शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
2
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
3
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
4
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
5
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
6
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
7
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
8
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
9
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
10
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
11
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
12
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
13
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
14
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
15
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
16
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
17
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
18
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
19
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
20
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

उपचाराअभावी शेतकऱ्याचा मृत्यू

By admin | Updated: November 10, 2014 22:35 IST

नापिकीमुळे विष प्राशन केलेल्या शेतकऱ्याचा वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीमुळे एक तासापर्यंत उपचार न मिळाल्याने मृत्यू झाला. ही घटना शिराळा येथे रविवारी सायंकाळी ५.४५ वाजता घडली.

अमरावती : नापिकीमुळे विष प्राशन केलेल्या शेतकऱ्याचा वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीमुळे एक तासापर्यंत उपचार न मिळाल्याने मृत्यू झाला. ही घटना शिराळा येथे रविवारी सायंकाळी ५.४५ वाजता घडली. याप्रकरणी संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्याविरुध्द कारवाईच्या मागणीसाठी संतप्त नागरिकांनी शिराळा प्राथमिक आरोग्य केंद्रासमोर सोमवारी दिवसभर ठिय्या आंदोलन केले. तसेच मृतदेहही आरोग्य केंद्रासमोर ठेवला होता.शिराळा येथील सुरेश शंकरराव समरीत (४५), असे मृताचे नाव आहे. केवळ दीड एकर शेती असलेल्या सुरेश समरीत यांना यावर्षी एकरी एक पोते सोयाबीन झाले. पीक पेरणीसाठी त्यांनी कर्ज काढले होते. परंतु उत्पादन न झाल्याने हताश झालेल्या सुरेशने राहत्या घरी रविवारी सायंकाळी विष प्राशन केले. ही बाब लक्षात येताच कुटुंबियांनी त्यांना तातडीने शिराळ्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात घेऊन आले. परंतु आरोग्य केंद्रात वैद्यकीय अनुपस्थित होते. याचवेळी पंचायत समिती सदस्य राजू गंधे येथे पोहोचले. त्यांनी लगेच वैद्यकीय अधिकारी भगत यांच्याशी संपर्क साधला. परंतु आता ड्युटी डॉ. चव्हाण यांची असल्याची माहिती भगत यांनी दिली. त्यामुळे चव्हाण यांच्याशी संपर्क साधला. त्यांनीही आपली ड्युटी नसून सध्या पुलगाव येथे असल्याचे पंचायत समिती सदस्य गंधे यांना दूरध्वनीवरुन सांगितले.एक तास हा घटनाक्रम सुरु असताना विष प्राशन केलेला शेतकरी सुरेश समरीत यांचा मृत्यूशी संघर्ष सुरु होता. त्यामुळे त्यांना उपचार मिळावे म्हणून तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविले. मात्र वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी सोमवारी शवविच्छेदनानंतर दुपारी १२ वाजता मृतदेह शिराळ्याच्या प्राथमिक आरोग्य केंद्रासमोर आणून ठेवला. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे नापिकीने त्रस्त शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याने डॉक्टरांवर कारवाई होईपर्यंत मृतदेह हलविणार नाही, अशी भूमिका संतप्त ग्रामस्थांनी घेतली होती. तब्बल चार तास मृतदेह आरोग्य केंद्रात ठेवला होता. यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान जिल्हा आरोग्य अधिकारी एन. एन. भालेराव यांनी येथे भेट देऊन आंदोलनकर्त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. आपल्या मागण्या जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी अनिल भंडारी यांच्यापर्यंत पोहोचून तेच आरोग्य उपसंचालकाकडे प्रस्ताव पाठवितील, असे आश्वासन दिले. परंतु संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांविरुध्द कारवाई होईपर्यंत ठिय्या आंदोलन सुरुच राहिल, अशी भूमिका आंदोलनाचे नेतृत्व करणारे पंचायत समिती सदस्य राजू गंधे यांनी घेतली होती. वृत्तलिहिस्तोवर आंदोलन सुरुच होते.या आंदोलनात जयंत आमले, प्रकाश अजमिरे, मुसाफीर खाँ पठाण, पद्माकर हटवार, रईस खॉ पठाण, प्रभाकर भागवत, प्रल्हाद गभने आदी ग्रामस्थांचा सहभाग होता.