शहरं
Join us  
Trending Stories
1
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
2
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
3
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
4
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
5
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
6
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
7
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
8
दातात पकडून चिमुकल्यावर अघोरी उपचार, अकोल्यातील धक्कादायक प्रकार, व्हिडीओ व्हायरल
9
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
10
वि. स. खांडेकर ते सिमोन डी बोवॉयर... सगळे हुतात्मा चौकातील फुटपाथवर..!
11
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
12
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
13
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
14
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
15
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
16
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
17
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
18
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
19
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
20
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
Daily Top 2Weekly Top 5

सेंट्रल बॅँकेने हिरावला ४०० शेतकऱ्यांचा पीकविमा

By admin | Updated: March 31, 2016 00:17 IST

सन २०१४-१५ च्या हंगामाकरिता मोर्शी तालुक्यामधील नेरपिंगळाईच्या ४०० शेतकऱ्यांनी स्थानिक सेंट्रल बँक आॅफ इंडिया शाखेत पिकांचा विमा काढला.

शेतकरी धडकले : साहेबराव तट्टे यांच्या नेतृत्वात दिले निवेदन अमरावती : सन २०१४-१५ च्या हंगामाकरिता मोर्शी तालुक्यामधील नेरपिंगळाईच्या ४०० शेतकऱ्यांनी स्थानिक सेंट्रल बँक आॅफ इंडिया शाखेत पिकांचा विमा काढला. दुष्काळीस्थिति असल्याने पीकविमा मंजूर झाला. मात्र, शेतकऱ्यांचा विमाहप्ता बॅँकेने रिजनल शाखेकडे पाठविलाच नसल्याने शेतकरी पीक विम्यापासून वंचित आहेत. पीकविमा मिळावा म्हणून शेतकऱ्यांनी बुधवारी माजी आमदार साहेबराव तट्टे यांच्या नेतृत्वात विभागीय आयुक्त कार्यालयात धडक देऊन मागण्यांचे निवेदन सादर केले. नेरपिंगळाई येथील ४०० शेतकऱ्यांनी स्थानिक सेंट्रल बॅँक शाखेत रोखीने व कर्जदार शेतकऱ्यांनी त्यांच्या रकमेमधून पीकविमा काढला. इतर बॅँकांद्वारा शेतकऱ्यांना मागील वर्षाचा विमा मिळाला. मात्र, सेंट्रल बॅँकेच्या व्यवस्थापकांनी पीकविम्यासाठी शेतकऱ्यांचा वाटा अकोला येथील रिजनल आॅफिसमध्ये पाठविला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना पीकविम्याची रकम मिळण्यास विलंब होत आहे. शेतकऱ्यांनी यापूर्वी २२ आॅगस्ट आणि १६ नोव्हेंबरला निवेदन दिले असता व्यवस्थापकाने शेतकऱ्यांच्या नावाची खोटी तक्रार दिल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे. शेतकऱ्यांनी २३ नोव्हेंबर २०१५ रोजी उपोषण केले असता बॅँकेद्वारा ९० दिवसात पीकविम्याची रक्कम परत मिळेल, असे आश्वासन दिले. मात्र, ही मुदत देखील उलटून गेली आहे. त्यामुळे बॅँक व्यवस्थापनावर कारवाई करुन पीकविम्याची रक्कम मिळावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. मागणी पूर्ण न झाल्यास आत्मदहनाचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. यावेळी प्रकाश कनेर, पद्माकर वाकोडे आदी भाजप पदाधिकारी उपस्थित होते.