शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
2
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
3
नराधम अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
4
Top Marathi News LIVE Updates: मी असतो तर आरोपींना फाशी दिली असती- अमित ठाकरे
5
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दशहत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
6
IPL 2026: ५ सामने, ० विकेट्स! MIचा हुकूमी एक्का जसप्रीत बुमराहचा 'फ्लॉप शो'; 'हे' आहे कारण
7
नवग्रह काही वाकडं करू शकणार नाही, उलट अपार लाभ-भरभराट होईल; अक्षय्य तृतीयेला ‘हे’ दान करा!
8
कर्जात बुडालेले लोक आता घेताहेत सोन्यावर कर्ज, बुडण्याची भीती वाढली
9
सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ तेजी; पाहा २४K, २२K, १८K सोन्याचा तुमच्या शहरातील दर 
10
सांगली हादरली! पत्नीला घरात ठेवण्याच्या हट्टापायी आईची हत्या; वडील घरी नसताना मुलाचे क्रूर कृत्य
11
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
12
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
13
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
14
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
15
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला आमरसपुरीचे जेवण आणि पितरांना ठेवतात नैवेद्य; काय आहे प्रथा? वाचा 
16
होर्मुजच्या सामुद्रधुनीत जहाजांवरील हल्ले खपवून घेणार नाही! भारताचा संयुक्त राष्ट्रात इशारा; सुरक्षेसाठी आक्रमक भूमिका
17
Pakistan Explosion: पाकिस्तानमध्ये भीषण स्फोट! ८ जण ठार, अनेकजण होरपळले, नेमकं काय घडलं?
18
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
19
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
20
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषदेच्या विषय समितींवर काँग्रेसचे वर्चस्व

By admin | Updated: October 1, 2014 23:15 IST

जिल्हा परिषदेच्या चार विषय समितींसाठी बुधवारी घेण्यात आलेल्या निवडणुकीत काँग्रेसने समाज कल्याण, बांधकाम व शिक्षण, कृषी आणि पशुसंवर्धन या तीन समितींवर बाजी मारली. तर महिला बालकल्याण

निवडणूक : प्रथमच तीन महिला सभापती सांभाळणार धुरा अमरावती : जिल्हा परिषदेच्या चार विषय समितींसाठी बुधवारी घेण्यात आलेल्या निवडणुकीत काँग्रेसने समाज कल्याण, बांधकाम व शिक्षण, कृषी आणि पशुसंवर्धन या तीन समितींवर बाजी मारली. तर महिला बालकल्याण समितीवर राष्ट्रवादीने कब्जा केला. जिल्हा परिषदेची सत्ता एकहाती मिळविण्यात काँग्रेसने यश मिळविले आहे. विशेष म्हणजे पहिल्यांदाच विषय समितींवर तीन महिला सभापती कामकाज सांभाळणार आहेत. समाजकल्याण समितीच्या सभापतिपदासाठी पार पडलेल्या निवडणुकीत काँग्रेसच्या सरिता मकेश्र्वर आणि शिवसेनेचे सुधीर सूर्यवंशी यांच्यात निवडणूक झाली. यामध्ये सरिता मकेश्र्वर यांना ३३ मते मिळालीत. शिवसेनेचे सुधीर सूर्यवंशी यांनी नामांकन अर्ज दाखल केला असला तरी सभागृहात शिवसेना, भाजप, प्रहार, रिपाइं, बसप आदी पक्षाचे सदस्य गैरहजर राहिल्याने सूर्यवंशी यांच्या पारड्यात एकही मत पडू शकले नाही. त्यामुळे समाजकल्याण सभापती म्हणून सरिता मकेश्र्वर यांना विजयी घोषित करण्यात आले.महिला व बालकल्याण समिती सभापतीपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वृषाली विघे आणि जनसंग्रामच्या राजश्री श्रीराव यांनी नामाकंन दाखल केले होते. या निवडणुकीत वृषाली विघे यांना काँग्रेस वऱ्हाड विकास मंच व राष्ट्रवादीचे प्रत्येकी दोन आणि बसपचा एक अशी सर्वाधिक ३५ मते मिळाली. तर प्रतिस्पर्धी राजश्री श्रीराव यांना जनसंग्रामची दोन मते मिळाली. त्यामुळे वृषाली विघे यांना विजयी घोषित करण्यात आले. प्रहारची राष्ट्रवादीला साथमहिला बालकल्याण समितीच्या सभापतीपदासाठी झालेल्या निवडणुकीत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार वृषाली विघे यांना काँग्रेसचे २५, बसपा १, वऱ्हाड विकास मंच ५ व प्रहारच्या जिल्हा परिषद सदस्या कविता वसू, कविता दामेधर या दोन महिला सदस्यांनी मतदान करून सर्वच पदाधिकाऱ्यांना धक्का दिला. विरोधकांची खेळी अयशस्वीजि.प. अध्यक्ष, उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत काँग्रेसने वऱ्हाड विकासमंचसोबत हातमिळवणी करुन सत्ता हस्तगत केली होती. त्यानंतर बुधवारी काँग्रेसमध्ये सभापतीपदासाठी इच्छुकांची मोठी रीघ असल्याने विरोधकांनी या समितींवर वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी खेळी केली. ऐनवेळी विरोधकांचा हा प्रयोग फसल्याने काँग्रेसने बाजी मारली.