अतिक्रमण हटवा, अन्यथा उपोषणाचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 04:12 IST2021-03-06T04:12:19+5:302021-03-06T04:12:19+5:30

दर्यापूर : तालुक्यातील गायवाडी ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या गणेशपूर येथील शासकीय गायरान जमिनीवर केलेले अवैध अतिक्रमण तात्काळ हटवावे, या ...

Delete the encroachment, otherwise a warning of fasting | अतिक्रमण हटवा, अन्यथा उपोषणाचा इशारा

अतिक्रमण हटवा, अन्यथा उपोषणाचा इशारा

दर्यापूर : तालुक्यातील गायवाडी ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या गणेशपूर येथील शासकीय गायरान जमिनीवर केलेले अवैध अतिक्रमण तात्काळ हटवावे, या मागणीसाठी गणेशपूर ग्रामस्थांनी तहसील कार्यालय परिसरात उपोषणाला बसण्याचा इशारा दिला आहे.

गणेशपूर येथील गायरान जमिनीवर स्मशानभूमीचे काम प्रस्तावित असताना, याठिकाणी २ हेक्टर ६७ आर जागेवर २८ फेब्रुवारी रोजी तब्बल ७८ कुटुंबांनी कुठलीही पूर्वपरवानगी न घेता, रात्रीतून अतिक्रमण करीत झोपड्या उभारल्या. याची माहिती गायवाडीच्या सरपंचांना मिळाल्यावर त्यांनी गटविकास अधिकारी व तहसीलदारांना याबाबत माहिती दिली. बीडीओंनी अतिक्रमण काढून टाकण्याबद्दल संबधितांना नोटीस पाठविल्या. मात्र, त्यांनी नोटीस घेण्यास नकार दिल्याने स्थानिक प्रशासन पेचात सापडले होते. यावर गणेशपूर येथील ग्रामस्थांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे धाव घेऊन सदर अतिक्रमण तात्काळ हटविण्याची मागणी केली आहे.

Web Title: Delete the encroachment, otherwise a warning of fasting