शहरं
Join us  
Trending Stories
1
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
4
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
5
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
6
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
7
६ धावांत ४ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
8
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
9
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
10
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
11
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
12
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
13
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
14
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
15
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
16
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
17
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
18
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
19
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
20
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका

Coronavirus in Amravati; यावर्षी सालगड्याचा मोबदला लाखाचा उंबरठा पार करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 04, 2021 3:56 PM

Amravati news Agriculture संपूर्ण शेती घरी करावयाची असल्यास सालगडी ठेवावा लागतो. मात्र, सालगड्याचे भाव वधारले आहेत. यावर्षी सालगड्याचा भाव लाखाचा टप्पा पार करणार असल्याचे बोलले जात आहे.

ठळक मुद्देसालगडी ठेवणे झाले कठीण

लोकमत न्यूज नेटवर्क 

अमरावती : दरवर्षी गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर सालगडी ठेवून शेती काम करण्यास शेतकरी सज्ज होतात. परंतु गेल्या काही वर्षात सततच्या नापिकीने शेतकरी मोठ्या आर्थिक अडचणीत सापडला आहे, तर शेती जास्त असलेले शेतकरी काही शेती बटाई पद्धतीने देण्यावर जास्त भर देत आहेत. संपूर्ण शेती घरी करावयाची असल्यास सालगडी ठेवावा लागतो. मात्र, सालगड्याचे भाव वधारले आहेत. यावर्षी सालगड्याचा भाव लाखाचा टप्पा पार करणार असल्याचे बोलले जात आहे.

             यावर्षी अतिवृष्टी झाल्याने ओल्या दुष्काळाचे चटके शेतकऱ्यांना सहन करण्याची वेळ येत आहे. चारा टंचाई व पाणीटंचाईमुळे नागरिक हैराण होत आहेत. अनेक जंगलव्याप्त भागात पाण्याची टंचाई उद्भवत असल्याने पशुपालक व शेतकऱ्यांना कमालीचा त्रास होत आहे. शिवाय पशुखाद्य महाग झाल्यामुळे चाऱ्याच्या टंचाईला सामोरे जावे लागत आहे. यंत्रयुगात शेती महागडी झाली आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे शेती करणे अवघड झाले असल्याने बटाईने शेती घेण्याससुद्धा कोणी तयार होत नाही.

कसे बसे शक्य झाले तर नापिकी व शेतमालाला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. त्यामुळे शेती करण्यासाठी सालगडी ठेवणेही कठीण झाले आहे. पूर्वी मोठ्या शेतकऱ्यांकडे तीन ते चार सालगडी असायचे. परंतु आता सालगड्याचे भाव वधारल्याने पगार देण्यासाठी नगदी रक्कम आणायची कुठून, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडत आहे. गुढी पाडव्याच्या दिवशी ग्रामीण भागात वर्षभरासाठी सालगडी ठेवला जातो. परंतु तालुक्याच्या ठिकाणी ग्रामीण भागात मोजण्याइतके शेतकरी सोडले तर कोणी शेतकरी सालगडी ठेवण्यास धजावत नाहीत.

             गतवर्षी सालगड्याचा दर ७० ते ८० हजार रुपये प्रतिवर्ष होते. यंदा यात मोठी वाढ झाली असल्याचे बोलले जात असून, ८० ते ९० हजार रुपये वर्ष याप्रमाणे पैसे द्यावे लागत आहेत. सततच्या दुष्काळाने सालगडी ठेवणे शक्य नाही. त्यामुळे शेतकरी आता आपली शेती बटाईने देण्याचा विचार करत असल्याचे दिसून येत आहे. सालगड्याला पगार देण्यापेक्षा शेतात जाऊन काम केलेले पुरेल. एकंदरीत शेताची अवस्था दयनीय झाली असून, शेतकऱ्यांमध्येसुद्धा उत्साह दिसत नाही.

शेतकरी निरूत्साही

शेतकऱ्यांसाठी गुढीपाडवा हा महत्त्वाचा सण आहे. हे नवे शेतीचे वर्ष म्हणून शेतकरी नव्या वर्षाची सुरुवात गुढीपाडव्यापासून करतात. नवीन शेतात नवीन रोप बनवणे, रोपांची लागवड करणे, आदी काम गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर केली जातात. मात्र, यावर्षी शेतकरी सालगडी शोधण्याच्या प्रयत्नात दिसत नाहीत. गेल्या चार वर्षांपासूनच्या सततच्या दुष्काळामुळे शेतकऱ्यांचे अर्थचक्र कोलमडले आहे. लावलेला खर्चही शेतातून निघालेला नाही. त्यामुळे शेतकरी कर्जबाजारी झालेले आहेत. त्यामुळे शेतकरी सालगडीसुद्धा ठेवण्याच्या मनस्थितीत नाही.

टॅग्स :agricultureशेती