डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम अभ्यासिकेचे उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:30 IST2021-02-05T05:30:04+5:302021-02-05T05:30:04+5:30

फोटो जे-२८-चुरणी न्यूज फोटो चिरणी(चिखलदरा) : ७२ व्या प्रजासत्ताकदिनी स्थानिक पोलीस ठाणे व नगर परिषदेच्या संयुक्त विद्यमाने नगर परिषद ...

Dr. A.P.J. Inauguration of Abdul Kalam Study | डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम अभ्यासिकेचे उद्घाटन

डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम अभ्यासिकेचे उद्घाटन

फोटो जे-२८-चुरणी न्यूज फोटो

चिरणी(चिखलदरा) : ७२ व्या प्रजासत्ताकदिनी स्थानिक पोलीस ठाणे व नगर परिषदेच्या संयुक्त विद्यमाने नगर परिषद वाचनालयाच्या इमारतीत डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम अभ्यासिकेचे उद्घाटन तहसीलदार माया माने, नगराध्यक्ष विजया सोमवंशी यांच्या हस्ते करण्यात आले.

दुर्गम भागातील स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थी मित्रांकारिता जिल्हा पोलीस अधीक्षक हरीबालाजी एन. यांच्या संकल्पनेतून माजी राष्ट्रपती व थोर वैज्ञानिक डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या नावे अभ्यासिकेचे उद्घाटन करण्यात आले. सदर अभ्यासिकाचे सर्व विद्यार्थ्यांकरिता निःशुल्क स्वरुपात सकाळी ७ ते रात्री१० पर्यंत सुरू राहणार आहे. सर्व विद्यार्थ्यांनी सदर अभ्यासिकेचा लाभ घेण्याचे आवाहन अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक श्याम घुगे यांनी केले. मेळघाट विभागातून भविष्यात चांगले अधिकाऱ्यांची निवडले जावेत, असेही ते म्हणाले. सदर अभ्यासिका सहायक पोलीस निरीक्षक आकाश शिंदे, शहाजी रुपनर व नगर परिषदेच्या सहकार्यातून सुरू करण्यात आलेली आहे.

Web Title: Dr. A.P.J. Inauguration of Abdul Kalam Study