शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
4
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
5
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
6
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
7
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
8
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
9
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
10
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
11
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
12
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
13
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
14
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
15
‘धुरंधर’चा वाद सामंजस्याने सोडवावा, दिग्दर्शक आदित्य धर, निर्मात संतोष कुमार यांना उच्च न्यायालयाच्या सूचना
16
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
17
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
18
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
19
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
20
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
Daily Top 2Weekly Top 5

ऊर्जा बचतीत महापालिका माघारली

By admin | Updated: October 27, 2014 22:27 IST

शासनाचे ऊर्जा बचतीचे धोरण असताना महापालिका मात्र ऊर्जा बचतीमध्ये पूर्णत: माघारली आहे. ऊर्जा बचतीसाठी अतिरिक्त पथदिवे कमी करण्याचे कार्यारंभ आदेश असताना अद्यापपर्यंत कारवाई झालेली नाही.

२० टक्के खर्चाचा बोझा कायम : अतिरिक्त पथदिवे काढलेच नाहीतअमरावती : शासनाचे ऊर्जा बचतीचे धोरण असताना महापालिका मात्र ऊर्जा बचतीमध्ये पूर्णत: माघारली आहे. ऊर्जा बचतीसाठी अतिरिक्त पथदिवे कमी करण्याचे कार्यारंभ आदेश असताना अद्यापपर्यंत कारवाई झालेली नाही. त्यामुळे महापालिकेवर २० टक्के खर्चाचा जादा बोझा कायम आहे.‘वीज वाचवा’ हा संदेश देण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे राज्य शासनाचे धोरण आहे. या संदेशाचा परिणाम म्हणून काही प्रमाणात जनजागृती होऊन वीज वाचविण्यासाठी नागरिकांनीही पुढाकार घेतला आहे. ऊर्जा बचतीच्या धोरणाची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यासाठी महानगरातील अतिरिक्त पथदिवे कमी करण्याचा निर्णय झाला. त्यानुसार एका सर्वेक्षणाअंती २० टक्के अतिरिक्त पथदिवे कमी करण्यासाठी निविदा मागविण्यात आल्या. काही महिन्यांपूर्वी येथील ‘मे.ब्राईट ईलेक्ट्रॉनिक्स कंपनी’ला अतिरिक्त पथदिवे कमी करण्याचे कंत्राट सोपविण्यात आले. मात्र, या कंपनीने आतापर्यंत अतिरिक्त पथदिवे काढले नसल्याची माहिती आहे. महानगरात पथदिव्यांची संख्या ३५ हजार असून यासाठी महापालिकेला महिन्याकाठी ७० ते ८० लाख रुपयांची देयके अदा करावी लागतात. ऊर्जा बचतीचा मार्ग महापालिकेने स्वीकारला असता तर आठ हजार अतिरिक्त पथदिवे कमी करुन १० ते १२ लाख रुपयांची बचत झाली असती. अधिक क्षमतेचे दिवे वापरु नयेत, असे ठरविले असताना महापालिकेच्या पथदिव्यांवर २५० वॅटचे मेटल हेडलाईट वापरले जात आहेत. ऊर्जा बचतीच्या धोरणाला हरताळ फासण्याचा प्रकार महापालिकेत सुरु असल्याचे दिसते. ऊर्जा बचतीप्रकरणी आयुक्तांनी लक्ष घालून यासाठी पुढाकार घेण्याची गरज असल्याचा मतप्रवाहदेखील यानिमित्ताने पुढे येऊ लागला आहे.