शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
4
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
5
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
6
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
7
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
8
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
9
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
10
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
11
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
12
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
13
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
14
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
15
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
16
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
17
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
18
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
19
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
20
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
Daily Top 2Weekly Top 5

संत्र्यावर घातक कोळशीचा प्रादुर्भाव

By admin | Updated: October 1, 2015 00:35 IST

जिल्ह्यातील ५ हजार हेक्टरवर संत्रा उत्पादन क्षेत्रात घातक कोळशीचा प्रादुर्भाव झाला आहे.

वेळीच व्यवस्थापन गरजेचे : संत्रा उत्पादकांना सहकार्याची गरज अमरावती : जिल्ह्यातील ५ हजार हेक्टरवर संत्रा उत्पादन क्षेत्रात घातक कोळशीचा प्रादुर्भाव झाला आहे. अत्यंत घातक असणाऱ्या कोळशीचे वेळीच नियंत्रण न केल्यास झाडाचे आरोग्य, आयुष्यमान, यावर विपरीत परिणाम होऊन संत्राचे उत्पादन तसेच गुणवत्तेवर मोठ्या प्रमाणात परिणाम होऊ शकतो. जिल्ह्यातील काही भागात पांढरी-काळी माशीमूळे उत्पन्न होणाऱ्या कोळशी रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. यापूर्वी विदर्भात ८० चे दशकात या रोगाचा भयानक उद्रेक होऊन संत्रा बगिच्याची मोठी हानी झाली होती. त्यामुळे या भागातील संत्रा लागवडसुध्दा मंदावली होती. सामूहिक प्रयत्नानंतर कोळशीला अटकाव करण्यास यश मिळाले व संत्र्याच्या लागवड क्षेत्रातदेखील वाढ झाली. यंदा मात्र काही भागात काळ्या माशीचा उपद्रव वाढल्याचे कृषितज्ञांनी सांगितले. यापूर्वीचा कोळशीविषयी वाईट अनुभव लक्षात घेता संत्रा उत्पादकांनी वेळीच सतर्क राहून तज्ज्ञांच्या सहकार्याने व्यवस्थापन करणे गरजेचे आहे.जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाद्वारे संत्रा पीक संरक्षण योजनेअंतर्गत ५० टक्के अनुदानावर मोनोक्रोटोफॉस व डायमेथोएट या कीटकनाशकांचे वितरण सुरू आहे. परंतु यामध्ये २ हजार ४९१ हेक्टर संरक्षण क्षेत्र असल्याने हे प्रयत्न तोकडे ठरत आहेत. यासाठी शासन स्तरावर व्यापक स्वरुपात मोहीम राबविणे गरजेचे आहे. जिल्ह्यात ६९ हजार हेक्टर क्षेत्रावर संत्रापीक आहे. दर्यापूर व भातकुली हा खारपानपट्टा चिखलदरा व धारणी हे संत्रासाठी प्रतिकूल तालुके वगळता जिल्ह्यातील १४ तालुक्यांत मोठ्या प्रमाणात संत्राचे उत्पादन घेतले जाते. (प्रतिनिधी)