शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
4
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
5
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
6
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
7
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
8
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
9
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
10
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
11
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
12
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
13
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
14
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
15
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
16
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
17
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
18
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
19
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
20
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षणाधिकारी, वैद्यकीय अधिकाऱ्यांचे वेतन रोखले

By admin | Updated: January 20, 2015 22:29 IST

माध्यमिक शिक्षणधिकारी व धारणी येथील तालुका वैद्यकीय अधिकारी यांनी प्रशासकीय कामकाज व योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यास कुचराई केल्याप्रकरणी या दोनही

अमरावती : माध्यमिक शिक्षणधिकारी व धारणी येथील तालुका वैद्यकीय अधिकारी यांनी प्रशासकीय कामकाज व योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यास कुचराई केल्याप्रकरणी या दोनही अधिकाऱ्यांचे माहे जानेवारीचे वेतन तात्पुरत्या स्वरुपात रोखण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिल्याची खात्रीलायक माहिती आहे. मानव विकास कार्यक्रमांतर्गत राबविण्यात येत असलेल्या योजनांचा जिल्हाधिकारी यांनी १६ जानेवारी रोजी आढावा बैठक घेतली असता, यामध्ये इयत्ता आठवी ते दहावीमध्ये शिक्षण घेत असलेल्या व शाळेपासून ० ते ५ किलोमिटरपर्यंत राहत असलेल्या गरजू विद्यार्थ्यांना सायकल वाटप योजनेची अंमलबजावणी शिक्षणाधिकारी यांच्याकडून जलदगतीने होत नसल्याचे निदर्शनास आले. जोपर्यंत या कामात समाधानकारक प्रगती होणार नाही, तोपर्यंत माध्यमिक शिक्षणाधिकारी यांचे माहे जानेवारीचे वेतन तात्पुरत्या स्वरुपात रोखण्याचे आदेश दिले असल्याची माहिती आहे. तर तज्ज्ञ महिला डॉक्टरांकडून गर्भवती महिलांची आरोग्य तपासणी करणे तसेच ० ते ६ वयोगटातील बालकांची तपासणी व औषधोपचार करणे या योजनेंतर्गत माहे डिसेंबर २०१४ धारणी तालुक्यातील १२ शिबिराचे उद्दिष्टे देण्यात आले होते. मात्र केवळ पाच शिबिरे घेण्यात आल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे या योजनांची कारवाई योग्य होत नसल्याने धारणी येथील तालुका वैद्यकीय अधिकारी एस.बी. जोगी याचेही माहे २०१५ चे वेतन तात्पुरत्या स्वरुपात रोखण्याचे आदेश देण्यात आले. जानेवारी महिन्यात शिबिराचे उद्दिष्टे पूर्ण करावे, अशा सूचनाही देण्यात आल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे या सर्व कामाचा दोन्ही अधिकाऱ्यांना अहवाल जिल्हा प्रशासनाला सादर करावा लागणार आहे. या निर्णयामुळे प्रशासकीय यंत्रणेतील अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.