शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
2
"माझ्या पोटात लाथ मारली, मतमोजणी केंद्रातून बाहेर फेकून दिलं"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
3
Latest Marathi News LIVE: नसरापूर प्रकरण: विशेष सरकारी वकील म्हणून तीन नावांची शिफारस
4
राहुल गांधी काँग्रेस कार्यकर्ते आणि मित्रपक्षांवरच भडकले; म्हणाले, "तृणमूलच्या पराभवामुळे जे आनंदित झालेत, त्यांनी..."
5
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
6
Video - 'डान्स इंडिया डान्स' गाजवलं, एका घटनेनं आयुष्य बदललं; आता विकतोय समोसे-कचोरी
7
ट्रम्प यांच्यावर गोळीबार करणाऱ्या आरोपीची जजनी मागितली माफी; अमेरिकेत नवा वाद, नेमकं कारण काय?
8
कैद्यांना मिळणारी पॅरोल आणि फर्लो रजा काय असते? कुणाला मिळू शकते, किती दिवस, नियम काय?
9
संगीतकार पलाश मुच्छल पुन्हा अडचणीत, सांगलीत ॲट्रॉसिटीअंतर्गत गुन्हा दाखल
10
तब्बल ३० तासांनंतर पश्चिम बंगालमधील 'त्या' मतदारसंघांचा निकाल समोर आला! ममतादीदींचा बालेकिल्ला उद्ध्वस्त
11
हार्दिक पांड्या-मुंबई इंडियन्समध्ये बिनसलं? LSGविरूद्धचा सामना न खेळण्याचं खरं कारण आलं समोर
12
गेल्या ५० वर्षांत प. बंगालमध्ये झाले फक्त तीन मुख्यमंत्री; एकाची कारकीर्द २३ वर्षांहून जास्त! जाणून घ्या...
13
वय ६५ वर्षे तरी जोश भारी! तरुणांना लाजवेल असा वृद्धांचा फिटनेस फंडा; Video तुफान व्हायरल
14
UN Secretary General Election: संयुक्त राष्ट्रात 'स्त्रीशक्ती'चा डंका? चीनच्या एका विधानाने खळबळ!
15
बंगालचा मुख्यमंत्री कोण होणार? भाजपचे 'चाणक्य' घेणार निर्णय, असामची जबाबदारी नड्डांवर...
16
मोठी बातमी! पश्चिम बंगालमधून ममतांची एक्झिट होताच ईडी सक्रीय झाली, कोलकाता DCP विरोधात ED ची 'लुकआउट' नोटीस 
17
ममता बॅनर्जी भवानीपूर नाहीतर नंदीग्राममधून पुन्हा आमदार बनू शकतात; काय आहे समीकरण...?
18
कोण आहेत अग्निमित्रा पॉल? पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदासाठी नावाची सुरु झालीय चर्चा...
19
सरकारी रुग्णालयाच्या ऑपरेशन थिएटरमध्ये सापडले पैसे, सोनं; टीएमसी नेत्यांवर गंभीर आरोप
20
माळशेज घाटात  भीषण अपघात, एसटी आणि स्कॉर्पियोची समोरासमोर धडक, ४ जणांचा मृत्यू 
Daily Top 2Weekly Top 5

डॉक्टर, कर्मचाऱ्यांचा हलगर्जीपणा आदिवासी चिमुकल्याचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 05:01 IST

बुटीदा येथील अंजली अजय अखंडे यांना १८ ऑगस्ट रोजी प्रसूतीसाठी रुग्णालयात दाखल केले. गुरुवारी तिची प्रसूती झाली. बाळाचे वजन कमी असल्याचे अंजली यांच्या लक्षात आले. ही बाब हजर परिचारिका, डॉक्टर व कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली. परंतु, संबंधित डॉक्टर व कर्मचाऱ्यांनी पूर्णतः दुर्लक्ष केले. शनिवारी सकाळी बाळ दगावले. 

लोकमत न्यूज नेटवर्कचिखलदरा : चुरणी ग्रामीण रुग्णालयात चिमुकल्याचा शनिवारी पहाटे ५ वाजता जीव गेला. आरोग्य यंत्रणेतील दोषींवर कठोर कारवाईची मागणी आदिवासी दाम्पत्याने आमदार राजकुमार पटेल यांच्याकडे केल्यानंतर यंत्रणा हलली. आता तज्ज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीत दोन दिवसांच्या या चिमुकल्याचे शवविच्छेदन करून सत्यता तपासली जाणार आहे.  याप्रकरणात डॉक्टर व कर्मचाऱ्याच्या निलंबनासाठी आदिवासींनी ठिय्या आंदोलन केले. जोपर्यंत निलंबन होत नाही, तोपर्यंत मृतदेह उचलणार नाही, असा पवित्रा आंदोलकांनी घेतल्याने अकोला येथील आरोग्य उपसंचालकांनी कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत परिचारिका वर्षा नवगिरे यांना निलंबित केले आहे. बुटीदा येथील अंजली अजय अखंडे यांना १८ ऑगस्ट रोजी प्रसूतीसाठी रुग्णालयात दाखल केले. गुरुवारी तिची प्रसूती झाली. बाळाचे वजन कमी असल्याचे अंजली यांच्या लक्षात आले. ही बाब हजर परिचारिका, डॉक्टर व कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली. परंतु, संबंधित डॉक्टर व कर्मचाऱ्यांनी पूर्णतः दुर्लक्ष केले. शनिवारी सकाळी बाळ दगावले. 

कोणीच नाही ऐकले साहेब!शुक्रवारी रात्रभर कर्तव्यावर हजर परिचारिकांना बाळाच्या प्रकृतीसंदर्भात सांगितले. परंतु, त्यांनी सतत टाळाटाळ केली. डॉक्टरांनासुद्धा बोलावण्याचे कर्तव्य पार पाडले नाही, असा अनुभव अजय अखंडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला. 

चिमुकल्याचे शवविच्छेदन आमदार पटेल यांनी वरिष्ठांना दोषींवर कारवाईची मागणी करताच आरोग्य यंत्रणा खळबळून जागी झाली. दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आदेश  प्रशासनाला देण्यात आले. आता या चिमुकल्याचे बालरोगतज्ज्ञ व वरिष्ठ डॉक्टरांच्या उपस्थितीत शवविच्छेदन होणार असल्याची माहिती ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी साहेबलाल धुर्वे यांनी दिली.

बाळ कमी वजनाचे नव्हे, तर सुदृढ जन्माला आले. त्याचे वजन २ किलो ३०० ग्रॅम होते. बाळाचा श्वसननलिकेत  दूध गेल्याने मृत्यू झाला. तज्ज्ञ डॉक्टरांकडून शवविच्छेदन केल्यावर सर्व बाबी स्पष्ट होईल. - साहेबलाल धुर्वे, वैद्यकीय अधिकारी, ग्रामीण रुग्णालय, चुरणी

मेळघाटात आरोग्य यंत्रणेने मोठ्या प्रमाणात घोळ निर्माण केला आहे. आरोग्यमंत्र्यांना तशी तक्रार केली. चुरणी ग्रामीण रुग्णालयात जीव जाणे ही गंभीर बाब आहे. दोषींवर कारवाई करण्यासाठी वरिष्ठांना सांगितले आहे.- राजकुमार पटेल, आमदार, मेळघाट

 

टॅग्स :hospitalहॉस्पिटलDeathमृत्यू