शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
4
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
5
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
6
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
7
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
8
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
9
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
10
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
11
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
12
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
13
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
14
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
15
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
16
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
17
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
18
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
19
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
20
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
Daily Top 2Weekly Top 5

प्रकल्पग्रस्तांचे अर्ज प्रलंबित ठेवू नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2021 05:00 IST

 प्रकल्पामुळे विस्थापित झालेल्या प्रकल्पग्रस्तांना पुनर्वसित गावांत नागरी सुविधा उपलब्ध करुन देण्याचे काम जलसंपदा विभागाचे आहे. सामदा, सौंदडी प्रकल्पातील संपादित करावयाच्या जमिनीची मोजणी बाकी आहे. ती पूर्ण करावी. सध्या जलाशयात जलसाठा असल्यामुळे पाण्याच्या तरंग लहरीमुळे बुडीत क्षेत्राशेजारील काही शेतात पाणी साचल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यात. यावर तात्काळ कार्यवाही करण्याची सूचना त्यांनी संबंधितांना दिली. 

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : विभागातील विविध सिंचन प्रकल्पांची निर्मिती होत असताना अनेकांच्या जमिनी अधिग्रहीत करण्यात आल्या आहेत. शेतकरी, गावकरी बांधवांनी जमिनी दिल्या म्हणूनच प्रकल्प पूर्णत्वास आले आहेत. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांना योग्य मोबदला देऊन व त्यांच्या तक्रारींचे समन्वयाने निराकरण करून त्यांचा एकही अर्ज प्रलंबित राहता कामा नये, असे सुस्पष्ट आदेश जलसंपदा राज्यमंत्री  बच्चू कडू यांनी शुक्रवारी दिले. सिंचनभवन येथे विविध सिंचन प्रकल्पांसंदर्भात राज्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी आमदार प्रताप अडसड, जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता (विशेष प्रकल्प)  अभय पाठक,  मुख्य अभियंता अनिल बहादुरे, अधीक्षक अभियंता रश्मी देशमुख,  अधीक्षक अभियंता आशिष देवघडे, पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी अभियंता सु.गो. राठी यांच्यासह प्रकल्पांचे कार्यकारी अभियंता, अधिकारी उपस्थित होते. प्रकल्पामुळे विस्थापित झालेल्या प्रकल्पग्रस्तांना पुनर्वसित गावांत नागरी सुविधा उपलब्ध करुन देण्याचे काम जलसंपदा विभागाचे आहे. सामदा, सौंदडी प्रकल्पातील संपादित करावयाच्या जमिनीची मोजणी बाकी आहे. ती पूर्ण करावी. सध्या जलाशयात जलसाठा असल्यामुळे पाण्याच्या तरंग लहरीमुळे बुडीत क्षेत्राशेजारील काही शेतात पाणी साचल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यात. यावर तात्काळ कार्यवाही करण्याची सूचना त्यांनी संबंधितांना दिली. शहानूर धरणातून  त्यांच्या निवेदनाच्या अनुषंगाने सन २००४  पूर्वीचा रहिवासी पुरावे तपासून वाढीव मोबदला व अतिक्रमण नियमानुकूल प्रकरणांचा निपटारा लवकरात लवकर करण्यात यावेत, असेही ते म्हणाले.प्रकल्पातून विसर्ग होणाऱ्या पाण्यामुळे प्रकल्पालगतच्या शेतीचे नुकसान झाल्याने भरपाई मिळण्यासाठीचे निवेदन शेतकऱ्यांनी सादर केले. त्यावर त्यांना योग्य मोबदला मिळावा, यासाठी बाधित क्षेत्राची महसूल व कृषी विभागाव्दारे संयुक्त तपासणी करून योग्य नुकसान भरपाईची कार्यवाही गतीने पूर्ण करावी, असेही राज्यमंत्र्यांनी सांगितले. शहानूर नदीपात्रातील सिमेंट बंधाऱ्याचे बांधकाम, अंजनगाव तालुक्यातील भुलेश्वरी नदी प्रवाह मार्गातील बंधारा बांधकाम, सोनगाव शिवणी शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी रस्ता बांधकाम, अप्पर वर्धा धरणग्रस्तांच्या तसेच विविध प्रकल्पग्रस्तांच्या समस्यांचा सविस्तर आढावा घेऊन राज्यमंत्र्यांनी संबंधितांना पुढील कार्यवाही तात्काळ करण्याचे आदेश दिले.

 

टॅग्स :Bachhu Kaduबच्चू कडू