जवाहर कुंडात सापडला मृतदेह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2020 05:00 AM2020-06-03T05:00:00+5:302020-06-03T05:01:22+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क चिखलदरा : सोमवारी दुपारी २.३० वाजता सेमाडोह येथील सिपना नदीच्या जवाहर कुंडात बेपत्ता झालेल्या राजस्थान येथील ...

Body found in Jawahar Kunda | जवाहर कुंडात सापडला मृतदेह

जवाहर कुंडात सापडला मृतदेह

Next
ठळक मुद्देउपाययोजना करण्याची गरज : मृत युवक राजस्थानचा

लोकमत न्यूज नेटवर्क
चिखलदरा : सोमवारी दुपारी २.३० वाजता सेमाडोह येथील सिपना नदीच्या जवाहर कुंडात बेपत्ता झालेल्या राजस्थान येथील युवकाचा मृतदेह मंगळवारी सकाळी ९ वाजता पोलीस व स्थानिक रहिवाशांच्या मदतीने बाहेर काढण्यात आला. व्याघ्र प्रकल्प अंतर्गत येणाऱ्या जवाहर कुंडामध्ये बुडून मरणाऱ्यांची संख्या वाढत असल्याने उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.
राजस्थानच्या नागौर जिल्ह्यातून हैदराबाद येथे जाणारे मजूर सोमवारी दुपारी २.३० वाजता सेमाडोह नजीकच्या सिपना नदीतील जवाहर कुंड येथे जेवणासाठी थांबले होते. त्यातील राजुराम पुंजाराम जाट (२४. रा भोंडीकल्ला, ता. डेगाना, जिल्हा नागौर, राजस्थान) हा युवक शौचास गेला. मात्र, तो परतला नाही. डोहात बुडाल्याची शक्यता सहकाऱ्यांनी वर्तविली होती. पोलिसांनी मंगळवारी सकाळी स्थानिकांच्या सहकार्याने शोधमोहीम राबविली.
डोहातील एका कपारीतून त्याचा मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदन करण्यात आले. या घटनेची फिर्याद सहकारी श्यामसुंदर देशराज जाट (रघुनाथपुरा, नागौर) यांनी चिखलदरा पोलिसांत दिली. त्यावरून पोलिसांनी मर्ग दाखल केला. पुढील तपास चिखलदऱ्याचे ठाणेदार आकाश शिंदे यांच्या मार्गदर्शनात जमादार दिनेश तायडे, प्रशांत ताते करीत आहेत.

आंतरराज्य मार्गावर कुंड; मोठ्या प्रमाणात वाहतूक
चिखलदरा पर्यटनस्थळाप्रमाणेच तालुक्यातील सेमाडोह येथे व्याघ्र प्रकल्पाचे निसर्ग निर्वाचन संकुल आहे. मेळघाटच्या घाटवळणातून आपले अस्तित्व जपणारी मोठी अशी सिपना नदी येथून वाहते. याच नदीत जवाहर कुंड हा मोठा धबधबा असून, येथे वर्षभर पाणी राहते. त्यामुळे पर्यटक व रस्त्याने जाणारी वाहने मोठ्या प्रमाणात येथे थांबतात. सेमाडोह हे अमरावती-धारणी-इंदूर या आंतरराज्य मार्गावर असल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक आहे. आतापर्यंत याठिकाणी जवळपास सहा जणांचा बुडून मृत्यू झाल्याची माहिती आहे. त्यामुळे खबरदारीची उपाययोजना म्हणून व्याघ्र प्रकल्पाने येथे फलक लावणे व आनुषंगिक उपाययोजना करणे गरजेचे आहे.

Web Title: Body found in Jawahar Kunda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Deathमृत्यू