शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
2
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
3
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
4
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
5
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
6
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
7
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
8
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
9
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
10
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
11
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
12
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
13
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
14
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
15
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
16
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
17
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
18
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
19
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
20
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
Daily Top 2Weekly Top 5

मुदतवाढीनंतर ७४ हजार क्विंटल तूर खरेदी

By admin | Updated: May 21, 2017 00:04 IST

तूर खरेदी केंद्रांना ३१ मे पर्यंत मुदतवाढ दिल्यानंतर शासनाने चार हजार १५१ शेतकऱ्यांची ७४ हजार ४० क्विंटल तूर खरेदी केली आहे.

केंद्रांची सद्यस्थिती: १२ हजार शेतकऱ्यांना टोकनलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : तूर खरेदी केंद्रांना ३१ मे पर्यंत मुदतवाढ दिल्यानंतर शासनाने चार हजार १५१ शेतकऱ्यांची ७४ हजार ४० क्विंटल तूर खरेदी केली आहे. ११ हजार ८९३ शेतकऱ्यांना टोकन देण्यात आले आहेत. अद्याप एक लाख ८८ हजार पोते यार्डात पडून आहेत.केंद्रांना मुदतवाढीच्या निर्णयानंतर नाफेडव्दारा आज तारखेपर्यंत ४ हजार १५१ शेतकऱ्यांची ७४ हजार ४० क्विंटल तूर खरेदी केली आहे. यामध्ये चांदूरबाजार केंद्रावर ६९४ शेतकऱ्यांची १२,९९० क्विंटल चांदूररेल्वेला ३४० शेतकऱ्यांची ५,४०३ क्विंटल, दर्यापूर केंद्रावर २२३ शेतकऱ्यांची ४,७८७ क्विंटल, धामणगाव केंद्रावर ६९० शेतकऱ्यांची १०,४३९ क्विंटल, मोर्शी केंद्रावर १४७ शेतकऱ्यांची २,९४३ क्विंटल. नांदगाव केंद्रावर २३६ शेतकरयांची ५,०२९ क्विंटल, तिवसा केंद्रावर ४० शेतकऱ्यांची ५९८ क्विंटल,व वरुड केंद्रावर ७५१ शेतकऱ्यांची ११,९७५ क्विंटल तूर नाफेदव्दारा खरेदी करण्यात आली आहे.शुक्रवारी या सर्व ११ ही केंद्रावर ९२६ शेतकऱ्यांची १५,७२८ क्विंटल तूर खरेदी करण्यात आली. यामध्ये अचलपूरला २२४५ क्विंटल, अमरावती १०४४, अंजनगाव १३६१, चांदूरबाजार १४५०, चांदूररेल्वे ११९८, दर्यापूर ११४२, धामणगाव रेल्वे ३०१४, मोर्शी ९२१, नांदगाव १११९, तिवसा २०४६ व वरूड केंद्रावर १८६ क्विंटल तूर खरेदी करण्यात आली.बाजार समितीच्या फोननंतर आणावी तूरशेतकऱ्यांनी तूर विक्रीला आनन्यापूर्वी बाजार समिंतीमध्ये सातबारा, पिकपेरा, आधारकार्ड झेरॉक्स,यापूर्वी तूर विकली बाजार समितीचे नाव, विक्री तपसील,भ्रमनध्वनी क्रमांक, बँक खाते तपशील दिल्यानंतर शेतकऱ्याला टोकन देण्यात येईल. क्रमवारीनुसार ज्यावेळी नंबर येईल त्यावेळी बाजार समितीव्दारा फोन करण्यात येईल. त्यावेळी शेतकऱ्यांनी तूर विक्रीसाठी आणावी, संभाव्य पावसापासून नुकसान होणार नाही व बाजार समित्यांमधील गर्दी कमी होईल, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक गौतम वालदे यांनी केले आहे.११ हजार शेतकऱ्यांना दिले टोकनसद्यस्थितीत सर्वच केंद्रावर ११,८९३ शेतकऱ्यांना टोकन देण्यात आले आहे. यामध्ये अचलपूर १,४१३, अमरावती १,८२३, अंजनगाव सुर्जी१, ३७८, चांदूरबाजार ७०९, चांदूररेल्वे, ५८४,दर्यापूर १,२८१, धामणगाव रेल्वे ८६३, मोर्शी १,०२४, नांदगाव खंडेश्वर १,१२४, तिवसा ३७५, वरुड १,२८२ व धारणी केंद्रावर ३३ शेतकऱ्यांना टोकन देण्यात आले आहे.