शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
4
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
5
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
6
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
7
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
8
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
9
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
10
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
11
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
12
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
13
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
14
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
15
‘धुरंधर’चा वाद सामंजस्याने सोडवावा, दिग्दर्शक आदित्य धर, निर्मात संतोष कुमार यांना उच्च न्यायालयाच्या सूचना
16
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
17
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
18
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
19
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
20
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
Daily Top 2Weekly Top 5

धामणगावात केंद्र शासनाचा आणणार निधी

By admin | Updated: January 15, 2016 00:47 IST

विद्यानगरी असलेल्या या शहराचा तीन टप्प्यांत विकास करणार असून या शहरात सोलर पॉवर प्लॅन, लॉजिस्टिक पार्क, सार्वजनिक बगीचा, ...

पहिल्या टप्प्यात सहा कोटी प्राप्त : राज्यमंत्र्यांनी स्वीकारले पालकत्वधामणगाव रेल्वे : विद्यानगरी असलेल्या या शहराचा तीन टप्प्यांत विकास करणार असून या शहरात सोलर पॉवर प्लॅन, लॉजिस्टिक पार्क, सार्वजनिक बगीचा, चौकाचे सौंदर्यीकरण, व्यापारी संकुल, स्विमिंग पूल, आठवडी बाजाराचे विस्तारीकरण यासह विविध कामे तीन टप्प्यांत करण्यासाठी केंद्र शासनाचा निधी आणणार असल्याची ग्वाही नगरविकास राज्यमंत्री रणजित पाटील यांनी दिली़ धामणगाव शहरातील विविध शैक्षणिक संस्थांतील शिक्षकांच्या भेटी घेण्यासाठी ते बुधवारी आले होते. पालकत्व स्वीकारलेल्या नगरपरिषदेला त्यांनी भेट दिली़ यावेळी भाजप नेते अरूण अडसड, नगराध्यक्ष अर्चना राऊत, उपाध्यक्ष हेमकरण कांकरीया, पं़स़सभापती गणेश राजनकर, प़ंस़सदस्य सचिन पाटील, बाजार समितीचे सभापती मोहन इंगळे, गटविकास अधिकारी कपिलनाथ कलोडे, मुख्याधिकारी वाहुरवाघ, गटशिक्षणाधिकारी सुनंदा बंड यांची उपस्थिती होती़शहर विस्तारीकरणाकरिता ३५ वसाहती आणि तीन गावांचा परिसर जोडण्याच्या प्रक्रियेला सुरूवात झाली आहे़ पहिल्या टप्प्यात एक मेगावॅट वीजनिर्मितीचा सोलर पॉवर प्लॅन तयार केली जाईल. ही वीज विद्युत मंडळाला देऊन शहराला प्रकाशमय करण्यात येणार आहे़ विजेचे केबल भुयारी मार्गाने टाकण्यात येणार आहे़ महिलांची सर्वाधिक गर्दीचे बुधवार बाजाराचे स्थानांतरण धवणेवाडी येथील ७ हजार ८८० स्क्वे़मी़मध्ये केला जाणार आहे़ येथे बाजार ओटे, वाहनतळाची निर्मिती ९ कोटी ५७ लक्ष रूपयांत केली जाईल़ शास्त्री चौक येथील प्राथमिक शाळा स्थांनातरित करून नव्याने शैक्षणिक संकुल २ कोटी २५ लाख रूपयांत बांधण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे पाटील म्हणाले.(तालुका प्रतिनिधी)