शहरं
Join us  
Trending Stories
1
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
2
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
3
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
4
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
5
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
6
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
7
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
8
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
9
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
10
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
11
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
12
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
13
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
14
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
15
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
16
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
17
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
18
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
19
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
20
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
Daily Top 2Weekly Top 5

जाँबाज पोलीस अधिकारी सिनेमातच बघायचे काय?

By admin | Updated: June 22, 2014 23:46 IST

छबीची चिंता न करता, पोलीस अधिकाऱ्यांची आश्चर्यकारकरीत्या पाठराखण करणारे अमरावतीचे पोलीस आयुक्त सुरेशकुमार मेकला यांना अखेर तीन ठाणेदारांच्या बदल्या कराव्याच लागल्यात. शनिवारी रात्री हे आदेश

गणेश देशमुख - अमरावतीछबीची चिंता न करता, पोलीस अधिकाऱ्यांची आश्चर्यकारकरीत्या पाठराखण करणारे अमरावतीचे पोलीस आयुक्त सुरेशकुमार मेकला यांना अखेर तीन ठाणेदारांच्या बदल्या कराव्याच लागल्यात. शनिवारी रात्री हे आदेश जारी झालेत. 'दहशत चोरांची' या वृत्तमालिकेतून लोकसुरक्षेच्या मुद्यावर 'लोकमत'ने सातत्यपूर्ण केलेल्या निर्भय लिखाणाचाच हा परिपाक!डोळे विस्फारावेत असे भयंकर आकडे अवघ्या पाच महिन्यांतील घरफोडीचे आहेत. जवळजवळ १४० घरे चोरांनी जानेवारीपाून फोडली. ३४० चोऱ्या झाल्यात. शहरातील लोकांच्या सुरक्षेसाठी १९६७ पोलीस शहरभर तैनात आहेत. शहरात १० पोलीस ठाणी आहेत. ठाण्याचे सर्वेसर्वा असलेल्या ठाणेदाराने त्यांच्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत कायद्याचे राज्य कायम राखावे, सुरक्षा व्यवस्था चोख राखावी, यासाठी तमाम सुविधा आणि विशेषाधिकार त्यांना प्रदान करण्यात आले आहेत. हेच कर्तव्य बजावण्यासाठीचे वेतन घेणारे ठाणेदार निष्प्रभ ठरतात. चोर-घरफोडे ही बाब वारंवार सिद्ध करतात. एरवी अमरावती सुरक्षित असल्याचे मानणारे लोक मनातून हादरतात. पोलिसांवरचा विश्वासच उडतो. पोलीस कशासाठी, असा एकच प्रश्न जिकडे तिकडे विचारला जातो. हे सर्व घडत असताना सर्व पोलीस अधिकाऱ्यांचे पालकत्त्व असलेल्या पोलीस आयुक्तांना अकार्यक्षम ठाणेदारांवर कुठलीही कारवाई करावीशी वाटत नाही. चोऱ्या घरफोड्यांचे प्रमाण जास्तच वाढल्याचे त्यांना जाणवते त्यावेळी ३६ शिपाई आणि जमादारांवर धडाघड कारवाई करून पोलीस आयुक्त मोकळे होतात.