गुरुवारपर्यंत काही ठिकाणी मुसळधार

By Admin | Updated: August 12, 2015 00:11 IST2015-08-12T00:11:18+5:302015-08-12T00:11:18+5:30

उत्तर मध्यप्रदेश, बंगालचा उपसागर, उत्तर आंध्र प्रदेश आणि ओरिसा किनारपट्टीवर कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले

Extremely strong in some places till Thursday | गुरुवारपर्यंत काही ठिकाणी मुसळधार

गुरुवारपर्यंत काही ठिकाणी मुसळधार

हवामानाचा अंदाज : १८ आॅगस्टपर्यंत सार्वत्रिक पाऊस
अमरावती : उत्तर मध्यप्रदेश, बंगालचा उपसागर, उत्तर आंध्र प्रदेश आणि ओरिसा किनारपट्टीवर कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले असून पश्चिम उत्तर प्रदेश आणि हरियाणाच्या ३.१ किलोमीटर, सौराष्ट्र आणि कच्छच्या दीड किलोमीटर तर दक्षिण छत्तीसगड आणि लगतच्या विदर्भावर ३.१ किलोमिटर उंचीवर चक्राकार वारे आहेत. या स्थितीमुळे गुरुवारपर्यंत विदर्भातील काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता हवामान तज्ज्ञाने वर्तविली आहे.
बंगालच्या उपसागरात चक्राकार वाऱ्याचा प्रभाव असल्यामुळे लवकरच ठळक कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता आहे. तसेच कमी तिव्रतेचे वादळ ओरिसाकडे सरकरण्याची शक्यता हवामान तज्ज्ञाने वर्तविली आहे.
चिनमधील सोअ‍ेलर हे वादळ क्षमले असून त्यामुळे बंगालच्या उपसागरातील हालचाल वाढणार आहे. त्यामुळेच बुधवारपासून विदर्भात पावसाचे प्रमाण वाढण्याचे संकेत हवामान तज्ज्ञांनी दिले आहे. १२ ते १५ आॅगस्टपर्यंत विदर्भात सार्वत्रिक पाऊस पडण्याची शक्यता असून गुरुवारपर्यंत काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याचे संकेत आहे. तसेच १६ ते १८ आॅगस्टपर्यंत मध्यभारतात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान तज्ज्ञ अनिल बंड यांनी दिली. मंगळवारी जिल्ह्यात धो-धो पावसाला सुरुवात झाल्याने नदी-नाले दुथडी वाहू लागले आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Extremely strong in some places till Thursday