शहरं
Join us  
Trending Stories
1
PM मोदींचे आवाहन सकारात्मकतेने घेणं गरजेचं, विरोधकांनी थट्टा करू नये- मुख्यमंत्री फडणवीस
2
PM मोदी म्हणाले, १ वर्ष सोनं खरेदी करू नका; पण चांदीबद्दल काहीच का नाही बोलले? दर वर्षी किती चांदी खरेदी करतो भारत?
3
Top Marathi News Live: नागपूर विमानतळाला आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणून केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता
4
इराणचा 'डर्टी बॉम्ब'! एका स्फोटात शहरं होतील ओसाड; अमेरिकन नौदलाला हाय अलर्ट
5
वर्दीतील देवदूत! हायवेवर Heart Attack आलेल्या चालकाचे वाचवले प्राण; इंटरनेटवर कौतुकाचा वर्षाव
6
देश मजबूत करू, PM मोदींना साथ देऊ! मुंबईकर आमदारांचा गोवा तेजस एक्स्प्रेसने प्रवास; म्हणाले…
7
STचे प्रवाशांसाठी मोठे पाऊल! १ जूनपासून सर्व स्वच्छतागृहे मोफत; प्रताप सरनाईकांची घोषणा
8
पती हरवल्याची तक्रार घेऊन पोलीस ठाण्यात आली; तपास सुरू झाला, समोर आले पत्नीचे दोन आशिक अन्.. 
9
Huma Praveen : २ मुलींची जबाबदारी, १० वर्षे नोकरी, ५ वर्षे अपयश; किचनमध्ये केला अभ्यास, सून झाली ऑफिसर
10
LPG ग्राहकांसाठी सूचना! छोटीशी चूक तुम्हाला अडचणीत आणू शकते; सरकार लोकांना का करतंय अलर्ट?
11
“मनमानी भाडेवाढ करणारे खासगी बस वाहतूकदार, अवैध प्रवासी ॲपवर कारवाई करा”: प्रताप सरनाईक
12
चाणक्य नीती: ऑफिस असो वा घर, प्रगतीसाठी नेहमी लक्षात ठेवा आचार्य चाणक्य यांनी सांगितलेले 'हे' १० नियम!
13
महाग सोन्यामुळे भारताची तिजोरी का रिकामी होत चालली आहे?
14
"ट्रम्प ब्रँड विषारी झालाय" म्हणत ट्रम्प टॉवरचा प्रकल्पच गुंडाळला; ऑस्ट्रेलियात बिल्डरकडून 'करेक्ट कार्यक्रम'
15
अजब-गजब सवय... गेली ८ वर्ष एकच अंडरवेयर घालून खेळतोय ब्राझीलचा स्टार फुटबॉलपटू एडरसन
16
फ्री वायफायच्या नादात चुकूनही करू नका 'हे' काम; अन्यथा एका मिनिटात बँक बॅलन्स होईल झिरो!
17
Palmistry: सरकारी नोकरी, खाजगी नोकरी की व्यवसाय? तुमच्या हातावरील रेषा काय सांगतात? 
18
Video - १ कोटीची नोकरी सोडून अपार्टमेंट्समध्ये करते साफसफाई; म्हणाली, "पैसा म्हणजे स्वातंत्र्य"
19
Tata Altroz CNG AMT: ट्रॅफिकच्या कटकटीतून सुटका, टाटा अल्ट्रोझ सीएनजी ऑटोमॅटिक भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत!
20
"ओ शंभूराजेsss...", 'राजा शिवाजी'नंतर असं बदललं अभिषेक बच्चनचं आयुष्य, सांगितला किस्सा
Daily Top 2Weekly Top 5

थेट ठाण्यात येऊन अल्पवयीन मुलीनेच रोखला स्वत:चा बालविवाह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 05:00 IST

सदर मुलगी नवव्या वर्गात शिक्षण घेत आहे.  मुलीच्या आईची व मुलाच्या आईची पूर्वीची ओळख आहे. पैशांसाठी तिने मुलीचा विवाह त्या २० वर्षीय तरुणाशी निश्चित केला. मात्र, ही रक्कम नेमकी किती आणि हा सौदा कसा निश्चित करण्यात आला, हे स्पष्ट होऊ शकले नाही. ही बाब मुलीला कळल्यानंतर, सध्या मी लग्न करणार नाही, मला शिक्षण घ्यायचे आहे, अशी भूमिका तिने घेतली. त्यामुळे आईने मुलीला मारहाणसुद्धा केल्याचे पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत समोर आले आहे.

ठळक मुद्देआई, युवकाविरुद्ध गुन्हा, २० वर्षीय युवकाशी विवाह निश्चित करण्याचा प्रयत्न

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : आईनेच काही रकमेच्या आमिषातून एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीचा २० वर्षीय युवकाशी बालविवाह पक्का करण्याचा प्रयत्न केला. मात्र, या बालविवाहाला मुलीनेच विरोध करीत थेट गाडगेनगर ठाण्यात धाव घेऊन घडलेला प्रकार पोलिसांसमोर कथन केला. मुलीच्या तक्रारीवरून मुलीची आई व युवकाविरुद्ध पोलिसांनी गुन्हा नोंदविला. ही घटना शुक्रवारी दुपारी १२ वाजता उघडकीस आली. 
पोलीस सूत्रांनुसार, २० वर्षीय युवक (रा. रहाटगाव), ३८ वर्षीय महिला (रा. राजपूत ढाब्याच्या मागील झोपडपट्टी) असे आरोपीचे नाव आहे. १५ वर्षीय मुलीच्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध भादंविचे कलम १०,११ बालविवाह प्रतिबंधक कायदानुसार गुन्हा नोंदविला. 
सदर मुलगी नवव्या वर्गात शिक्षण घेत आहे.  मुलीच्या आईची व मुलाच्या आईची पूर्वीची ओळख आहे. पैशांसाठी तिने मुलीचा विवाह त्या २० वर्षीय तरुणाशी निश्चित केला. मात्र, ही रक्कम नेमकी किती आणि हा सौदा कसा निश्चित करण्यात आला, हे स्पष्ट होऊ शकले नाही. ही बाब मुलीला कळल्यानंतर, सध्या मी लग्न करणार नाही, मला शिक्षण घ्यायचे आहे, अशी भूमिका तिने घेतली. त्यामुळे आईने मुलीला मारहाणसुद्धा केल्याचे पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत समोर आले आहे. मात्र, मुलीचा विरोध कायम होता. 
मुलीने न डगमगता शुक्रवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास गाडगेनगर ठाण्यात धाव घेतली व वरिष्ठ पोलीस निरीक्षक आसाराम चोरमले यांना घडलेला प्रकार सांगितला. या गंभीर प्रकरणाची दखल घेत, तिच्या तक्रारीवरून त्यांनी आई व युवकाविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला तसेच आईला तातडीने अटक केली. स्वत:च्या बालविवाहाला विरोध करणाऱ्या मुलीला मारहाण करण्यात आली का,  याबाबत तिला वैद्यकीय चाचणी करण्यासाठी पाठविण्यात आले. नियमानुसार तिची कोरोना चाचणीसुद्धा करण्यात आली. 
 

मुलीला पाठविले बाल निरीक्षणगृहात 
फिर्यादी मुलगी ही अल्पवयीन असल्याने तिला निरीक्षणगृहात पाठविण्यात आले आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. 

आईला केले न्यायालयासमोर हजर 
प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता, मुलीच्या आईला तातडीने अटक करण्यात आली. त्यानंतर शुक्रवारी तिला न्यायालयासमोर हजर केले. तिला वैयक्तिक जात मुचलक्यावर सोडण्यात आले.  पोलीस तरुणालासुद्धा अटक करणार आहेत. 

मुलगी अल्पवयीन आहे. तिने स्वत: ठाण्यात येऊन तक्रार नोंदविली. त्यावरून आई व युवकाविरुद्ध गुन्हा दाखल केला. मुलीच्या आईला अटक केली आहे. 
- आसाराम चोरमले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, गाडगेनगर ठाणे

 

टॅग्स :marriageलग्नPoliceपोलिस