शहरं
Join us  
Trending Stories
1
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच भडकावू विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
2
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
3
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
4
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
5
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
6
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
7
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
8
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
9
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
10
आंबा पाहताच तोंडाला पाणी सुटतं, पण जरा थांबा; जास्त खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते, कारण...
11
इराणचा शांततेचा हात, ट्रम्प यांचा लाथ मारण्याचा इशारा! "चुकीचं वागलात तर याद राखा..."
12
नेपाळमध्ये 'बालेन' स्टाईल दणका! एका क्षणात १५०० सरकारी अधिकाऱ्यांना बसवलं घरी; नव्या सरकारचा मोठा निर्णय
13
मिस्ट्री स्पिनर सुनील नरेनचा ऐतिहासिक पराक्रम! IPL मध्ये २०० विकेट्स घेणारा पहिला परदेशी गोलंदाज
14
IPL मधील पहिला भारतीय शतकवीर! KKR कडून संधी मिळताच पठ्ठ्याची रोहित-विराटच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
15
Sara Tendulkar : "कसं वागावं, कोणते कपडे घालावे?"; सारा तेंडुलकरने केला सचिनच्या 'कडक' शिस्तीबाबत खुलासा
16
...तर नसरापूरच्या नराधमाला १५ ते २१ दिवसांत फाशीची शिक्षा झाली असती- राज्याचे माजी गृहमंत्री
17
Video: डोंगराळ मार्गावरून जात असताना अचानक रस्ता खचला, बघता-बघता ट्रक आत रूतला अन् मग...
18
कडक निर्बंध, तरीही इराणचं तेल पोहचलं आशियात! अमेरिकेच्या डोळ्यात धूळ फेकत कसं निघालं जहाज?
19
दिल्लीत AC ब्लास्टने जैन कुटुंब संपलं; आईच्या छातीशी घट्ट बिलगलेला दीड वर्षांचा आरू अन् शेवटचा तो व्हिडिओ कॉल...
20
आईच्या जीवाभावाच्या मैत्रिणीनेच रचला १४ वर्षांच्या चिमुरड्याच्या हत्येचा कट; सीसीटीव्हीमुळे फुटलं भांडं!
Daily Top 2Weekly Top 5

सिमेंट रस्त्यावरील फूटपाथ पादचाऱ्यांसाठी की पार्किंगसाठी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2022 05:01 IST

कोट्यवधी रुपये खर्च करून शहरात दोन डझनांपेक्षा अधिक रस्त्यांचे रुंदीकरण करून रस्ते प्रशस्त करण्यात आले; पण तरीही पार्किंगचा आणि वाहतूक कोंडीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. रस्त्यांकडे पाहिल्यानंतर ते गाड्या चालविण्यासाठी तयार कलेले रस्ते नसून गाड्या पार्किंगसाठी केलेली व्यवस्था आहे का, असा प्रश्न आता सर्वसामान्यांतून विचारला जाऊ लागला आहे. अमरावती शहरात वर्दळीच्या चौकांतून गेलेल्या रस्त्याच्या दुतर्फा होणाऱ्या बेकायदा पार्किंगमुळे नागरिकांचे रस्त्यावरून चालणेही कठीण बनले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शहरात महापालिकेच्या वाहनतळांची वाणवा आहे, त्यामुळे शहरातील सिमेंटचे रस्ते सध्या दुचाकींच्या पार्किंगसाठी सोयीचे ठरले आहेत. सिमेंटच्या रस्त्यांवर दुचाकींचे वाहनतळ उभे राहिल्याचे चित्र सध्या दिसत आहे. शहरातील दोन्ही उड्डाणपुलांमुळे वाहतुकीची कोंडी कमी होईल, अशी अपेक्षा होती. मात्र ही समस्या अजूनही कायम आहे. सबब, सिमेंट रस्त्यावरील फूटपाथ पादचाऱ्यांसाठी की पार्किंगसाठी, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.कोट्यवधी रुपये खर्च करून शहरात दोन डझनांपेक्षा अधिक रस्त्यांचे रुंदीकरण करून रस्ते प्रशस्त करण्यात आले; पण तरीही पार्किंगचा आणि वाहतूक कोंडीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. रस्त्यांकडे पाहिल्यानंतर ते गाड्या चालविण्यासाठी तयार कलेले रस्ते नसून गाड्या पार्किंगसाठी केलेली व्यवस्था आहे का, असा प्रश्न आता सर्वसामान्यांतून विचारला जाऊ लागला आहे. अमरावती शहरात वर्दळीच्या चौकांतून गेलेल्या रस्त्याच्या दुतर्फा होणाऱ्या बेकायदा पार्किंगमुळे नागरिकांचे रस्त्यावरून चालणेही कठीण बनले आहे. अशा पार्किंगमुळे वाहतूक व्यवस्थेला अडचण होऊन प्रचंड प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. त्यातच शहरातील महत्त्वाच्या पार्किंगच्या काही जागा अतिक्रमितांनी गिळंकृत केल्या आहेत.

मालवीय चाैक ते जयस्तंभ चौकमालवीय चौक ते जयस्तंभ चौकादरम्यान दुतर्फा सिमेंट रस्ता बनविण्यात आला आहे. लहान-सहान गल्ल्या असलेल्या या मार्गावर अनेक छोटी-मोठी दुकाने आहेत. पार्किंग व्यवस्था नसल्याने जागा मिळेल तेथे वाहने पार्क केली जातात. फूटपाथ देखील पार्किंग व रस्त्यावर आलेल्या दुकानातील साहित्याने व्यापला आहे. या भागात उड्डाणपुलाखाली पार्किंगसाठी जागा आहे. मात्र, तेथे दुकानदार व त्यांच्या कर्मचाऱ्यांची वाहने लागतात. 

श्याम चौक ते एसबीआयजयस्तंभ चौकाकडून वा महापालिकेकडून श्याम चौकाकडे वळल्यास तेथील सिमेंट रस्त्याचा फूटपाथ अस्ताव्यस्त पार्किंगने गिळंकृत केल्याचे दिसून येते. समोरासमोर असलेल्या मिठाई प्रतिष्ठाननेदेखील रस्त्याचा मोठा भाग अनधिकृतपणे कवेत घेतला आहे. त्याकडे वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष असल्याचा आरोप आहे.

वाहने सुसाटशहराची लोकसंख्या आजमितीस १० लाखांच्या घरात पोहोचली आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण भागातूनदेखील हजारो लोक विविध कारणांसाठी शहरात येत असतात, त्यामुळे शहरातील वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. शहरातील प्रमुख मार्गांवरील सिमेंट रस्त्यावर दुचाकी, चारचाकी वाहने लागत असल्याने पादचाऱ्यांना फूटपाथऐवजी रस्त्यावरून चालावे लागते.

 

टॅग्स :Parkingपार्किंग