शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
6
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
7
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
8
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
9
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
10
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
11
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
12
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
13
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
14
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
15
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
16
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
17
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
18
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
19
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
20
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
Daily Top 2Weekly Top 5

‘एफडीए’द्वारे चंदामामा गृहउद्योगची झाडाझडती

By admin | Updated: May 4, 2017 00:05 IST

चिवड्यामध्ये तळलेली पाल आढळल्याप्रकरणी एफडीएने विक्रेता मातेश्वरी सेल्सवर धाड टाकून चिवड्याचा नमूना मंगळवारी घेतला.

त्रुटी आढळल्या : खटला दाखल करणारअमरावती : चिवड्यामध्ये तळलेली पाल आढळल्याप्रकरणी एफडीएने विक्रेता मातेश्वरी सेल्सवर धाड टाकून चिवड्याचा नमूना मंगळवारी घेतला. याच दिवशी उशिरा रात्री एफडीएच्या अधिकाऱ्यांनी चिवड्याचे मूळ उत्पादक रामपुरी कॅम्प परिसरातील चंदामामा गृहउद्योवर धाड टाकून येथील संपूर्ण व्यवस्थेचा आढावा घेतला. यावेळी एफडीएला अनेक त्रुटी आढळून आल्यात. संजय गांधीनगरातील रहिवासी शरद महादेव पखाले यांनी शामनगरातील मातेश्वरी सेल्समधून खरेदी केलेल्या चिवड्याच्या पाकिटात तळलेली पाल आढळली होती. याप्रकरणी तक्रार त्यांनी आधी लोकमतकडे व त्यानंतर मातेश्वरी सेल्सकडे केली होती. याबाबतचे सचित्र वृत्त लोकमतमध्ये प्रकाशित होताच एफडीएच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी विक्रेता मातेश्वरी सेल्स प्रतिष्ठानवर धाड टाकून चिवड्याचा नमुना तपासणीसाठी पाठविला. मात्र, सेल्समनने हा माल विकल्याची माहिती मातेश्वरी सेल्सच्या संचालकांनी दिली होती. चिवड्याच्या पाकिटाची तपासणी केली असता ‘जैन’ उत्पादनाच्या नावे विकला जाणारा चिवडा रामपुरी कॅम्प परिसरातील ‘चंदामामा गृहउद्योग’चे उत्पादन असल्याचे उघडकीस आले.उत्पादनाच्या तारखेची नोंद बेपत्ता अमरावती : याच दिवशी उशिरा रात्री एफडीएच्या अधिकाऱ्यांनी दिलीपकुमार मिहालाल शिवनानी यांच्या ‘चंदामामा गृहउद्योग’वर धाड टाकून येथील एकूण व्यवस्थेची झाडाझडती घेतली असता येथे अनेक त्रुटी आढळून आल्या आहेत. एफडीएने यासंदर्भात चंदामामा गृहउद्योगला नोटीस बजावली आहे. तपासणीदरम्यान कारखान्यात प्रचंड अस्वच्छता आढळून आली. स्वच्छतेचे निकष पाळण्यात येत नसल्याने याबाबत जाब विचारला आहे.एफडीएच्या तपासणीदरम्यान चिवड्याच्या पॅकिंगवर उत्पादनाची तारीख आढळून आली नाही. काही पाकिटांवर तर परवाना क्रमांक देखील नव्हता. शिवाय पत्ताही अपूर्ण आढळून आला. यासह अनेक त्रुटी आढळल्याने येथे नियमांचे उल्लंघन होत असल्याचे निरीक्षण एफडीएने नोंदविले. कर्मचाऱ्यांची वैद्यकीय तपासणी नाहीचंदामामा गृहउद्योगमध्ये ७ ते ८ कर्मचारी कार्यरत आहेत. मात्र, या कर्मचाऱ्यांची वैद्यकीय तपासणी देखील झाली नसल्याची बाब या तपासणी दरम्यान दिसून आली. यासर्व त्रुटींबाबत एफडीएद्वारे चंदामामा गृहउद्योगला नोटीस बजाविली आहे. रामपुरी कँप परिसरातील चंदामामा गृहउद्योगच्या कारखान्याची तपासणी केली असून त्यांना विविध त्रुटींसंदर्भात नोटीस बजावली आहे.- आर.एस.वाकोेडेअन्न सुरक्षा अधिकारी, अमरावती.