शहरं
Join us  
Trending Stories
1
“१४ वर्षांचा वनवास संपला, स्वगृही परतलो, माझ्यात DNA…”; आनंद परांजपेंचा शिंदेसेनेत प्रवेश
2
“...तर महाराष्ट्र पुरोगामी राहिला असता”; प्रणिती शिंदेंचे विधान, गडकरींच्या कार्याची स्तुती
3
हा पराभव पचवणं कठीण; सलग पाचव्या पराभवानंतर तिलक वर्माचं नाव घेत काय म्हणाला श्रेयस अय्यर?
4
अरविंद केजरीवाल यांच्यासह ‘आप’च्या ५ नेत्यांच्या अडचणी वाढल्या; ‘या’ प्रकरणात खटला चालणार
5
तिलक वर्माचा मॅच विनिंग सिक्सर! रोमहर्षक सामन्यात MI नं मारली बाजी; पाचव्या पराभवासह PBKS चं गणित बिघडलं
6
भारतीय जहाजावरील हल्ल्यानंतर होर्मुझजवळ आणखी एक मोठी घटना; नांगर टाकलेल्या जहाजावर कब्जा, इराणच्या दिशेनं गेलं!
7
हिटमॅन रोहित शर्माने MS धोनीचा रेकॉर्ड मोडला, पण विराटला मागे टाकणं जमणार नाही, कारण...
8
सोन्यासंदर्भात सरकारचा आणखी एक मोठा निर्णय! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं खरेदी टाळण्याचं आवाहन 
9
PBKS vs MI : शार्दुल ठाकूरची कमाल! श्रेयस अय्यरचा असा घेतला बदला; अन्... (VIDEO)
10
‘एल-निनो’चा संभाव्य धोका, खरीप हंगामासाठी आवश्यक सज्जता ठेवा: शिवेंद्रसिंहराजे भोसले
11
अमेरिका इराण तणावामध्ये भारतासाठी चांगली बातमी, २ LPG टँकर्स 'होर्मुझ' पार करून पुढे निघाले!
12
Jasprit Bumrah : १३ वर्षांचा प्रवास; जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार! हार्दिक पांड्याचा विषय संपला?
13
ह्युंडाई स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणणार, काय काय फीचर्स असणार? टाटा पंच EV सह या कारना देणार टक्कर
14
जबरदस्त! १३८० किमी धावणार अन् तीन चाकांवरही पळणार! 'ही' नवी हायटेक इलेक्ट्रिक कार ऑटो विश्वात धुमाकूळ घालणार?
15
रशियाचे परराष्ट्र मंत्री PM मोदींना भेटले; तेल संकट, युक्रेन, परस्पर संबंध वाढवण्यावर चर्चा
16
देशातील परिस्थिती गंभीर, सर्वपक्षीय बैठक बोलवा, त्यात पंतप्रधानांनी हजर राहावे- शरद पवार
17
ममता बॅनर्जी खरंच वकील आहेत का, कागदपत्र सादर करा; बार कौन्सिलचे निर्देश, झाले तरी काय?
18
Vaibhav Suryavanshi In India A Squad : वैभव सूर्यवंशीला BCCI चं मोठं गिफ्ट; भारतीय ‘अ’ संघात निवड
19
HSRP बसवली नाही तर कडक कारवाई, नियमभंग केल्यास मोठा दंड होणार; किती शुल्क आकारले जाणार?
20
सुनेत्रा पवारांना मोठा धक्का, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचा राजीनामा; पत्रात काय?
Daily Top 2Weekly Top 5

डोळ्यांशिवाय पाहिलेले मयुरचे स्वप्न पूर्ण

By admin | Updated: June 17, 2014 23:57 IST

आधीच आर्थिक विपन्नावस्था त्यात जन्मांधपणाचा शाप. पण, त्याने हार मानली नाही. शारीरिक वैगुण्यावर मात करून उज्ज्वल यश संपादन करण्याचे त्याचे स्वप्न होते. दहावीचा निकाल घोषित झाला

अमरावती : आधीच आर्थिक विपन्नावस्था त्यात जन्मांधपणाचा शाप. पण, त्याने हार मानली नाही. शारीरिक वैगुण्यावर मात करून उज्ज्वल यश संपादन करण्याचे त्याचे स्वप्न होते. दहावीचा निकाल घोषित झाला अन् ८५.६० टक्के गुणांसह त्याचे हे डोळ्यांशिवाय पाहिलेले स्वप्नही पूर्ण झाले.
स्थानिक सायन्सकोर (जिल्हा परिषद माध्यमिक मुलांची शाळा)चा विद्यार्थी मयूर गणेश गवळी याची ही प्रेरणादायी यशोगाथा. मयूरला शिक्षणाची प्रचंड ओढ. त्यासाठी त्याला लहानपणापासूनच आई-वडिलांपासून लांब रहावे लागले. भविष्यात प्रध्यापक होण्याचे स्वप्न उराशी घेऊन तो लढत राहिला. इयत्ता सातवीपर्यंतचे शिक्षण त्याने स्थानिक डॉ. नरेंद्र भिवापुरकर अंध विद्यालयातून पूर्ण केले. त्यानंतर त्याने सायन्सोकरच्या शाळेत प्रवेश घेतला. सध्याही तो अंध विद्यालयाच्या वसतिगृहातच राहतोय. दहावीची परीक्षा उत्तम गुणांसह उत्तीर्ण करण्याचे त्याचे ध्येय होते. त्यासाठी त्याने जिद्दीने रात्रीचा दिवस करून अभ्यास केला. अखेरीस त्याची दुर्दम्य महत्वाकांक्षा आणि प्रचंड परिश्रमांना यश आले. अतिशय विपरीत परिस्थितीत कोणतीही शिकवणी नसतांना इतकेच नव्हे तर नेत्रहिन असूनही त्याने दहावीची कठीण परीक्षा ८५.६० टक्के गुणांसह उत्तीर्ण केली.
नागपुरच्या बुटीबोरी येथील रहिवासी गणेश व प्रमीला गवळी या मयूरच्या मातापित्यांचा आनंद आज गगनात मावेनासा झालाय. त्याची बहिण पुनम हिला देखील भावाच्या यशामुळे आकाश ठेंगणे झालेय. मयूरला त्याच्या या यशाचे गमक विचारले असता त्याने यशाचे बहुतांश श्रेय त्याची मावशी इंदूबाई तिरळकर यांना दिले. इंदूबाई तिरळकर गोपालनगर नजीकच्या पवन नगर येथे राहतात. आई-वडिलांच्या अपरोेक्ष मावशीने दिलेल्या पाठबळामुळेच आपण हे यश मिळवू शकलो, असे मयूरने आवर्जून सांगितले. शिकवणी नसल्याने शाळेतील अभ्यासक्रमाच्या भरवशावरच त्याने परीक्षा दिली. याकामी त्याला वर्गशिक्षकांचे भरघोस सहकार्य मिळाले. माध्यमिक शालांत परीक्षेत मयूरला ५०० पैकी ४२८ गुण मिळाले आहेत. मयूरने त्याच्या यशाचे श्रेय आई- वडिल, इंदूबाई तिरळकर,यशवंत तिरळकर, मावस बहिण विजया पेठेकर, शिक्षक महादेव तायडे, प्रज्ञा रामटेके, वसुंधरा काळे आणि वसतिगृहाचे प्राचार्य नवनाथ इंगोले व अधीक्षक पंकज मुदगल यांना देतो.