शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
4
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
5
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
6
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
7
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
8
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
9
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
10
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
11
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
12
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
13
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
14
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
15
‘धुरंधर’चा वाद सामंजस्याने सोडवावा, दिग्दर्शक आदित्य धर, निर्मात संतोष कुमार यांना उच्च न्यायालयाच्या सूचना
16
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
17
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
18
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
19
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
20
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
Daily Top 2Weekly Top 5

मृग फुटलाच नाही, आंबियालाही गळती

By admin | Updated: August 19, 2014 23:25 IST

संत्रा बागांमध्ये अन्नद्रव्य व्यवस्थापनाचे प्रमाण कमी झाल्याने आणि पावसाने दडी मारल्याने जिल्ह्यातील संत्र्याच्या आंबिया बहाराला गळती लागली आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांची भिस्त मृगबहारावर होती.

सचिन सुंदरकर - अमरावतीसंत्रा बागांमध्ये अन्नद्रव्य व्यवस्थापनाचे प्रमाण कमी झाल्याने आणि पावसाने दडी मारल्याने जिल्ह्यातील संत्र्याच्या आंबिया बहाराला गळती लागली आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांची भिस्त मृगबहारावर होती. परंंतु मृगबहाराचीही फूट नसल्याने जिल्ह्यातील संत्राउत्पादक शेतकरी हादरला आहे.अमरावती जिल्ह्यात सुमारे ८० हजार हेक्टरमध्ये संत्र्याचे उत्पादन घेतले जाते. त्यापैकी ४५ टक्के क्षेत्र मोर्शी व वरुड तालुक्यातील आहे. नैेसर्गिक वातावरण आणि पावसाअभावी ७० हजार हेक्टरमधील संत्रा बागावर मृगबहाराची फूट नाही. यंदा पाऊस दरवर्षीच्या तुलनेत कमी झाल्याने आणि वातावरणात कमालीचा बदल होत गेल्याने आंबिया बहाराची संत्री सुध्दा गळू लागली. जिल्ह्यात ७८ हजार ४८० हेक्टरक्षेत्रात संत्र्याचे उत्पादन घेण्यात येते. यापैकी संत्रा उत्पादन हे ५४ हजार ९९५ हेक्टरमध्ये घेण्यात येते. उर्वरित २४ हजार २८५ हेक्टरमधील संत्रा झाडे ही १ ते ६ वर्ष वयाची आहे. जिल्ह्यातील अन्य तालुक्यात देखिल सिंचनासाठी पाण्याची कमतरता असल्यामुळे ६० ते ७० टक्के संत्रा उत्पादक नैेसर्गिकरित्या येणाऱ्या मृगबहारालाच प्राधान्य देतात. संत्र्याला आंबिया बहार हा साधारणत: जानेवारी महिन्यात फुटतो. परंंतु जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांजवळ संत्रा बागांना पाणी देण्याची सोय आहे. ते शेतकरी आंबिया बहार फोडतात. तर उर्वरित शेतकरी पाण्याची सोय नसल्याने मृगबहाच्या आशेवर असतो. मृगबहार फोडण्यासाठी झाडांना ताण दिला जातो. याला तळण देणे असे म्हणतात. परिणामी झाडे छोट्या फांद्यामध्ये अन्नद्रव्ये साठवितात. जून महिन्यात मृगाचा पाऊस पडल्यानंतर आर्द्रता निर्माण होते. त्यावेळी साठवलेली अन्नद्रव्ये मृगबहारासाठी प्रतिकूल स्थिती असल्याने संत्रा उत्पादक शेतकरी आता चांगलेच अडचणीत आले आहे. ज्या शेतकऱ्यांकडे संत्रा झाडे आहेत ते शेतकरी इतर पीके घेऊ शकत नाही. त्यांची भिस्तच संत्र्यावर अवलंबून असते. एप्रिल मे महिन्यात तडन दिलेल्या झाडांची वाढ थांबते. झाड जगण्यासाठी अन्नद्रव्ये साठवितात. मृगाचा पाऊस आल्यानंतर झाडाला नवती किंंवा मृगबहार फुटतो. परंतु यंदा पाऊस नसल्याने विपरित स्थिती आहे.