शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
2
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
3
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
4
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
5
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
6
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
7
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
8
कोल्हापूर जिल्ह्यात नीट परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याची पालकांची तक्रार; नेमकं काय घडलं?
9
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
10
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
11
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
12
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
13
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
14
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
15
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
16
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
17
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
18
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
19
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
20
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
Daily Top 2Weekly Top 5

अपंगांना वैद्यकीय प्रमाणपत्राचे वितरण

By admin | Updated: May 20, 2015 01:10 IST

अपंग जीवन विकास संस्था अमरावतीद्वारा संचालित जिल्हा अपंग पुनर्वसन केंद्र अमरावती, जिल्हा सामान्य रुग्णालय अमरावती ...

धारणी : अपंग जीवन विकास संस्था अमरावतीद्वारा संचालित जिल्हा अपंग पुनर्वसन केंद्र अमरावती, जिल्हा सामान्य रुग्णालय अमरावती व जिल्हा समाजकल्याण कार्यालय जि. प. अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने २२ मे रोजी धारणी येथील आदिवासी अपंग बांधवांना अपंगत्वाचे वैद्यकीय प्रमाणपत्र वितरण शिबिर आयोजित करण्यात आले आहे. याप्रसंगी अपंग बांधवांना मिळणाऱ्या शासकीय योजनांच्या माहितीचे स्टॉलसुद्धा येथे लावण्यात येणार आहेत. यामधून शासकीय योजनांचे अर्ज व माहितीपत्रक अपंग बांधवांना वितरित केले जाईल. जिल्हा समाजकल्याण अधिकारी कार्यालयाकडून अपंग बांधवास अपंगत्वाचे ओळखपत्र दिले जाईल. याकरिता पासपोर्ट आकाराचा फोटो, रहिवासी दाखला, निवडणूक ओळखपत्र किंवा आधार कार्ड यापैकी कोणताही एक दाखला व ज्या अपंग बांधवाकडे यापूर्वी मिळालेले अपंगत्वाचे वैद्यकीय प्रमाणपत्राची प्रत सोबत आणावी. ज्यांच्याकडे अपंगत्वाचे प्रमाणपत्र नाही त्यांनासुद्धा शिबिरात अपंगत्वाचे वैद्यकीय प्रमाणपत्र वितरण किशोर बोरकर यांच्या मार्गदर्शनात होणार आहे.