शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
4
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
5
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
6
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
7
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
8
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
9
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
10
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
11
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
12
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
13
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
14
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
15
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
16
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
17
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
18
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
19
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
20
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

आठवड्यातून दोन दिवस मिळणार अपंगांना प्रमाणपत्र

By admin | Updated: June 25, 2014 23:33 IST

जिल्ह्यात विविध ठिकाणी नोंदणी करण्यात आलेल्या सुमारे ७२ हजार अपंगांपैकी ३३ हजार अपंग व्यक्तींना अद्यापपर्यंत प्रमाणपत्र मिळाले नसल्याने या अपंगांना त्वरित प्रमाणपत्र देण्यासाठी आता

अमरावती : जिल्ह्यात विविध ठिकाणी नोंदणी करण्यात आलेल्या सुमारे ७२ हजार अपंगांपैकी ३३ हजार अपंग व्यक्तींना अद्यापपर्यंत प्रमाणपत्र मिळाले नसल्याने या अपंगांना त्वरित प्रमाणपत्र देण्यासाठी आता आठवड्यातून दोन दिवस हा उपक्रम सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय बुधवारी जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या अपंग कल्याण पुनर्वसन समितीच्या त्रैमासिक बैठकीत सर्वानुमते घेण्यात आला. जिल्ह्यातील १४ तालुक्यात व शहरात सुमारे ७२ हजार अपंग महिला व पुरुष आहेत. या अपंगांना जिल्हा सामान्य रुग्णालयातून तपासणी केल्यानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत अपंगांचे प्रमाणपत्र दिल्या जाते. मात्र यासाठी महिन्यातून एकदाच हा उपक्रम राबविण्यात येतो. परिणामी ही प्रक्रिया संथगतीने होत असल्याचा मुद्दा अपंग कल्याण व पुनर्वसन समितीचे सदस्य किशोर बोरकर यांनी या बैठकीत मांडला. जिल्हाधिकाऱ्यांनीही आठवड्यातून दोन दिवस हा उपक्रम सुरु करण्याचा निर्णय मंजुर करण्यात आला. जिल्हा परिषदेचा अपवाद वगळता महापालिका व नगरपालिकेत अपंगांसाठी तरतूद केली नसल्याची बाबही बोरकर यांनी समितीच्या बैठकीत निदर्शनास आणून दिली. अखेर महापालिका व नगरपरिषदेला अपंगांच्या तरतुदीसाठी पत्रव्यवहार करुन निधीची तरतूद करण्याचे निर्देश देण्यात येतील, असे आश्वासन जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल यांनी दिले. यावेळी अपंगांच्या इतरही मागण्यांवर सविस्तर चर्चा करुन महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. बैठकीला सीईओ अनिल भंडारी, रामसिद्धभट्टी, डीएचओ बनकर, राठोड, भाऊराव चव्हाण, अधिकारी पिपरे, समन्वय समितीचे सदस्य किशोर बोरकर, रामराव पोकळे, राजेंद्र देशमुख आदी उपस्थिती होते.