शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
4
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
5
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
6
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
7
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
8
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
9
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
10
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
11
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
12
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
13
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
14
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
15
‘धुरंधर’चा वाद सामंजस्याने सोडवावा, दिग्दर्शक आदित्य धर, निर्मात संतोष कुमार यांना उच्च न्यायालयाच्या सूचना
16
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
17
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
18
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
19
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
20
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकांकडून उच्च न्यायालयाची मानखंडना

By admin | Updated: July 5, 2016 23:54 IST

मुंबईसह राज्यातील महानगरपालिकांच्या हद्दीतील रस्त्यांवरील खड्ड्यांसंदर्भात उच्च न्यायालयाने दिलेले आदेश पायदळी तुडविण्यात आले आहेत.

अमरावती : मुंबईसह राज्यातील महानगरपालिकांच्या हद्दीतील रस्त्यांवरील खड्ड्यांसंदर्भात उच्च न्यायालयाने दिलेले आदेश पायदळी तुडविण्यात आले आहेत. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्यातील महापालिकांना सूचना देण्यात आल्या होत्या. नगरविकास विभागाने ९ जुलै २०१५ ला या सूचनांबाबत परिपत्रक काढले. मात्र, अन्य महापालिकांप्रमाणे अमरावती महापालिकासुद्धा त्या निर्देशांच्या अंमलबजावणीपासून कोसो दूर आहे. राज्यातील रस्त्यांच्या निकृष्ठतेबाबत उच्च न्यायालयाने ‘सुमोटो’ जनहित याचिका दाखल करून घेतली होती. याचिकेवरील सुनावणीदरम्यान उच्च न्यायालयाने रस्त्यांवरील खड्ड्यांसंदर्भात आदेश पारित केले. त्या आदेशानुसार राज्यातील सर्व महापालिकांना परिपत्रकान्वये सूचना देण्यात आल्या. खड्ड्यांची डागडुजी कागदावरचअमरावती : वर्ष उलटत असताना या सूचनांवर अंमल झालेला नाही. राज्यातील सर्व महानगरपालिकांनी त्यांच्या अधिकारक्षेत्रातील रस्ते, पदपथ, पाण्याचा निचरा होण्यासाठी पाथहोल सुस्थितीत ठेवण्याची सर्व जबाबदारी संबंधित महापालिकेकडे सोपविली आहे. विविध प्राधिकरणे, संस्था, कंपनी यांना रस्ते खोदण्याची परवानगी देताना ते पुन्हा पूर्ववत करण्याच्या अटीच्या अधीन राहून परवानगी देण्यात यावी, अशी परवानगी देताना संबंधित प्राधिकरणे, संस्था, कंपनी यांनी रस्त्याच्या कडेला फलक लावावेत. त्यावर काम करणाऱ्या एजन्सीचे नाव, अंदाजित कामाचा कालावधी आणि कामाची व्याप्ती इत्यादी प्रदर्शित करण्याबाबत त्यांच्या परवानगी आदेशातच नमूद करावे, याशिवाय रस्त्यांच्या नादुरुस्तीबाबत नागरिकांकडून येणाऱ्या तक्रारींसंदर्भात संकेतस्थळ निर्मिती, टोल फ्री नंबर आदी पद्धती अवलंबविण्याच्या सूचना दिल्या आहेत.मागील सहा महिन्यांपासून शहरात केबलसाठी खोदलेले खड्डे, गटरलाईनसाठी मजीप्राने रस्त्यावर खोदलेल्या खड्ड्यांबाबत महापालिकेने कुठलीही कारवाई केली नाही. सध्या महानगरात भरचौकात आणि रहदारीच्या ठिकाणी अनेक खड्डे खोदण्यात आलेत. मात्र, महापालिकेने आपल्याच अखत्यारित असलेल्या रस्त्यांच्या डागडुजीकडे लक्ष दिले नाही. रस्ते खोदकाम सुरू असताना कुठेही एजन्सी, अंदाजित कामाचा कालावधी, कामाची व्याप्ती याबाबतच्या फलकांचा कुठेही मागमूस आढळला नाही. त्यामुळे उच्च न्यायालयाने दिलेले निर्देश आणि त्या अनुषंगाने नगरविकास विभागाद्वारे निश्चित केलेल्या जबाबदारीकडे महापालिकांनी पाठ फिरविल्याचे चित्र आहे. रस्त्यांवरील खड्ड्यासंदर्भात नगरविकास विभागाने आठ महत्त्वपूर्ण सूचना महापालिकांना केल्यात. तथापि अमरावती महापालिकेने यासाठी स्वतंत्र संकेतस्थळाची निर्मिती केलेली नाही. टोलफ्री नंबर आणि तक्रारीसाठी महापालिकेच्याच संकेतस्थळावर लिंक टाकण्यात आली आहे. रस्त्यांबाबतच्या तक्रारीविषयी स्वतंत्र टोल फ्री नंबर नाही. डागडुजी झालेले रस्ते याबाबतची कुठलीही माहिती या संकेतस्थळावर उपलब्ध नाही. (प्रतिनिधी)महापालिकेची जबाबदारी नागरिकांकडून संकेतस्थळावर अथवा सेलफोनद्वारे प्राप्त होणाऱ्या तक्रारींसोबत रस्त्यांच्या छायाचित्रांच्या आधारे तक्रारींचे निराकरण करण्यात यावे, अशा महापालिकेच्या सूचना आहेत. रस्ते, पथपद, पाथहोल इत्यादींच्या दुरुस्ती व देखभालीसाठी उपयोगा येणाऱ्या प्रक्रियेबाबतची माहितीदेखील वेबसाईटवर व स्थानिक वर्तमानपत्रात प्रसिद्ध करण्यात यावी. दुरूस्त झालेल्या रस्त्यांची छायाचित्रे वेबसाईट आणि वर्तमानपत्रात प्रसिद्ध करण्याच्या सूचना आहेत. रस्त्यांच्या देखभाल व दुरुस्तीसाठी अद्ययावत तंत्रज्ञान वापरावेत, जेणेकरून वारंवार रस्त्याच्या देखभाल व दुरुस्तीबाबत तक्रारींना वाव राहणार नाही, याची दक्षता महापालिकांनाच घ्यायची आहे.रस्त्याच्या नादुरुस्तीबाबतच्या तक्रारींसाठी..विहित तक्रारकेंद्रावर रस्त्याच्या नादुरूस्तीबाबत तक्रार नोंदवून घेण्याची सोय उपलब्ध करुन देण्यात यावी.तक्रार करण्यासाठी ‘टोल फ्री’ सेवा उपलब्ध करण्यात यावी.तक्रार करण्यासाठी ‘डेडीकेटेड’ वेबसाईट प्रसिद्ध करण्यात यावी.टेक्स्ट मॅसेज, दूरध्वनीवरून तक्रार आल्यास ती स्वीकारण्याची सोय उपलब्ध करून देण्यात यावी. ही पद्धत वर्षभरासाठी उपलब्ध करून देण्याच्या सूचना ९ जुलै २०१५ च्या शासन निर्णयात दिल्या गेल्यात. प्रत्यक्षात यापैकी मोजक्या सूचनांचीच अंमलबजावणी झाली आहे. महापालिका आयुक्त जबाबदारउच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांप्रमाणे तत्काळ कार्यवाही करावी व केलेल्या कार्यवाहीबाबतचा अनुपालन अहवाल सादर करण्यात यावा, असे नगरविकास विभागाने म्हटले होते. उच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान होणार नाही, याची दक्षता संबंधित महापालिका आयुक्तांनी घ्यावी. उच्च न्यायालयाचा अवमान झाल्यास संबंधित महानगरपालिका आयुक्तांना जबाबदार धरण्यात येईल, असेही नगरविकास विभागाच्या निर्णयात म्हटले होते. आॅनलाईन तक्रारी संकेत स्थळावर नोंदवून घेतल्या जातात. मोठ्या रस्त्यांच्या कामादरम्यान आवश्यक तेथे फलकेही लावली जातात. टोल फ्री क्रमांकाबाबत मला सांगता येणार नाही.- जीवन सदार,अतिरिक्त शहर अभियंता