शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
4
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
5
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
6
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
7
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
8
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
9
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
10
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
11
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
12
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
13
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
14
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
15
‘धुरंधर’चा वाद सामंजस्याने सोडवावा, दिग्दर्शक आदित्य धर, निर्मात संतोष कुमार यांना उच्च न्यायालयाच्या सूचना
16
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
17
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
18
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
19
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
20
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
Daily Top 2Weekly Top 5

बीपीएलच्या नव्या यादीची प्रतीक्षा संपता संपेना

By admin | Updated: October 30, 2014 22:45 IST

शासनाच्या विविधांगी योजनांसाठी आवश्यक असलेल्या दारिद्र्य रेषेखालील प्रमाणपत्र (बीपीएल कार्ड) ची नवीन यादी मंत्रालयात अडकली आहे. मागील वर्षभरापासून बीपीएलच्या नव्या यादीला

अमरावती : शासनाच्या विविधांगी योजनांसाठी आवश्यक असलेल्या दारिद्र्य रेषेखालील प्रमाणपत्र (बीपीएल कार्ड) ची नवीन यादी मंत्रालयात अडकली आहे. मागील वर्षभरापासून बीपीएलच्या नव्या यादीला शासनाने मंजुरी दिली नसल्यामुळे लाभार्थ्यांची प्रतीक्षा शिगेला पोहचली आहे. बीपीएलचे प्रमाणपत्र नसल्यामुळे अनेकांना शासनाच्या योजनांपासून वंचित राहण्याचा प्रसंग ओढावला आहे.महानगरातील गरीब, सामान्य कुटंबीयांना शासनाच्या योजनांचा लाभ मिळावा, यासाठी २००८ मध्ये सर्वेक्षण करुन बीपीएलधारक कुटुंबाची यादी शासनाकडे पाठविली होती. सुमारे २५ ते २६ हजार कुटंबांचा बीपीएल यादीत समावेश असलेली नवीन यादी शासनाच्या नगर परिषद संचालनालयाने ती कॅबीनेट मंत्रिमंडळाच्या निर्णयासाठी पाठविली होती. परंतु आघाडी शासनाच्या कार्यकाळात ती मंजूर होऊ शकली नाही. अमरावती महानगरातील बीपीएल कुटुुंबीयांना न्याय मिळावा, याअनुषंगाने नगरपरिषद संचालनालयाने ही यादी कॅबिनेट मंत्रिमंडळापुढे ठेवण्याचा प्रयत्न केला. मात्र या यादीला मंजूर करण्यात यश आले नाही. त्यानंतर विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली. परिणामी बीपीएलच्या नवीन यादीची मंजुरात थंड बस्त्यात पडली आहे. हल्ली भाजपचे शासन आरुढ होणार असल्यामुळे बीपीएलच्या यादीला मंजुरी मिळविण्यासाठी महापालिका प्रशासनाने धावपळ चालविली आहे. खाते वाटपाची प्रक्रिया संपताच कॅबिनेटच्या बैठकीत नवीन बीपीएलच्या यादीला मंजुरी मिळविण्यासाठी महापालिका प्रयत्न करणार असल्याची माहिती आहे. तर दुसरीकडे निवडणूक आटोपताच बीपीएलचे लाभार्थी नवीन यादी कधी येणार? यासाठी महापालिकेच्या पायऱ्या झिजवीत असल्याचे चित्र आहे. परंतुयादीबाबत लाभार्थ्यांना उत्तर देताना संबंधित अधिकाऱ्यांची दमछाक होत आहे.