शहरं
Join us  
Trending Stories
1
“१४ वर्षांचा वनवास संपला, स्वगृही परतलो, माझ्यात DNA…”; आनंद परांजपेंचा शिंदेसेनेत प्रवेश
2
“...तर महाराष्ट्र पुरोगामी राहिला असता”; प्रणिती शिंदेंचे विधान, गडकरींच्या कार्याची स्तुती
3
अरविंद केजरीवाल यांच्यासह ‘आप’च्या ५ नेत्यांच्या अडचणी वाढल्या; ‘या’ प्रकरणात खटला चालणार
4
भारतीय जहाजावरील हल्ल्यानंतर होर्मुझजवळ आणखी एक मोठी घटना; नांगर टाकलेल्या जहाजावर कब्जा, इराणच्या दिशेनं गेलं!
5
हिटमॅन रोहित शर्माने MS धोनीचा रेकॉर्ड मोडला, पण विराटला मागे टाकणं जमणार नाही, कारण...
6
सोन्यासंदर्भात सरकारचा आणखी एक मोठा निर्णय! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं खरेदी टाळण्याचं आवाहन 
7
PBKS vs MI : शार्दुल ठाकूरची कमाल! श्रेयस अय्यरचा असा घेतला बदला; अन्... (VIDEO)
8
‘एल-निनो’चा संभाव्य धोका, खरीप हंगामासाठी आवश्यक सज्जता ठेवा: शिवेंद्रसिंहराजे भोसले
9
अमेरिका इराण तणावामध्ये भारतासाठी चांगली बातमी, २ LPG टँकर्स 'होर्मुझ' पार करून पुढे निघाले!
10
Jasprit Bumrah : १३ वर्षांचा प्रवास; जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार! हार्दिक पांड्याचा विषय संपला?
11
ह्युंडाई स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणणार, काय काय फीचर्स असणार? टाटा पंच EV सह या कारना देणार टक्कर
12
जबरदस्त! १३८० किमी धावणार अन् तीन चाकांवरही पळणार! 'ही' नवी हायटेक इलेक्ट्रिक कार ऑटो विश्वात धुमाकूळ घालणार?
13
रशियाचे परराष्ट्र मंत्री PM मोदींना भेटले; तेल संकट, युक्रेन, परस्पर संबंध वाढवण्यावर चर्चा
14
देशातील परिस्थिती गंभीर, सर्वपक्षीय बैठक बोलवा, त्यात पंतप्रधानांनी हजर राहावे- शरद पवार
15
ममता बॅनर्जी खरंच वकील आहेत का, कागदपत्र सादर करा; बार कौन्सिलचे निर्देश, झाले तरी काय?
16
Vaibhav Suryavanshi In India A Squad : वैभव सूर्यवंशीला BCCI चं मोठं गिफ्ट; भारतीय ‘अ’ संघात निवड
17
HSRP बसवली नाही तर कडक कारवाई, नियमभंग केल्यास मोठा दंड होणार; किती शुल्क आकारले जाणार?
18
सुनेत्रा पवारांना मोठा धक्का, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचा राजीनामा; पत्रात काय?
19
Top Marathi News Live Updates: राष्ट्रवादी अजितदादा गटाला सोडचिठ्ठी देणारे आनंद परांजपे शिंदेंच्या शिवसेनेत जाणार
20
PM मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद, अग्रगण्य कंपनीचा मोठा निर्णय; 'अनावश्यक खर्च' टाळण्यासाठी बनवला मास्टर प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

शेतमालाचे भाव घसरले, शेतकरी चिंतातुर

By admin | Updated: June 14, 2014 23:03 IST

खरीप हंगाम आता तोंडावर आला आहे. बियाणे व खतांची दरवाढ होत असताना शेतमालाच्या बाजारभावात घसरण झाल्याने शेतकरी चिंतातुर झाला आहे.

मोर्शी : खरीप हंगाम आता तोंडावर आला आहे. बियाणे व खतांची दरवाढ होत असताना शेतमालाच्या बाजारभावात घसरण झाल्याने शेतकरी चिंतातुर झाला आहे.
जून महिन्यात विदर्भात पेरणीला सुरुवात होते. परंतु यंदा पाऊस लांबणीवर पडल्याने पेरण्या खोळंबल्या आहेत. शेतकऱ्यांची बियाणे खरेदीसाठी धावपळ सुरु आहे. काही शेतकरी आपला शेतमाल विकून धान्य खरेदी करण्याच्या तयारीत आहे. परंतु बाजार समितीत बाजारभावात कमालीची घसरण झाल्याने शेतकरी नाराज आहे. वाढती महागाई कमी करण्याची निवडणुकीदरम्यान भाजपक्षाने घोषणा केली होती. दुसरीकडे केंद्र शासनाने महागाई कमी करण्यासाठी काही ठोस उपाययोजना केलेल्या नाहीत; तथापि उद्या व्यापाऱ्यांना, कारखानदारांना भाव कमी करण्याची तंबी केंद्र शासनाने दिलीच, आणि भाव कमी करणे भाग पडलेच तर सध्या चढ्या भावाने खरेदी केलेला शेतमाल पुढे स्वस्तात विकावा लागेल. परिणामी नुकसान सहन करावा लागेल या भीतीपोटी व्यापारी वाढीव भावात शेतमाल खरेदी करण्यास टाळत आहे. परप्रांतीय व्यापारी आणि अडत्यांनी शेतमाल खरेदीत हात आखूडता घेतल्याचे अमरावती बाजार समितीतील एका अडत्याने येथील शेतकरी आणि पंचायत समितीचे माजी उपसभापती दिनेश मानकर यांना सांगितले. पार्डी येथील नारायणराव कुकडे यांना आला. त्यांनी दीड एकरात उन्हाळी भुईमुगाचे पीक घेतले. त्यांना १५ क्विंटल भुईमुंगाच्या शेंगा झाल्या. मोर्शी बाजार समितीत शेंगा विकल्या जात नाही. त्यामुळे त्यांनी अमरावती येथील बाजार समितीत भूईमुंग विक्री करीता नेला. तेथे भूईमुंगशेंगांना २१०० रुपये प्रतिव्किंटल भाव मिळाला. गेल्यावर्षी याच कालावधीत जवळपास ३५०० ते ४१०० रुपये प्रती क्विंटल भाव होता. कुकडे यांना भूईमुंगाच्या लागवडीपासून काढणीपर्यंत पाणी आणि विजेचा खर्च, स्वत:ची मजुरी वगळता एकूण ३२ हजार रुपये खर्च आला. अमरावती जिल्ह्यात आधीच भूईमुगाचा पेरा कमी आहे. तरीही भाव मिळत नसल्याने शेतकरी हताश झाला आहे. (तालुका प्रतिनिधी)