समोर आले पत्नीचे दोन आशिक अन्.. 
18
“मनमानी भाडेवाढ करणारे खासगी बस वाहतूकदार, अवैध प्रवासी ॲपवर कारवाई करा”: प्रताप सरनाईक
19
Huma Praveen : २ मुलींची जबाबदारी, १० वर्षे नोकरी, ५ वर्षे अपयश; किचनमध्ये केला अभ्यास, सून झाली ऑफिसर
20
LPG ग्राहकांसाठी सूचना! छोटीशी चूक तुम्हाला अडचणीत आणू शकते; सरकार लोकांना का करतंय अलर्ट?
Daily Top 2Weekly Top 5

आर्थिक संकटाच्या गर्तेत शेतकरी

By admin | Updated: December 2, 2014 22:58 IST

यंदाच्या हंगामात पेरणीपासून दोन महिने उशिरा पाऊस आल्यामुळे खरिपाचा हंगाम उद्ध्वस्त झाला. त्यामुळे उसणवारी घेऊन रबीची तयारी सुरू असताना शासकीय मदतीची प्रतीक्षा शेतकरी करीत आहे.

मदत केव्हा ? : उसणवारीवर दिवस काढण्याची वेळ
अमरावती : यंदाच्या हंगामात पेरणीपासून दोन महिने उशिरा पाऊस आल्यामुळे खरिपाचा हंगाम उद्ध्वस्त झाला. त्यामुळे उसणवारी घेऊन रबीची तयारी सुरू असताना शासकीय मदतीची प्रतीक्षा शेतकरी करीत आहे.
जमिनीत आर्द्रता नसल्यामुळे रबीची पेरणी ३० टक्क्यावर आली. वर आलेली हरभऱ्याची रोप कोमेजायला लागली आहे. कापसावर लाल्या, तुरीवर शेंग पोखरणाऱ्या अळीचा प्रकोप वाढला. निसर्गाचा दृष्टचक्र शेतकऱ्यांचा पिच्छा सोडायच्या मानसिकतेत दिसत नाही. त्यामुळे दुष्काळ जाहीर झाला. मात्र, प्रत्यक्षात कुठलीच मदत नाही. शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला आहे. अगदी उसणवारीवर दिवस काढण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.
अत्यल्प पावसामुळे खरिपाचा हंगाम गारद झाला. पेरणीचा कालावधी संपून गेल्यामुळे मूग, उडीद पीक पेरण्यातच आले नाही. निकृष्ट बियाण्यांअभावी दुबार, तिबार पेरणीची वेळ आली, उगवलेल्या सोयाबीनला वाढीसाठी कालावधी मिळालाच नाही. शेंगा फुलोरावर व भरण्याच्या अवस्थेत पावसाने दडी मारल्यामुळे शेंगा पोचट व दाणा बारकावला. परिणामी सोयाबीनच्या सरासरी उत्पन्नात ६० ते ८० टक्क्यांनी घट झाली. एकरी एक पोत्याचीही झडती होत नसल्याचे विदारक चित्र आहे. शेतकऱ्याजवळ होता नव्हता पैसा पीक पेरणी, मशागतीमध्ये खर्च झाला. उत्पादन खर्चाच्या अर्धेही उत्पन्न पदरी पडले नाही. यंदा कपाशीचा आधारदेखील शेतकऱ्यांना मिळाला नाही. कपाशीवर ‘लाल्या’चा प्रादुर्भाव आहे. जमिनीत ओलावा नसल्याने कपाशीची बोंड फुटत नाही. जी फुटली ती अर्धवट स्थितीत असल्यामुळे कपाशीच्या सरासरी उत्पन्नातदेखील ४० ते ६० टक्क्यांनी घट झाली आहे.
खरीप हातचा गेल्यानंतर रबी तरी साथ देईल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. परंतु रबीचा हंगाम दीड महिना उशिरा झाला. परिणामी रबीची पेरणीदेखील उशिरा सुरू झाली. जमिनीत आर्द्रता नाही. त्यामुळे हरभऱ्याची उगवणशक्ती कमी होत आहे. वर आलेली हरभऱ्याची रोपे कोमेजायला लागली आहे. तूर बहरात आली. परंतु शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रकोप झाला, आर्द्रतेअभावी फुलगळ झाली. गत दोन वर्षांपासून आलेल्या संकटांनी शेतकरी डबघाईस आला आहे. उत्पादन खर्चाच्या तुलनेत निम्मेही उत्पन्न नाही. खरिपाची आणेवारी ४६ पैसे जाहीर झाल्याने दुष्काळाच्या वास्तवावर शासनाने शिक्कामोर्तब केले. रोखीची मदत मात्र नाही. त्यामुळे दुष्काळाच्या दृष्टचक्रात शेतकऱ्यांसमोर अनेक समस्यांचा डोंगर उभा आहे. जगायचं कसं, दैनंदिन गरजा कशा भागवायच्या या विवंचनेत शेतकरी आहे.