शहरं
Join us  
Trending Stories
1
तमिळनाडू सत्तासंघर्ष: बहुमताची बेरीज जुळली नाही; विजय याच्या शपथविधीला राज्यापालांचा पुन्हा ब्रेक?
2
मराठीचा ‘टक्का’ घसरला; ९४ हजार विद्यार्थी नापास; दहावीचा निकाल ९२% : प्रथम भाषा मराठीत ९२% उत्तीर्ण
3
आजचे राशीभविष्य, ०९ मे २०२६: नवीन योजना आखाल, नातेवाईक-मित्रांकडून सुखद बातमी मिळेल! 'असा' जाईल आजचा दिवस 
4
प. बंगालमध्ये सुवेंदूच भाजपच्या सत्तेचे ‘अधिकारी’; मुख्यमंत्रिपदासाठी आठही प्रस्ताव सुवेंदू अधिकारी यांच्या एकट्याच्याच नावाचे
5
सर्वांना मोफत घर नको, ‘कट ऑफ डेट’ वाढवू नका, ‘त्याच ठिकाणी’ कशाला?
6
तमिळ अस्मिता आणखी ताणू नये! तमिळनाडूच्या सत्तेचा पेच सुटणार का?
7
दहावीतही सावित्रीच्या लेकींचीच बाजी; ९२.०९ टक्के परीक्षेचा निकाल; मुली उत्तीर्ण ९७.६२ टक्के तर मुले ८९.५६ टक्के
8
बेशिस्त IPL, बीसीसीआय आणि खेळाडूंच्या गर्लफ्रेंड्स!
9
वयाची ७४ वर्षे, ७२ देशांची सफर; ब्रिटनच्या 'गिल आजीं'चा एकटीनं जगप्रवास!
10
भूसंपादन घोटाळा : अविनाश पाठकसोबतचे आणखी ३ बडे मासे रडारवर! १५ मेपर्यंत पोलिस कोठडीत मुक्काम
11
वर्षभरात १,०९८ कोटींवर चोरट्यांचा डल्ला; राज्यासाठी ‘एनसीआरबी’चा २०२४ चा धक्कादायक अहवाल
12
रेल्वेचा ‘मेगा’ गोंधळ ! सूचना नाही की घोषणा; सलग दुसऱ्या दिवशी कसारा मार्गाचा खोळंबा; प्रवाशांचा आक्रोश
13
..तर विद्रोहाची गाणी नक्कीच रस्त्यावर येतील!
14
DC Vs KKR: कोलकाताकडून ‘दिल्ली’ सर, फिन एलनचे ४७ चेंडूत नाबाद शतक; १४.२ षटकांतच मारली बाजी!
15
निदा खानला लपवण्यात AIMIM नगरसेवक सामील?; CM देवेंद्र फडणवीसांचे मोठे विधान, म्हणाले...
16
पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार? ३०००० कोटीवर पोहोचला तेल कंपन्यांचा तोटा; रोज ७०० कोटींचा फटका
17
"आमच्या पक्षात कुणीही 'एकनाथ शिंदे' नाही!"; असं का म्हणाले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला? भाजपवर थेट हल्ला
18
अमित शाह यांनी पश्चिम बंगालच्या जनतेला दिले ५ मोठे शब्द; म्हणाले, “भाजपा वचने पूर्ण करणारच”
19
"आता बंगालमध्ये..."; मुख्यमंत्रीपदी निवड होताच शुभेंदू अधिकारी यांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले...?
20
टाटा समुहाचा 'दिग्गज' शेअर बनला रॉकेट; रेखा झुनझुनवालांच्या संपत्तीत एका दिवसात १३०० कोटींची वाढ! खास गिफ्ट देण्याच्या तयारीत कंपनी
Daily Top 2Weekly Top 5

तिवसा बसस्थानकातून डिझेल चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 04:11 IST

बाहेरच्या पानासाठी सीसीटीव्हीमध्ये कैद : सुरक्षारक्षक झोपेत, चोर पळण्यात यशस्वी तिवसा : येथील बसस्थानकातून गुरुवारी रात्री २ वाजताच्या सुमारास ...

बाहेरच्या पानासाठी

सीसीटीव्हीमध्ये कैद : सुरक्षारक्षक झोपेत, चोर पळण्यात यशस्वी

तिवसा : येथील बसस्थानकातून गुरुवारी रात्री २ वाजताच्या सुमारास बस स्थानकात उभ्या असलेल्या बसमधून ६०० लिटर डिझेल चोरी गेले. शुक्रवारी सकाळी ही घटना सकाळी उघड झाली. बसस्थानकातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चोराच्या हालचाली कैद झाल्या आहेत. तिवसा पोलिसांनी घटनास्थळी पोहचून पंचनामा केला. तथा चोराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

सध्या सर्वत्र थंडीचा जोर वाढत असून शहरातील रस्ते रात्री ९ वाजताच सामसूम होत आहेत. याचा फायदा घेत भुरट्या चोरांसह अट्टल चोर सरसावले आहेत. त्यांनी गुरुवारी तिवसा बस स्थानकाला लक्ष्य करीत उभ्या बसमधून डिझेल चोरून नेले. सीसीटीव्ही फुटेज व आगार व्यवस्थापकांच्या म्हणण्यानुसार, गुरुवारी मध्यरात्री २ च्या सुमारास तीन चोर चारचाकी वाहनाने बस स्थानकात शिरले. ते तेथील चार बसमधून ४६ हजार ३११ रुपयांचे सहाशे लिटर डिझेल चोरी करून पसार झाले. बसस्थानकातील सुरक्षारक्षक झोपेत असल्याने चोर पळून जाण्यात यशस्वी ठरले.