शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
4
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
5
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
6
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
7
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
8
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
9
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
10
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
11
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
12
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
13
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
14
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
15
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
16
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
17
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
18
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
19
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
20
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
Daily Top 2Weekly Top 5

‘डी मार्ट’च्या पार्किंगचा नागरिकांना त्रास

By admin | Updated: March 7, 2016 00:08 IST

कॅम्प भागातील डी मार्ट प्रतिष्ठानासमोर अस्ताव्यस्त पार्किंग होत असल्याने या परिसरातील नागरिकांसह अन्य अमरावतीकरांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

सुटीच्या दिवशी सर्वाधिक गर्दी : हातगाड्यांची गर्दी, अतिक्रमणाचा विळखा अमरावती : कॅम्प भागातील डी मार्ट प्रतिष्ठानासमोर अस्ताव्यस्त पार्किंग होत असल्याने या परिसरातील नागरिकांसह अन्य अमरावतीकरांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. पालिकेने पोलिसांच्या सहकार्याने येथील अतिक्रमण उठवावे, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे. स्थानिक कॅम्प भागात असलेल्या डी मार्ट संकुलाजवळ चारचाकी वाहनांची पार्किंग व्यवस्था नसल्याने शंभरावर चारचाकी वाहने अगदी रस्त्यावर उभी राहतात. येथील नो-पार्किंगची फलके अक्षरश: शोभेचे वस्तू बनली आहेत. अनेक वाहन चालक फलकासमोरच पार्किंग करीत आहेत. गाडगेनगर वाहतूक विभागाने केली कारवाईकॅम्प हा भाग वाहतूक शाखेच्या गाडगेनगर विभागांतर्गत येतो. त्यामुळे संबंधित वाहतूक पोलिसांनी येथे वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या वाहनांवर कारवाई करावी व वाहतुकीस शिस्त लावावी, अशी अपेक्षा आहे. चारचाकींसमोर दुचाकींची अवैध पार्किंगडी-मार्ट समोरच्या खुल्या जागेत चारचाकी वाहनांच्या समोर दुचाकींच्या रांगा लावल्या जातात. या अस्ताव्यस्त पार्किंगमुळे वाहतुकीचा बोजवारा उडाला आहे. येथील अवैध पार्किंगमधील दुचाकी तथा चारचाकी वाहनांना जामर लावण्यात यावे, पोलिसांनी तशी कारवाई करावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. समोरचा रस्ताही व्यापलाडी मार्टच्या समोरासमोरचा रस्तासुद्धा अतिक्रमणाने गिळंकृत केला आहे. या भागात चप्पल-बुट विक्रेत्याने दुकानदारी थाटली आहे. रस्त्याच्या बाजूने जरी ही दुकानदारी असली तरी त्यामुळे लागणारी पार्किंग अवैधच ठरते. येथेही रस्त्यावर दुचाकी अस्ताव्यस्त लागतात. अनेक दिवसांपासून असलेल्या या भागातील अतिक्रमणावर हातोडा न फिरविल्याने काहीजण मुजोर बनले आहेत.