शहरं
Join us  
Trending Stories
1
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
2
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
3
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
4
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
5
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
6
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
7
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
8
दातात पकडून चिमुकल्यावर अघोरी उपचार, अकोल्यातील धक्कादायक प्रकार, व्हिडीओ व्हायरल
9
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
10
वि. स. खांडेकर ते सिमोन डी बोवॉयर... सगळे हुतात्मा चौकातील फुटपाथवर..!
11
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
12
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
13
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
14
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
15
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
16
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
17
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
18
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
19
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
20
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
Daily Top 2Weekly Top 5

बसपाची मते ठरणार निर्णायक

By admin | Updated: October 18, 2014 22:57 IST

मोर्शी विधानसभा मतदार संघात चुरशीची लढत झाली असून निवडून येणारा उमेदवार थोड्या मतांच्या फरकाने निवडून येईल, असा जाणकारांचा अंदाज आहे. तर बसपा उमेदवाराने घेतलेली मते या निवडणुकीत निर्णायक ठरणार आहेत.

मोर्शी : मोर्शी विधानसभा मतदार संघात चुरशीची लढत झाली असून निवडून येणारा उमेदवार थोड्या मतांच्या फरकाने निवडून येईल, असा जाणकारांचा अंदाज आहे. तर बसपा उमेदवाराने घेतलेली मते या निवडणुकीत निर्णायक ठरणार आहेत. या मतदारसंघात एकूण १९ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. त्यात भाजपचे अनिल बोडे, काँगे्रसचे नरेशचंद्र ठाकरे, राकाँचे हर्षवर्धन देशमुख, शिवसेनेचे उमेश यावलकर, बसपाच्या मृदुला पाटील, मनसेचे संजय देशमुख ही मंडळी निवडणूक प्रचारात आघाडीवर होती. नामांकनानंतर शिवसेनेच्या उमेश यावलकर यांच्या बाजूने माळी समाजाच्या गठ्ठा मतांचे ध्रुविकरण होईल, शिवाय पक्षाची मतेही त्यांना मिळतील, असे चित्र होते. परंतु माळी समाजाच्या मतांमध्ये खिंडार पडल्याने स्थिती पालटण्याची शक्यता वर्तविली जात आहे. भाजप उमेदवाराला अव्हेरुन अनेकांनी शिवसेनेची कास धरल्याने उमेश यावलकर यांचे महत्त्व वाढले आहे. काँग्रेसचे नरेशचंद्र ठाकरे आणि राकाँचे हर्षवर्धन देशमुख यांचे मतदारसंघात कट्टर समर्थक आहेत. त्यांच्या मताधिक्यात यावेळी वाढ झाल्याचे दिसते. २००९ च्या निवडणुकीत नरेशचंद्र ठाकरे यांना ३७,८७० तर राकाँचे हर्षवर्धन देशमुख यांना ३७,७४८ मते मिळाली होती. हे दोन्ही उमेदवार तुल्यबळ आहेत. २००९ च्या निवडणुकीत मोर्शीचे अशोक रोडे बसपाकडून निवडणूक लढले. त्यावेळी त्यांना १८,३२५ मते मिळाली होती. त्यानंतर त्यांनी भाजपात प्रवेश घेतला. परंतु त्यांना यापूर्वी मिळालेली मते भाजपाकडे म्हणजे बोंडेंकडे पूर्णपणे वळती झाली नाहीत. त्यातील बरीच मते काँग्रेस आणि राका उमेदवारांना शिवाय बसपाच्या कॅडरची मते बसपा उमेदवार मृदुला पाटील यांना मिळाल्याचे चित्र आहे. परिणामी राकाँचे हर्षवर्धन देशमुख आणि काँग्रेसचे नरेशचंद्र ठाकरे यांच्या मतांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.सध्याचे भाजप उमेदवार अनिल बोंडे २००९ च्या निवडणुकीत अपक्ष निवडून आले होते. २००४ ची निवडणूक युतीचे उमेदवार म्हणून शिवसेनेच्या तिकिटावर त्यांनी लढविली होती. त्यात ते पराभूत झाले होते. मात्र, त्यांनी कायम ठेवलेल्या जनसंपर्काचा लाभ २००९ च्या निवडणुकीत त्यांना मिळाला. यंदा त्यांना भाजपाच्या मतांसोबतच त्यांच्या विदर्भ जनसंग्रामची मतेही उपयोगी पडतात काय? हे पाहणे रंजक ठरेल. मतदान संपल्यानंतर उमेदवारांचे कार्यकर्ते चौकाचौकांत निवडणूक निकालाविषयी अंदाज बांधण्यात व्यस्त आहेत. (तालुका प्रतिनिधी)