दर्यापूर पालिकेच्या विषय समिती सभापतीपदांची निवडणूक बिनविरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:29 IST2021-02-05T05:29:49+5:302021-02-05T05:29:49+5:30

दर्यापूर : नगरपरिषद विषय समितीच्या सभापतीपदांची निवडणूक शुक्रवारी सकाळी ११ वाजता नगरपरिषद हॉलमध्ये तहसीलदार तथा निवडणूक अधिकारी योगेश देशमुख ...

Election of Daryapur Municipality Subject Committee Chairperson without any objection | दर्यापूर पालिकेच्या विषय समिती सभापतीपदांची निवडणूक बिनविरोध

दर्यापूर पालिकेच्या विषय समिती सभापतीपदांची निवडणूक बिनविरोध

दर्यापूर : नगरपरिषद विषय समितीच्या सभापतीपदांची निवडणूक शुक्रवारी सकाळी ११ वाजता नगरपरिषद हॉलमध्ये तहसीलदार तथा निवडणूक अधिकारी योगेश देशमुख यांच्या अध्यक्षतेत पार पडली. यात सर्व समिती सभापतीपदावर सदस्यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

नगरपरिषदेच्या स्थायी समिती सभापतीपदी दिलीप चव्हाण, सार्वजनिक बांधकाम सभापतीपदी शदा उल्लाखान पठाण, आरोग्य व स्वच्छता सभापतीपदी किरण संदीप गावंडे, शिक्षण व क्रीडा सभापती प्रतिभा चंदू शेवने, महिला व बालकल्याण सभापतीपदी नीलिमा निशिकांत पाखरे यांची वर्णी लागली. सर्व पदाधिकाऱ्यांचे नगरपरिषद सदस्यांनी कौतुक केले.

यावेळी तहसीलदार योगेश देशमुख, नायब तहसीलदार अरुण राजगुरे, नगरपरिषद मुख्याधिकारी गीता वंजारी, नगरपरिषद अधिकारी प्रदीप दानडे, नगरपरिषद उपाध्यक्ष सागर गावंडे, दिलीप चव्हाण, अमोल गहरवाल, अनिल बागडे, नगरपरिषद अधीक्षक देशमुख आदी उपस्थित होते.

Web Title: Election of Daryapur Municipality Subject Committee Chairperson without any objection