शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
2
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
3
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
4
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
5
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
6
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
7
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
8
कोल्हापूर जिल्ह्यात नीट परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याची पालकांची तक्रार; नेमकं काय घडलं?
9
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
10
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
11
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
12
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
13
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
14
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
15
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
16
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
17
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
18
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
19
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
20
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
Daily Top 2Weekly Top 5

दोन जिल्ह्यांतील साडेआठ हजार कृषिपंपांच्या वीजजोडण्या प्रलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:29 IST

(प्रादेशिककरिता) अमरावती : यवतमाळ व अमरावती जिल्ह्यातील ८,९६३ शेतकऱ्यांनी कृषीपंपाच्या वीजजोडण्या मिळविण्यासाठी महावितरणकडे पैसे भरून अर्ज केले होते. त्यापैकी ...

(प्रादेशिककरिता)

अमरावती : यवतमाळ व अमरावती जिल्ह्यातील ८,९६३ शेतकऱ्यांनी कृषीपंपाच्या वीजजोडण्या मिळविण्यासाठी महावितरणकडे पैसे भरून अर्ज केले होते. त्यापैकी आठवडाभरात तातडीने ४५९ कृषिपंपांच्या वीजजोडण्या करण्यात आल्या, तर ८,५०४ वीजजोडण्यांचे काम प्रलंबित आहेत. त्यामुळे सदर व वीजजोडण्या केव्हा मिळणार, असा सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे.

१ एप्रिल २०१८ नंतर अमरावती जिल्ह्यासाठी महावितरणकडे पैसे भरूनही ३,०१८ वीजजोडण्या प्रलंबित होते, तर यवतमाळ जिल्ह्याकरिता ५,९४५ कृषिपंपांच्या वीजजोडण्यांकरिता शेतकऱ्यांनी अर्ज केले असून तेदेखील प्रलंबित आहेत. १ एप्रिल २०१८ नंतर प्रलंबित वीजजोडण्यांकरिता कुठलीही योजना नव्हती. परंतु अशा ग्राहकांंना वीजजोडणी देण्यासाठी महाकृषी वीजजोडणीसाठी शासनाने कृषिपंप वीजजोडणी धोरण २०२० आखले आहे. या धोरणानुसार वीजजोण्या देण्याची प्रक्रिया सुरू झालीे. शासन निर्णायानंतर ३० मीटरच्या आतील ज्या शेतकऱ्यांचे कनेक्शन आहेत. अशा ४५९ शेतकऱ्यांना नियमानुसार कृषिपंपासाठी वीजजोडण्या देण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

बॉक्स:

३१ मार्च २०१८ पुर्वीचे धोरण

३१ मार्च २०१८ पुर्वीचे अमरावती जिल्ह्याकरिता ४,३०४ कनेक्शन प्रलंबित होते. त्यापैकी २,६१७ शेतकऱ्यांना उच्चदाब वीज प्रणालीनुसार कृषिपंंपांसाठी वीज कनेक्शन देण्यात आले. मात्र, उर्वरित १,६८८ शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळाला नव्हता. यवतमाळ जिल्ह्याकरिता ६,६०६ पैकी ३,८९५ शेतकऱ्यांना कनेक्शन मिळाले, तर २,७१२ शेतकऱ्यांना वीजजोडण्या मिळाल्या नव्हत्या. त्यांना वीजजोडण्या देण्याचे काम सुरू आहे.