कोरोनाचा हादरा, पुन्हा २०

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2020 05:01 IST2020-06-17T05:00:00+5:302020-06-17T05:01:37+5:30

बडनेरा येथील नवीवस्तीच्या जयस्तंभ चौकातील ६० वर्षीय एका औषधी व्यावसायिकासह त्यांचा ३० वर्षांचा मुलगा तसेच अन्य १३ वर्षाचा मुलगा, ४५ वर्षीय पुरुष व ३८ वर्षीय महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे. जुन्या वस्तीत माळीपुऱ्यातील २९ वर्षीय पुरुष, ३५ वर्षीय महिला व १७ वर्षांची पॉझिटिव्ह तरुणी कोरोनाग्रस्तांच्या संपर्कातील हायरिस्कमधील आहे. येथील गांधी विद्यालयाजवळील २३ वर्षीय युवक हा यापूर्वी संक्रमित युवकाचा भाऊ आहे.

Corona tremor, again 20 | कोरोनाचा हादरा, पुन्हा २०

कोरोनाचा हादरा, पुन्हा २०

ठळक मुद्देएकूण ३६८: महापौरांच्या प्रभागातही पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : महापालिका क्षेत्रात कोरोनाचा संसर्ग वाढला आहे. उपमहापौराच्या प्रभागानंतर महापौरांच्या प्रभागात कोरोनाग्रस्तांची नोंद झाली. जिल्ह्यात पहिल्यांदाच दिवसभरात २० संक्रमितांची नोंद झाल्याने कोरोनाचा हादरा बसला आहे. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या लॅबद्वारे मंगळवारी तीन टप्प्यांत २० संक्रमित व्यक्तींची नोंद झाल्याने जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची संख्या आता ३६८ वर पोहोचली आहे.
बडनेरा येथील नवीवस्तीच्या जयस्तंभ चौकातील ६० वर्षीय एका औषधी व्यावसायिकासह त्यांचा ३० वर्षांचा मुलगा तसेच अन्य १३ वर्षाचा मुलगा, ४५ वर्षीय पुरुष व ३८ वर्षीय महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे. जुन्या वस्तीत माळीपुऱ्यातील २९ वर्षीय पुरुष, ३५ वर्षीय महिला व १७ वर्षांची पॉझिटिव्ह तरुणी कोरोनाग्रस्तांच्या संपर्कातील हायरिस्कमधील आहे. येथील गांधी विद्यालयाजवळील २३ वर्षीय युवक हा यापूर्वी संक्रमित युवकाचा भाऊ आहे. सराफा बाजार, सक्करसाथमधील २७ वर्षीय तरुण चार-पाच दिवसांपासून आजारी असल्याने त्यांचा स्वॅब घेण्यात आला असता, अहवाल पॉझिटिव्ह आला. पठाण चौकातील ४३ वर्षीय व्यक्ती व यशोदानगरातील २७ वर्षीय तरुणाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. यांची हिस्ट्री शोधली जात आहे. टाकरखेडा श्ांभू येथील ४७ वर्षीय व्यक्ती मुंबई रिटर्न क्वारंटाईन आहे. यांसह चांदूर बाजार येथील २६ वर्षीय व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला. हा तरुण येथील पॉझिटिव्हचा नातेवाईक असल्याचे सांगण्यात आले.
दुपारच्या अहवालात साईनगर येथील ५६ वर्षीय व्यक्ती, टायगर प्रोजेक्ट कार्यालयातील बाधित वनमजुराचे संपर्कातील १८ वर्षीय तरुणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला. मंगळवारी रात्री ८ च्या सुमारास राजहिलनगरातील पाच वर्षीय बालकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. शहरात पुन्हा चार नव्या भागांत कोरोनाग्रस्तांची नोंद झाली आहे. संपर्कातील व्यक्तींचा शोध यंत्रणाद्वारे घेण्यात येत आहे. बाधितांचे घराकडे जाणारे मार्ग अत्यावश्यक कारणांशिवाय आवागमनास बंदी घालण्यात आली, तर नवे कंटेनमेंट जाहीर करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

दोन्ही अहवाल खासगी लॅबचे
येथील इंद्रभुवन थिएटर परिसरातील गरबा चौकात वास्तव्य असणाºया २४ वर्षीय महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे. या पसिरात पॉझिटिव्ह आलेल्या महिलेच्या संपर्कातील ही तरुणी आहे. त्यांना कोविड रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बडनेरा नवीवस्तीतील ४१ वर्षीय पुरुषाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. हे दोन्ही अहवाल नागपूर येथील एका खासगी लॅबन दिल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले.

Web Title: Corona tremor, again 20