शहरं
Join us  
Trending Stories
1
बस्तर नक्षलमुक्त! अमित शाह म्हणाले- "छत्तीसगडच्या जनतेच्या मनातील भीती संपली, याचं श्रेय..."
2
टेनिस बॉल स्टार कसा झाला टीम इंडियाचा शिलेदार? Prince Yadav च्या अविश्वसनीय प्रवासाची गोष्ट
3
“काही झाले तरी अमेरिकेला शरण जाणार नाही”; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराणचे सडेतोड उत्तर
4
अनुभवी रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल वनडे संघात का नाहीत? सिलेक्टर अजित आगरकर स्पष्टच बोलला...
5
"आंदोलन करा, पण रस्ते अडवून त्रास देऊ नका"; नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावर सुप्रीम कोर्टाचे विधान
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता पुतिन चीन दौऱ्यावर जाणार! शी जिनपिंग यांच्यासंदर्भात केलं मोठं विधान, म्हणाले...
7
Adhik Maas 2026: ‘श्री गजानन विजय’चे पारायण करा; महाराज सदैव साथ देतील, अनंत कृपा-लाभ होईल!
8
"दोन दिवसांत लोक कसे शांत होतात?"; नसरापूर अत्याचार प्रकरणावरून अमित ठाकरेंचा संताप
9
भारतीय शेअर मार्केटला वाईट दिवस! जगातील टॉप १०० कंपन्यांमधून RIL, HDFC आणि TCS बाहेर!
10
टीम इंडियाच्या वरिष्ठ संघात एन्ट्रीसाठी वैभव सूर्यवंशीच्या वाटेत ‘हा’ मोठा अडथळा; जाणून घ्या सविस्तर
11
Twisha Sharma : Video - ट्विशा शर्माचा पती समर्थ सिंह का झाला फरार, कधी येणार समोर? सासू गिरीबाला सिंहचा मोठा खुलासा
12
पंत, संजू सॅमसन बाहेर; नवख्या प्रिन्स यादव, गुरनूर ब्रारला संधी! BCCIचे ५ आश्चर्यकारक निर्णय
13
DCM एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना; राजकीय घडामोडींना वेग, चर्चेला उधाण, नेमके घडतेय तरी काय?
14
भेदक गोलंदाजी, खालच्या फळीत जलद धावा करण्याची क्षमता; ६.५ फूट उंचीचा ऑलराउंडर टीम इंडियात!
15
"इंधन दर १७ रुपयांनी वाढले तरच...!", ब्रोकरेज फर्मनं मांडलं थक्क करणारं गणित; पेट्रोल-डिझेल आणखी भडकणार?
16
"रेवंत रेड्डी बनणार तेलंगणाचे 'शुभेंदु अधिकारी'!" भाजप खासदाराची भविष्यवाणी, केला मोठा दावा; काँग्रेसचं टेन्शन वाढणार 
17
मोहम्मद शमीचं आंतरराष्ट्रीय करिअर संपलं? "आम्ही त्याचा विचारच केला नाही..." आगरकर नेमकं काय म्हणाले?
18
मॅरिड बॉयफ्रेंडसाठी सेल्स गर्लने १.६६ कोटींच्या दागिन्यांवर डल्ला मारला, पण आंघोळीला गेली अन् घात झाला
19
Sanjay Raut: "लोक भाजपला मतदान करून आपल्या कर्माची फळं भोगतायत!" संजय राऊत असं का म्हणाले?
20
टीम इंडियाची घोषणा; गिलच्या कॅप्टन्सीत श्रेयस अय्यर वनडेत डेप्युटी! KL राहुल कसोटी संघाचा उपकर्णधार
Daily Top 2Weekly Top 5

मालवाहू मिनीट्रक उलटून २७ जखमी

By admin | Updated: August 6, 2016 00:12 IST

ओव्हरटेक करताना भरधाव मालवाहू मिनीट्रक उलटून २७ मजूर जखमी झालेत.

वीरगव्हाणजवळील घटना : ओव्हरटेक करताना घडला अपघात
अमरावती : ओव्हरटेक करताना भरधाव मालवाहू मिनीट्रक उलटून २७ मजूर जखमी झालेत. ही घटना कुऱ्हा ठाण्याच्या हद्दीतील वीरगव्हाण गावाजवळ गुरुवारी सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास घडली. अपघातातील जखमींना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
मार्डी येथील रहिवासी २७ मजूर हे शेतीच्या कामानिमीत्त मालवाहू ट्रक एमएच २७एक्स ३१६१ ने कुऱ्हा जात होते. मात्र, दरम्यान विरगव्हाण गावाजवळ मालवाहू ट्रक एका वाहनाला ओव्हरटेक करित समोर जाण्याचा प्रयत्न करीत होता. दरम्यान ट्रक रस्त्याच्या कडेला उलटला. या अपघातात २७ मजूर जखमी झालेत. घटनेची माहिती मिळताच कुऱ्ह्याचे पोलीस अधिकारी गरूड व अन्य कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. नागरिकांच्या मदतीने जखमींना इर्विन रुग्णालयात दाखल करण्यात आले. जखमींमध्ये लक्ष्मी राठोड (३०), नर्मदा पाडुरंग राठोड (१४), सुमित्रा राठोड (६५), अनयोगसिंग पवार (२२), बावी आडे (२५), दिनेश बसराम आडे (३०), उमेश ग्ेोणलाल राठोड (१९), मनु तुकाराम आडे (२७), लाला पवार (६०), दुर्गा अशोक राठोड (४६), सुनंदा परसराम राठोड (३७), निर्मला सुखदेव आडे (३४), बसंती पुरुषोत्तम राठोड (३६), देवीदास धनसिंग चव्हाण (४०), योभारत रामचरण भोसले (६०), शालु सुधाकर राठोड (३०), रवि सुधाकर राठोड (३०), कमला दसकाम आडे (४०), सुभी गुलाब राठोड (४०) याचा समावेश आहे. (प्रतिनिधी)

उपचाराकरिता डॉक्टर, परिचारिकांची धावपळ
इर्विन रुग्णालयात रुग्णांचा ओढ सुरु असते, अशाप्रसंगी अपघातातील २७ जखमी अचानक दाखल झाले. त्यामुळे तत्काळ आरोग्य सेवा पुरविणारी यंत्रणा सज्ज करण्यात आली. जिल्हा शल्य चिकीत्सक अरुण राऊत व अतिरिक्त जिल्हा शल्य चिकीत्सक तितरे यांच्या मार्गदर्शनात अधिसेविका मंदा गाढवे यांच्यासह काही परिचारिकांनी तत्काळ रुग्णांवर उपचारास सुरुवात केली. त्यामुळे जखमी मजूरांना तत्काळ आरोग्य सेवा उपलब्ध झाल्याचा दिलासा मिळाला.