वरूडमध्ये पोलीस वसाहतीची उभारणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:32 IST2021-01-13T04:32:05+5:302021-01-13T04:32:05+5:30

वरूड : उद्घाटनाच्या प्रतीक्षेत असलेल्या येथील पोलीस निवास व नूतनीकरण करण्यात आलेल्या अत्याधुनिक सभागृहाचे उद्घाटन जिल्हा पोलीस अधीक्षक हरिबालाजी ...

Establishment of a police colony in Warud | वरूडमध्ये पोलीस वसाहतीची उभारणी

वरूडमध्ये पोलीस वसाहतीची उभारणी

वरूड : उद्घाटनाच्या प्रतीक्षेत असलेल्या येथील पोलीस निवास व नूतनीकरण करण्यात आलेल्या अत्याधुनिक सभागृहाचे उद्घाटन जिल्हा पोलीस अधीक्षक हरिबालाजी एन. यांच्या हस्ते करण्यात आले. ग्रामपंचायत निवडणुकीसंदर्भात तालुक्यातील पोलीस पाटील यांची बैठक यावेळी घेण्यात आली तसेच पोलीस वाचनालयाचे लोकार्पण करण्यात आले.

ठाणेदार तथा आयपीएस श्रेणीक लोढा यांच्या विनंतीवरून पोलीस अधीक्षक हरी बालाजी यांनी पोलीस वाचनालयासाठी स्थानिक संचालक म्हणून किशोर तडस, तारेश देशमुख यांची कार्यकारी संचालक म्हणून, तर डॉ. मनोहर आंडे, डॉ. राजेंद्र राजोरिया, नितीन खेरडे, विवेक बुरे यांची तज्ज्ञ संचालक म्हणून तीन वर्षांकरिता निवड केली आहे. नीट परीक्षेत उत्तीर्ण होऊन वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी प्रवेशित विद्यार्थ्यांना पुस्तके भेट देऊन उफविभागीय पोलीस अधिकारी कविता फडतरे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला डॉ. रूपाली जैन, जितेन शहा, कपूर धरमठोक, दुर्गदास शेगेकर, विनय शहा, सुनील जैन, प्रफुल अनासाने, प्रवीण वाढबुद्धे, समीर श्रीराव, डॉ. विजय देशमुख, बाळा चांगदे आदी उपस्थित होते. संचालन जमादार उमेश ढेवले यांनी केले. आभार सहायक निरीक्षक हेमंत चौधरी यांनी मानले.

Web Title: Establishment of a police colony in Warud