शहरं
Join us  
Trending Stories
1
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
2
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
3
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
4
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
5
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
6
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
7
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
8
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
9
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
10
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
11
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
12
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
13
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
14
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
15
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
16
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
17
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
18
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
19
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
20
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
Daily Top 2Weekly Top 5

नगरपंचायतींची स्थापना पूर्ण, आता प्रतीक्षा प्रभाग रचनेची

By admin | Updated: June 3, 2015 00:28 IST

जिल्ह्यातील चार तालुका मुख्यालयी असलेल्या ग्रामपंचायतींचे रूपांतर नगर पंचायतीमध्ये करण्यात आले.

जितेंद्र दखने अमरावतीजिल्ह्यातील चार तालुका मुख्यालयी असलेल्या ग्रामपंचायतींचे रूपांतर नगर पंचायतीमध्ये करण्यात आले. त्यामुळे नगरपंचायतीची स्थापना झाली. मात्र आता या ठिकाणी प्रभाग रचनेची प्रतीक्षा पुढाऱ्यांना लागली आहे. जिल्ह्यातील धारणी, तिवसा, नांदगाव खंडेश्वर व भातकुली या चार तालुक्यांच्या ठिकाणी आतापर्यंत ग्रामपंचायती अस्तित्वात होत्या. मात्र काही महिन्यांपूर्वी या चार तालुक्यांच्या ठिकाणी असलेल्या ग्रामपंचायतीचे रूपांतर नगर पंचायतीत करण्यात आले. त्यामुळे नुकत्याच पार पडलेल्या या सर्वात मोठ्या ग्रामपंचायतींचे निवडणूक नगरपंचायतीमुळे होऊ शकल्या नाहीत. त्यामुळे आता विद्यमान सदस्य असलेल्या या ग्रामपंचायतींच्या पुढाऱ्यांना प्रभागरचनेची उत्सुकता लागली आहे. या ग्रामपंचायतींच्या माध्यमातून स्थानिक नेत्यांनी आपले वर्चस्व कायम ठेवले आहे. ग्रामपंचायत असून शहर व तालुक्यांचे मुख्यालय असल्याने येथील सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्यांचा मान मोठा होता. अशातच राज्य शासनाने जिल्ह्यातील चार ग्रामपंचायती बरखास्त करून याठिकाणी नगरपंचायती स्थापन करण्याचा निर्णय घेऊन या नव्याने अस्तित्वात आलेल्या नगरपंचायतींवर प्रशासक म्हणून अधिकाऱ्यांच्या नियुक्त्याही केल्या आहेत. त्यामुळे सध्या या नगरपंचायतींचा कारभार प्रशासक असलेले अधिकारी सांभाळत आहेत. परंतु नगरपंचायत अस्तित्वात आल्याने काही दिवसांत निवडणुका लागणार असून या निवडणुकीसाठी प्रभागरचना व अन्य प्रक्रिया त्यापूर्वी होणे गरजेचे आहे. ग्रामपंचायत बरखास्त करून नगरपंचायत अस्तित्वात आल्याने अनेक प्रकारचे बदल यात होणार आहेत. त्यादृष्टीने शासन व प्रशासन स्तरावर नगरपंचायत स्थापनेनंतर करावयाच्या उपाययोजनाबाबत हालचाली सुरू नसल्याने येथील पुढाऱ्यांना मात्र प्रभाग रचना व अन्य उपाययोजनांची उत्सुकता लागली आहे. या आहेत नवीन नगरपंचायती जिल्ह्यातील चार ग्रामपंचायती बरखास्त करण्यात आल्या आहेत. त्यामुळे धारणी, तिवसा, भातकुली, नांदगाव खंडेश्र्वर या चार तालुका मुख्यालयाच्या ठिकाणी नव्याने नगरपंचायती अस्तित्वात आल्या आहेत.नव्याने ज्या चार नगरपंचायती अस्तित्वात आल्यात, त्या ठिकाणी प्रशासनाने प्राथमिक स्तरावर सध्या असलेल्या वॉर्ड, लोकसंख्या, याची माहिती संकलित करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. मात्र प्रभाग रचनेबाबत अद्याप कार्यक्रम प्राप्त झाला नाही.- राम सिध्दभट्टी,प्रभारी अप्पर जिल्हाधिकारी अमरावती.