चांदूर रेल्वेतील युवकाचा मृतदेह मिळाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:23 IST2021-03-04T04:23:04+5:302021-03-04T04:23:04+5:30

फोटो - तिवसा ०३ एस तिवसा : तीन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या चांदूर रेल्वेतील युवकाचा मृतदेह अखेर तिवसा तालुक्यातील कुऱ्हा ...

The body of a youth was found in Chandur Railway | चांदूर रेल्वेतील युवकाचा मृतदेह मिळाला

चांदूर रेल्वेतील युवकाचा मृतदेह मिळाला

फोटो - तिवसा ०३ एस

तिवसा : तीन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या चांदूर रेल्वेतील युवकाचा मृतदेह अखेर तिवसा तालुक्यातील कुऱ्हा पोलीस ठाण्याच्या हद्दीत कौंडण्यपूर येथील नदीपात्रात ३ मार्च रोजी दुपारी १२ च्या सुमारास आढळला. नदीकाठावर मोबाईल आढळल्यामुळे सदर युवकाचा शोध लागल्याचे सांगितले जात आहे.

मंगेश लक्ष्मण चौधरी (३२, रा. शेंद्रीपुरा, चांदूर रेल्वे) असे मृताचे नाव आहे. तो १ मार्चला दुपारी २ पासून बेपत्ता होता. कुटुंबीयांनी चांदूर रेल्वे पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दिली होती. दोन दिवस उलटूनही मंगेशचा थांगपत्ता लागला नसल्याने दिवसरात्र त्याचा शोध घेतला जात होता. मंगळवारी सकाळच्या सुमारास श्रीक्षेत्र कौडण्यपूर येथील वर्धा नदीकाठावरील अस्थी घाटावर मंगेशचा मोबाईल व इतर काही साहित्य आढळून आले. नागरिकांनी मंगेशचे नातेवाईक तसेच कुऱ्हा पोलिसांना ही माहिती दिली होती.

कौंडण्यपूर येथील विठ्ठल कुरवाडे, अभिमान बावणे व रुख्मिणी सहकार्य मंडळाचे सर्व सदस्य तसेच तंटामुक्ती अध्यक्ष अंकुश देऊळकर यांनी कुऱ्हा पोलीस व मंगेशच्या नातेवाइकांच्या संमतीने नदीपात्रात बुधवारी शोधकार्य सुरू केले. तब्बल दोन तासांनंतर मंगेशचा मृतदेह हाती लागला. मृतदेहाचे शवविच्छेदन तिवसा येथे करण्यात आले. पुढील तपास चांदूर रेल्वे पोलीस स्टेशनचे ठाणेदार मगन मेहते व कुऱ्हा पोलीस स्टेशनचे ठाणेदार ईश्वर वर्गे यांच्या मार्गदर्शनात कर्मचारी करीत आहे.

----------

१५ मार्चला होता विवाह

चांदूर रेल्वे शहरात छायाचित्रणाचा व्यवसाय करणाऱ्या मंगेश चौधरीचा येत्या १५ मार्चला विवाह होता. त्यापूर्वी त्याने आत्मघाताचे पाऊल का उचलले, हा प्रश्न अनुत्तरित आहे.

Web Title: The body of a youth was found in Chandur Railway