शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
2
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
3
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
4
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
5
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
6
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
7
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
8
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
9
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
10
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
11
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
12
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
13
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
14
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
15
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
16
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
17
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
18
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
19
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
20
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना; ३,७११ चाचण्यांचा उच्चांक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:13 IST

अमरावती : जिल्ह्यात बुधवारी पहिल्यांदा उच्चांकी ३,७११ कोरोना चाचण्यांची नोंद झालेली आहे. यामध्ये १०.९४ टप्पे पॉझिटिव्हिटीची नोंद झाल्याने ...

अमरावती : जिल्ह्यात बुधवारी पहिल्यांदा उच्चांकी ३,७११ कोरोना चाचण्यांची नोंद झालेली आहे. यामध्ये १०.९४ टप्पे पॉझिटिव्हिटीची नोंद झाल्याने जिल्ह्याला दिलासा मिळाला आहे.

जिल्ह्यात कोरोना चाचण्यांचा सर्व भार संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या विषाणू परीक्षण प्रयोगशाळेवर आहे. या प्रयोगशाळेत आता नवीन मशीन बसविण्यात आल्याने नमुने तपासणीची किमान ९०० ने क्षमतावाढ झालेली आहे व परिणामी जिल्ह्यात चाचण्यांची संख्या वाढलेली आहे. याशिवाय रॅपिड अन्टीजेनच्या चाचण्याही होत आहेत. या चाचण्यांसाठी जिल्ह्यातील ११ खासगी प्रयोगशाळांना मनाई करण्यात आलेली आहे. सीएस, डीएचओ किंवा एमओएच यांच्या अतंर्गत असलेल्या केंद्रावरच सध्या रॅपिड अँटिजेन चाचण्या होत आहे. त्यादेखील हायरिस्कचे व्यक्ती, आजारी व्यक्ती किंवा गर्भवती स्त्रियांचीच फक्त रॅपिड टेस्ट केली जात असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले.

अमरावती विद्यापीठाच्या प्रयोगशाळेला आता १० महिने पूर्ण होत आहे. या कालावधीत १,२५,००८ आरटी-पीसीआर चाचण्या करण्यात आल्या. जिल्ह्यात संशयित रुग्णांचे नमुने मार्च २०१९ पासून घेण्यात येत आहे. सुरुवातीला नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व नंतर वर्धा व अकोला येथील वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रयोगशाळेतून नमुने तपासणी व्हायची. यात अहवाल मिळायला वेळ लागायचा. त्यामुळे अमरावती विद्यापीठात आरटी-पीसीआर नमुन्यांची तपासणी करण्यासाठी प्रयोगशाळा तयार करण्यात आलेली आहे व जिल्ह्यातील चाचण्या तपासणीचा पूर्ण भार आता याच प्रयोगशाळेवर असल्याने साधारणपणे दुसऱ्या दिवशी अहवाल मिळत आहे.

पाईंटर

रोजचे नमुने तपासणी

१० मार्च : २,१०६

११ मार्च : २,२६८

१२ मार्च १,७९२

१३ मार्च : २,६०४

१४ मार्च : २,७०९

१५ मार्च : २,९३३

१६ मार्च : ३,५७८

१७ मार्च : ३७११

पाईंटर

आतापर्यंत झालेल्या चाचण्या :२,५७,४७८

यामध्ये झालेली पॉझिटिव्हची नोंद : ४३,७५७

एकूण निगेटिव्ह नमुने : २,२२,४६६

नमुने अहवाल प्रतिक्षेत : ८२९

बॉक्स

विद्यापीठ लॅबच्या चाचण्यांमध्ये १७.४० पॉझिटिव्हिटी

विद्यापीठाचे लॅबद्वारा आतापर्यंत १,२५,००८ चाचण्यांची तपासणी करण्यात आली. यामध्ये १४,३८४ पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झालेली आहे. ही १७.४० टक्के पॉझिटिव्हिटी आहे. यात शहरातील ६७,७५० नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी १४,३८४ पॉझिटिव्हची नोंद झाली, तर ग्रामीणमधील ५७,२५८ चाचण्या करण्यात आल्या. यात ७,३७१ अहवाल पाॅझिटिव्ह आढळले आहेत. याव्यतिरिक्त खासगी लॅबनी २३,१३७ चाचण्या केल्या यात ७,८४१ पॉझिटिव्ह नोंदविले आहे.

बॉक्स

रॅपिड अँटिजेनमध्ये १०.२७ टक्के रुग्ण पॉझिटिव्ह

जिल्ह्यात आतापर्यंत रॅपिड अँटिजेनच्या १,१८,१७२ चाचण्या करण्यात आल्यात व यात १२,१४७ नमुने पॉझिटिव्ह आढळले आहेत. या चाचण्यांमध्ये १०.२७ टक्के पॉझिटिव्हिटीची नोंद करण्यात आलेली आहे. यामध्ये शहरात ६२,३७१ चाचण्या करण्यात आल्या व यामध्ये ६,५४१ चाचण्या पॉझिटिव्ह आल्या याशिवाय ग्रामीणमध्ये ५५,८०१ चाचण्या करण्यात आल्या व यामध्ये ५,६०६ नमुने पॉझिटिव्ह नोंद झाले आहे.

बॉक्स

१८ ते २० तासांत पॉझिटिव्ह-निगेटिव्हचा ‘एसएमएस’

विद्यापीठ लॅबमध्ये आता एक सॉफ्टवेअर लावण्यात आले. यात चाचण्या झाल्यावर व त्याची नोंद केल्यानंतर संबंधिताना पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्हचा‘एसएमएस’१८ ते २० तासंत जातो व त्यात पॉझिटिव्ह असल्यास त्यांनी सीएस, डीएचओ व एमओएच यांच्या कायार्लयातील संबंधित क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात येते व या सॉफ्टवेअरचा लॉगिन आयडी या तिन्ही कार्यालयांना देण्यात आल्याचे सांगण्यात आले.

कोट

विद्यापीठ लॅबद्वारा सद्यस्थितीत २५०० चाचण्या होत आहे. नवीन मशीन बसविण्यात आल्यानंतर चाचण्या तपासणीची क्षमतावाढ झालेली आहे.

- डॉ. प्रशांत ठाकरे,

समन्वयक, विद्यापीठ लॅब