शहरं
Join us  
Trending Stories
1
“१४ वर्षांचा वनवास संपला, स्वगृही परतलो, माझ्यात DNA…”; आनंद परांजपेंचा शिंदेसेनेत प्रवेश
2
“...तर महाराष्ट्र पुरोगामी राहिला असता”; प्रणिती शिंदेंचे विधान, गडकरींच्या कार्याची स्तुती
3
तिलक वर्माचा मॅच विनिंग सिक्सर! रोमहर्षक सामन्यात MI नं मारली बाजी; पाचव्या पराभवासह PBKS चं गणित बिघडलं
4
अरविंद केजरीवाल यांच्यासह ‘आप’च्या ५ नेत्यांच्या अडचणी वाढल्या; ‘या’ प्रकरणात खटला चालणार
5
भारतीय जहाजावरील हल्ल्यानंतर होर्मुझजवळ आणखी एक मोठी घटना; नांगर टाकलेल्या जहाजावर कब्जा, इराणच्या दिशेनं गेलं!
6
हिटमॅन रोहित शर्माने MS धोनीचा रेकॉर्ड मोडला, पण विराटला मागे टाकणं जमणार नाही, कारण...
7
सोन्यासंदर्भात सरकारचा आणखी एक मोठा निर्णय! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं खरेदी टाळण्याचं आवाहन 
8
PBKS vs MI : शार्दुल ठाकूरची कमाल! श्रेयस अय्यरचा असा घेतला बदला; अन्... (VIDEO)
9
‘एल-निनो’चा संभाव्य धोका, खरीप हंगामासाठी आवश्यक सज्जता ठेवा: शिवेंद्रसिंहराजे भोसले
10
अमेरिका इराण तणावामध्ये भारतासाठी चांगली बातमी, २ LPG टँकर्स 'होर्मुझ' पार करून पुढे निघाले!
11
Jasprit Bumrah : १३ वर्षांचा प्रवास; जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार! हार्दिक पांड्याचा विषय संपला?
12
ह्युंडाई स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणणार, काय काय फीचर्स असणार? टाटा पंच EV सह या कारना देणार टक्कर
13
जबरदस्त! १३८० किमी धावणार अन् तीन चाकांवरही पळणार! 'ही' नवी हायटेक इलेक्ट्रिक कार ऑटो विश्वात धुमाकूळ घालणार?
14
रशियाचे परराष्ट्र मंत्री PM मोदींना भेटले; तेल संकट, युक्रेन, परस्पर संबंध वाढवण्यावर चर्चा
15
देशातील परिस्थिती गंभीर, सर्वपक्षीय बैठक बोलवा, त्यात पंतप्रधानांनी हजर राहावे- शरद पवार
16
ममता बॅनर्जी खरंच वकील आहेत का, कागदपत्र सादर करा; बार कौन्सिलचे निर्देश, झाले तरी काय?
17
Vaibhav Suryavanshi In India A Squad : वैभव सूर्यवंशीला BCCI चं मोठं गिफ्ट; भारतीय ‘अ’ संघात निवड
18
HSRP बसवली नाही तर कडक कारवाई, नियमभंग केल्यास मोठा दंड होणार; किती शुल्क आकारले जाणार?
19
सुनेत्रा पवारांना मोठा धक्का, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचा राजीनामा; पत्रात काय?
20
Top Marathi News Live Updates: राष्ट्रवादी अजितदादा गटाला सोडचिठ्ठी देणारे आनंद परांजपे शिंदेंच्या शिवसेनेत जाणार
Daily Top 2Weekly Top 5

‘अचलपूर’ मिळविण्यासाठी भाजप गोटातून मागणी

By admin | Updated: June 14, 2014 23:03 IST

विविध पातळीवर नेतृत्त्वकौशल्य सिद्ध झालेल्या सुरेखा ठाकरे यांना उमेदवारी न मिळाल्यास त्या शिवसेनेत प्रवेश करतील, अशी जोरदार चर्चा जिल्हाभरात आहे. संजय खोडके आणि सुलभा खोडके राष्ट्रवादीत नसल्यामुळे

अमरावती : विविध पातळीवर नेतृत्त्वकौशल्य सिद्ध झालेल्या सुरेखा ठाकरे यांना उमेदवारी न मिळाल्यास त्या शिवसेनेत प्रवेश करतील, अशी जोरदार चर्चा जिल्हाभरात आहे. संजय खोडके आणि सुलभा खोडके राष्ट्रवादीत नसल्यामुळे आता सुरेखा ठाकरे यांना पवार कुटुंब दुखावणार नाही, असा जाणकारांचा कयास आहे.
युतीमध्ये हा मतदारसंघ शिवसेनेचा आहे; तथापि, शिवसेनेला या मतदारसंघात प्रस्थ निर्माण करता आले नाही. खासदारकी नसताना अनंत गुढे या मतदारसंघातून आमदारकीची निवडणूक पराभूत झाले होते. शिवसेनेच्या इतर नेत्यांनाही या मतदारसंघात पाय रोवता आले नाहीत. शिवसेनेचे दमदार नेतृत्त्वच त्यामुळे या मतदारसंघात निर्माण झाले नाही. ना चेहरा, ना क्षमता अशी शिवसेनेची स्थिती आहे. तरीही मतदारसंघ सेनेच्याच वाट्याला आहे. भाजपक्षाची या मतदारसंघात बांधणी चांगली आहे. रुपेश ढेपे आणि प्रकाश भारसाकळे हे दोन चेहरे भाजपकडे आहेत; तथापि, मतदारसंघ भाजपाच्या वपाट्याला नसल्यामुळे भाजपजनांची गोची आहे. यावेळी शिवसेनेऐवजी भाजपक्षाला मतदारसंघ द्यावा, अशी मागणी भाजप गोटातून सुरू आहे.
बच्चू कडू यांनी लोकसभेच्यावेळी रिपाइंला जाहीर समर्थन दिले होते. दलित मतांचा काही प्रमाणात बच्चू कडू यांना त्यामुळे लाभ होईल. रिपाइंकडून प्रताप अभ्यंकर यांच्या नावाची चर्चा आहे.
नातेवाईकांमुळे संकट
अचलपूर मतदारसंघात असलेल्या चांदूरबाजार नगरपालिका आणि शिरजगाव बंड ग्रामपंचायतीतील सत्ता बच्चू कडू यांच्यासाठी अडचणीचे मुद्दे ठरले आहेत. चांदूरबाजारच्या नगराध्यक्षपदी बच्चू यांनी त्यांच्या बहीण सरोजिनी हरणे यांना विराजमान केले. श्रमपूर्वक आणलेला निधी पालिकेने चांदूरबाजार शहरात खर्च केला खरा; परंतु कामांचा दर्जा निकृष्ट आहे. लोकांमध्ये त्यामुळे असंतोष आहे. पालिकेवर आर्थिक अनियमिततेचे आरोप वारंवार होतात. भगिणी प्रेमापोटी अनुनभवी बहिणीच्या हाती सोपविलेल्या सत्तेचे दुष्परिणाम आता बच्चू कडू यांना टाळता येणार नाहीत. शिरजगाव बंड येथील सरपंच सविता बर्वे यांच्याबाबतही नेमके हेच घडले आहे. सत्तेचा त्या दुरुपयोग केल्याची ओरड आहे.नगराध्यक्षपदाचा कार्यकाळ सहा महिन्यांनी वाढला आहे. बच्चू कडू यांनी त्यांच्या बहिणीऐवजी पक्षातील कार्यक्षम आणि लोकप्रिय महिलेच्या हाती सूत्रे सोपविल्यास सकारात्मक संकेत नागरिकांमध्ये जाईल. शिरजगावातही हा प्रयोग त्यांना करता येईल. बच्चू कडू आता बदलले, अशी जी चर्चा वारंवार होते, त्यामागे नात्यातील, मर्जीतील लोकांना सत्ताकेंद्रे सोपविणे हेदेखील महत्त्वाचे कारण आहेच.