शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
4
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
5
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
6
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
7
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
8
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
9
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
10
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
11
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
12
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
13
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
14
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
15
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
16
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
17
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
18
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
19
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
20
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात संसर्गजन्य आजारात डेंग्यूचाही दंश!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 05:01 IST

जुलै महिन्यात पावसाने कहर केला होता. त्यानंतर वातावरण बदलले पावसाने उघडीप दिली. दुपारी कडक उन पडल्यामुळे हवेत उष्णता निर्माण झाली. सध्या हे वातावरण पुन्हा बदलेले असून ऊन आणि ढगाळ वातावरणाचा खेळात वातावरणामध्ये उष्णता आणि कधीकधी गारठा जाणवत आहे. त्यामुळे संसर्गजन्य आजाराचे प्रमाण वाढत असल्याची स्थिती आहे .सध्या अनेकांना सर्दी, खोकला, ताप, अंगदुखी यासारखे संसर्गजन्य आजारांनी ग्रासले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : वातावरणात सतत होणाऱ्या बदलाचा परिणाम अनेकांच्या आरोग्यावर होत आहे. सध्या या बदलत्या वातावरणामुळे सर्दी, ताप, खोकला यासारख्या संसर्गजन्य आजाराचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे शासकीय व खासगी रुग्णालयात गर्दी वाढत असल्याचे दिसून येत आहेत. त्यात डासांची पैदास वाढल्याने डेंग्यू, मलेरिया व चिकनगुनियाच्या रुग्णांमध्ये वाढ होत असल्याचे दिसले.सध्या वातावरणात सतत बदल होत आहे. गत काही दिवसांपासून दिवसा तीव्र उन्ह, ढगाळ वातावरण तर पहाटे थोड्या प्रमाणात थंडी जाणवत आहे. त्यामुळे व्हायरल इन्फेक्शन वाढील लागले आहे.जुलै महिन्यात पावसाने कहर केला होता. त्यानंतर वातावरण बदलले पावसाने उघडीप दिली. दुपारी कडक उन पडल्यामुळे हवेत उष्णता निर्माण झाली. सध्या हे वातावरण पुन्हा बदलेले असून ऊन आणि ढगाळ वातावरणाचा खेळात वातावरणामध्ये उष्णता आणि कधीकधी गारठा जाणवत आहे. त्यामुळे संसर्गजन्य आजाराचे प्रमाण वाढत असल्याची स्थिती आहे .सध्या अनेकांना सर्दी, खोकला, ताप, अंगदुखी यासारखे संसर्गजन्य आजारांनी ग्रासले आहे. वातावरणातील संसर्गामुळे रुग्णांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून रुग्णालय गर्दीने फुलली आहेत. किरकोळ दिसणार हे आजार बळावू नयेत म्हणून रुग्ण तातडीने उपचार घेत आहेत. बदलत्या वातावरणात डासांची पैदास वाढली असून डेंग्यू व अन्य आजाराला निमंत्रण मिळत आहे. आजघडीला जिल्ह्यात डेंग्यू,चिकणगुनिया,मलेरियाचे रूग्ण आढळून येत असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाचे सुत्रांनी सांगितले.

सल्ल्याशिवाय औषधे नको!सर्दी, ताप ,खोकला, अंगदुखी हे ग्रामीण भागात सर्रास होणारे आजार आहे .त्यामुळे या आजाराकडे कोणीही गांभीर्याने पाहत नाही. अनेक वेळा अशा आजारांसाठी मेडीकल्स करून गोळ्या आणून त्याचे सेवन केले जाते.मात्र परस्पर गोळ्या घेणे हे दुसऱ्या आजाराला किंवा असलेले आजार बळावण्याची कारणीभूत ठरू शकते.

अशी घेता येईल घरगुती दक्षता- पाणी साठवण टाक्या नियमित स्वच्छ कराव्यात.- घराच्या आसपास पाणी साचून राहणार नाही याची दक्षता घ्यावी- झुडपे व नाशक गवत काढून घ्यावे- घरात स्वच्छता ठेवावी कचऱ्याची वेळीच विल्हेवाट लावावी.- आजारी व्यक्तीच्या संपर्कात जाणे टाळावे. 

घरातील साठवलेल्या पाण्यात डासांची उत्पत्ती होते. त्यामुळे आठवड्यातून एकदा ड्राय डे पाळावा. डेंग्यू व अन्य आजाराचे रूग्ण आढळून येत असल्याने आजाराची कुठलेही लक्षण दिसून आल्यास डॉक्टरराचा सल्ला घेवून उपचार घ्यावेत.डॉ. रेवती साबळे, जिल्हा अतिरिक्त आरोग्य अधिकारी

 

टॅग्स :dengueडेंग्यू