शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
2
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
3
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
4
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
5
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
6
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
7
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
8
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
9
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
10
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
11
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
12
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
13
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
14
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
15
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
16
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
17
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
18
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
19
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
20
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
Daily Top 2Weekly Top 5

सेतू नागरी केंद्रात ‘दलालराज’

By admin | Updated: January 12, 2017 00:07 IST

महसूल विभागाने नागरिकांच्या सुविधेसाठी सुरु केलेल्या सेतू नागरी सुविधाकेंद्रातील ‘दलालराज’चा भंडाफोड तहसीलदारांच्या पुढाकाराने बुधवारी करण्यात आला.

फेरफारासाठी मागितले पैसे : पोलिसांनी नोंदविले दोघांचे बयाणअमरावती : महसूल विभागाने नागरिकांच्या सुविधेसाठी सुरु केलेल्या सेतू नागरी सुविधाकेंद्रातील ‘दलालराज’चा भंडाफोड तहसीलदारांच्या पुढाकाराने बुधवारी करण्यात आला. प्रॉपर्टी कार्ड, फेरफार करण्यासाठी १५ हजारांची मागणी करणाऱ्या दोघांचे बयाण कोतवाली पोलिसांनी नोंदविले असून या सेतू केंद्राची तपासणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.महसूल विभागाने सेतू नागरी सुविधाकेंद्र विविध संस्थांना चालविण्यासाठी दिले आहेत. याकेंद्रात विविध कामांसाठी आकारले जाणारे शुल्क महसूल विभागाने निश्चित केले आहे. मात्र, काही सेतू केंद्रांच्या संचालकांनी याकेंद्रांना कमाईचे साधन बनविले आहे. याकेंद्रांमध्ये नागरिकांकडून अव्वाच्या सव्वा रक्कम वसूल केले जात असून त्यासाठी दलालही सक्रिय झाले आहेत.सेतू केंद्र कर्मचाऱ्याशी वादअमरावती : एमआयडीसी मार्गावरील सेतू केंद्रात सक्रिय अशाच एका दलालाने अंजनगाव बारी येथील अमोल कदम यांना प्रॉपर्टी कार्ड, फेरफार करून देण्यासाठी १५ हजारांची मागणी केली होती. त्यानुसार कदम यांनी १३ हजार ५०० रुपये देण्याचे निश्चित केले. प्रॉपर्टी कार्ड, फेरफारसाठी आवश्यक कागदपत्रे देताना अमोल कदम यांनी सेतू केंद्रातील दलालांना ९ हजार ५०० रुपये दिले. तरी सुद्धा निर्धारित वेळेत फेरफार झाले नाही. त्यामुळे अमोल कदम हे सेतू केंद्रात विचारणा करण्यासाठी वारंवार गेलेत. मात्र, त्यांना उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. महसूल अधिकाऱ्यांना कामासाठी पैसे देण्यात आले असून लवकरच काम होईल, असेही कदम यांना सांगण्यात आले. परंतु पैसे देऊनही काम होत नसल्याचे बघून अमोल कदम यांनी तहसीलदार सुरेश बगळे यांच्याकडे धाव घेतली. तहसीलदारांना वस्तुस्थिती सांगितली. त्यानंतर तहसीलदार बगळे यांनी एमआयडीसी सेतूकेंद्राच्या संचालकांना बोलावून अमोल कदम यांच्याकडून प्रॉपर्टी फेरफारसाठी घेतलेले ९ हजार ५०० रूपये परत देण्यास सांगितले. मात्र कर्मचाऱ्यांनी पैसे घेतलेच नसल्याचे सांगितले. इतकेच नव्हे तर तहसीलदार सुरेश बगळे यांच्याशी सुद्धा सेतू केंद्राच्या कर्मचाऱ्यांनी वाद घातला. अखेर तहसीलदाराने सिटी कोतवाली पोलिसांना पाचारण केले. सेतू केंद्राचे मंगेश गुल्हाने यांचे बयाण पोलिसांनी नोंदविले. हे प्रकरण अंगलट येण्याची चिन्हे दिसताच सेतू केंद्राच्या संचालकांनी माघार घेत अमोल कदम यांच्याकडून घेतलेले पैसे परत देण्याची तयारी दर्शविली. दरम्यान तहसीलदार सुरेश बगळे यांनी एमआयडीसीतील सेतू केंद्राचे कामकाज ‘ब्लॉक’ करण्याची कारवाई केली.सेतू केंद्रात अतिरिक्त पैसे घेतल्यास तक्रार नोंदवासेतू केंद्रात नागरिकांकडून अतिरिक्त पैसे उकळले जात असल्यास तक्रार नोंदविण्याचे आवाहन महसूल विभागाने केले आहे. सेतू केंद्रात विविध कामांसाठीचे शुल्क निश्चित करण्यात आले आहे. अतिरिक्त पैशांची मागणी केल्यास सेतू केंद्रांच्या संचालकांविरूद्ध तक्रार नोंदविण्याचे आवाहन तहसीलदार सुरेश बगळे यांनी केले आहे. शुल्कासंदर्भातील फलक लावण्याच्या सूचना सेतू केंद्रांना देण्यात आल्या आहेत.सेतू केंद्रात आर्थिक फसवणुकीच्या तक्रारी वाढत आहेत. एमआयडीसी सेतू केंद्राचे प्रकरण समोर आले. केंद्र सील करण्याची कारवाई करण्याचा निर्णय घेताच केंद्र संचालकांनी पैसे परत केले.- सुरेश बगळे, तहसीलदार, अमरावती